ओंकार..

Submitted by _आदित्य_ on 11 August, 2021 - 08:41

तो जयाच्या बळावरती चालतो संसार
सृष्टीचा साऱ्या चिरंतन पेलतो जो भार
जीवनाचे सार अवघा एक मूलाधार
तो अनादी तो अंनत नि तोच निर आकार
ज्याचिया तेजामृताने सरतसे अंधार
गीत हे त्याला समर्पित जो खरा ओंकार

पूजत आले लोक ज्या तत्वास पूर्वापार
धर्म रुजवाया सदा जो घेतसे अवतार
साधूसंतांनी जयास्तव सोडीले घरदार
भक्तीचा शृंगार जो अन मोक्षीयाचे द्वार
सदा राहो त्यावरी मम प्रीत अपरंपार
गीत हे त्याला समर्पित जो खरा ओंकार

Group content visibility: 
Use group defaults