पुण्यात फ्लॅट घ्यावा का नाशिकमधेच थांबावे ?

Submitted by रेव्यु on 31 July, 2021 - 04:38

गेल्या 14 वर्षांपासून आम्ही नाशिक मध्ये स्थायिक झालो. येथे प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट आहे. सुंदर सूर्यप्रकाश आणि वारा आहे. सर्व खोल्यांसमोर प्रचंड मोठी बाग, जुनी झाडे, हिरवळ आहे आणि प्रसन्न सकाळ आमचे स्वागत करते. जेव्हा हा फ्लॅट विकत घेतला तेव्हा मी नोकरीत होतो आणि धाकटी कन्या इथेच नोकरीस होती. आम्ही मूळचे बेळगावचे त्यामुळे तिथे स्थायिक होणे स्वाभाविक असते परंतु धाकटी कन्या लग्नानंतर असेल तिथे जाऊन येऊन करायचा विचार होता. परंतु थोरल्या कन्येप्रमाणेच ती देखील विवाहानंतर अमेरिकेत गेली. आता आम्ही 70 व 68 वर्षांचे आहोत . प्रकृती चांगल्या आहेत. नाशकात सांस्कृतिक बाबतीत आम्ही बरेच सक्रिय व सुखात आहोत. येथील अत्यंत निष्णात डॉक्टर्स सदा मदतीला आहेत आणि मुख्य म्हणजे ते अगदी त्याच दिवशी नुसत्या एसएमएस वर उपलब्ध असतात. या झाल्या जमेच्या बाजू.
परंतु इथे आम्हाला कठीण प्रसंगात मदत करतील किंवा आजारपणात आधार काय आहे याचा भरवसा नाही. तसे परगाव आहे असे आम्हाला वाटते. आमचे बरेच नातेवाईक पुण्यात आहेत, मुलीचे सासर तिथेच आहे, माझे मेव्हणे सुध्दा तिथे आहेत म्ह्णून मुली आग्रह करत आहेत की आम्ही तिथे नविन फ्लॅट घेऊन सेटल व्हावे.
आम्हाला भिती वाटते तिथल्या वाहतूकीची, मी इथे अजूनही कारमध्ये आरामात हिंडतो. सर्व अंतरे 20 मिनिटांच्या अंतरात आहेत. दुसरे असे की खरोखरच पुण्यात नातेवाईक मदत करू शकतील का? त्या पेक्षा येथेच सामाजिक आधार व्यवस्था विकसित करावी का? अत्यंत संभ्रमात आहोत.
दुसरे म्हणजे पुण्यात फ्लॅटच्या शोधात संलग्न बाबी म्हणजे कायदेशीर रीत्या आपल्या नावावर होईल का, मी व ही सहजपणे हिंडू शकू का?
काही उमजत नाहीये.... चर्चा करता येईल का.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळ्याच पोस्ट्स छान आहेत.
पुण्याला नाशिकचे सगळं आवरून शिफ्ट होण्यापेक्षा नातेवाईकांजवळ सध्या एक दोन वर्षे घर भाड्याने घेऊन बघा. सध्या थोडं सामान विकत थोडं पुण्याच्या नाते वाईकांकडे जास्त असलेलं अस करून मॅनेज होईल.

ह्या मुळे एकदम मागचे दोर कापले अस होणार नाही. भाड्याच्या फ्लॅट मध्ये ownership flat सारखी जोखीम नाही, खर्च कमी. तसेच प्रत्यक्ष राहिल्याने किती मदत होतेय, long term मध्ये एकमेकांचा सहवास किती सुसह्य होतोय, किती आवडतोय , गाव कसं वाटतय वगैरे चा अनुभव येईल. आवडलं तर कायम स्वरूपी रहाण्याचा निर्णय घेता येईल ,नाहीतर नाशिक आहेच.
पुण्याचे नातेवाईक ही जरी वयस्कर असले तरी त्यांची मदत मिळू शकते, आधार वाटू शकतो एकमेकांच्या अडचणीत . त्यांच्या आजारपणात तुम्ही1 तुमच्या ते अस होऊ शकत. सगळे जण एकदम आजारी अस तुमच्या सध्याच्या वयाला नाही होणार.
पण त्या साठी शक्यतो जे सर्वात जवळचे नातेवाईक असतील त्यांच्या जवळ घर बघायला हवं. त्याच मजल्यावर मिळालं तर फारच छान.
मी स्वतः सध्या हा प्रयोग करतेय. देवदयेनी बहिणीच्या घराजवळच ( मुंबई बाहेर ) कॉमन कंपाउंड असलेलं घर भाड्याने मिळालं आहे. तिथे रहात आहे. बघणार आहे ठाणा सोडून कसं वाटत ते.

रेव्यू सर, दुसरे सासर नसलेले गाव हवे तर मग मुलींना विचारायला हवे की पुण्याला शिफ्ट व्हायला का सांगत आहेत. आम्ही कुणी काही सल्ले दिले तरी तुमची आर्थिक, शारिरीक, सामाजिक इइ परिस्थिती मुलींनाच जवळून माहिती आणि मायाही असते. सौ चे माहेर पुण्यात आहे हा घटक त्यांनी महत्त्वाचा मानलेला दिसतो. आई तिच्या माहेराजवळ सुखी राहिल असे मनात आहे का? त्यांच्या मताचा विचार खोलवर व्हायला हवा असे वाटते.

Sorry to respond in English
Seemantiniji, most of our relatives are in Pune and the closest are her brothers and her children and their families. The third generation too has settled there and there is hope that they would be of assistance.
Daughters are convenient in either location because to them it is an occasion which arises once in 2 years. My second daughter's in laws are in Bangalore. To her it is no issue.

खूप छान चर्चा. मनापासून दिलेले उत्कृष्ट प्रतिसाद. चार पाने होउनही न भरकटलेला धागा. छान. बर वाटल वाचून.

मी तुमच्या जागी असतो तर आहे मी तिथेच राहिलो असतो. वेळ आहे तो पर्यंत एखादा/एखादी विश्वासू मदतनीस ( ज्यांची मदत शेवटपर्यंत राहू शकेल असे) शोधणे आणि त्यांची मदत शेवटपर्यंत राहील अशी वागणूक ठेवणे हा सर्वोत्तम उपाय असेल तुमच्यासाठी. त्यांना थोडेफार जास्त पैसे द्यावे लागले तरी ते इतर पर्यायांपेक्षा स्वस्त पडतील.
पुणे आणि नाशिक मधे काही जमिन अस्मानाचा फरक नाही. जो काही आहे तो आपण कुठ्ल्या भागात रहाणार/ तिथे लोक/शेजारी/सोसायटी कशी असणार अशा अनेक वेरिएबल्स वर पण अवलंबून असेल. त्यामुळे जनरलाइज करता येणार नाही. फारच नातेवाइकांची हौस असेल तर त्यांच्याकडे जाउन रहा चार पाच दिवस पुण्याला. Happy

माझ्या मोठ्या बहिणीचा आता हा प्रॉब्लेम झालाय. एकटीच आहे आता. तिची एक मुलगी अमेरिकेत. एक गावातच, स्वतः डॉक्टर आहे. त्यामुळे तब्येतीच सगळ बघते. पण वेळ पडल्यास तिला पण सारख सारख उठून आईकडे जाता येत नाही. कामवाली २०-२५ वर्षे काम करतीय, त्यामुळे ती अडचण नाही. मुंबईहून माझ्याकडे आली तरी चार दिवसात परत जायची भूणभूण. (वहिनी चांगली आहे तरी. Happy ). बोलायला कुणी नाही, एकटेपणामुळे सारख काहितरी होतय अस वाटत रहात तिला. आता तर थोडा विस्मृतीचा पण त्रास व्हायला लागलाय. आता एक मदतनीस मिळालीय. ती चांगली आणि प्रामाणिक आहे पण ती फार निगेटीव आहे, सारखे स्वतःचे प्रॉब्लेम सांगते अस बहिणीच म्हणणं. बघू आता पुढे कस जमतय. (हे आपलेच पुढचे चित्र आहे)

आमच्या सोसायटीत ४-५ आज्या एकेक्ट्या मजेत रहातात. (अ‍ॅपरंटली)

खूप छान चर्चा. मनापासून दिलेले उत्कृष्ट प्रतिसाद. चार पाने होउनही न भरकटलेला धागा. छान. बर वाटल वाचून>>+१
आमच्यासारख्या अजून सत्तरीत न पोचलेल्यांनाही तेथे पोहोचेपर्यंत काय करावे वा करू नये याविषयी स्थलसापेक्ष नसलेलं मार्गदर्शनही मिळालं!

निलुदा
हा व्हिडियो पाहिला खूप आकर्षक वाटतो हा पर्याय
उद्या किंवा परवा पुण्यात प्रत्यक्ष पाहून येतो. कदाचित हा च योग्य वाटेल
विचार करायला हरकत नाही..

उत्सव चा व्हिडीओ का माझ्या सजेशन लिस्ट मध्ये पण आला होता हा. व थोडा बघितला. एक दोन सहा महिने भाड्याने घर घेउन राहता येते असे कळले. हा पर्याय बेस्ट वाटतो आहे. तेच सांगायला आले. ऑल द बेस्ट.

इथे पण कोणीतरी असं व्रुध्दाश्रम काढणार होतं बरीच नावापासून ते सोयीसुविधा पर्यंत काय झालं? धागा शोधावा लागेल

उत्सव सारख्या पंचतारांकित वसाहतीत फ्लॅट घेऊन राहाण्यापेक्षा भाड्याने राहाणे चांगले. जुजबी मित्र, कामचलाऊ मैत्री मिळेल. पण मोठ्या अडीअडचणीला हमखास उपयोगी पडेल असे कोणी तिथे मिळण्याची शक्यता कमीच. कारण रहिवासी स्वतः:च आश्रयार्थी असतील. संस्थेची काही सोय असेल तर ठीक. म्हणजे ऐनवेळी हॉस्पिटल मध्ये नेणे वगैरे. एरवीही पुण्यात भाडी कमी असतात असे ऐकून आहे. तसे असेल तर इतरत्रसुद्धा कायमस्वरूपी भाड्याने राहाणे बरे पडेल. फक्त वर्षावर्षाने भाडेकराराचे नूतनीकरण करावे लागेल इतकेच. सांस्कृतिक वातावरण वगैरेची अपेक्षा न ठेवलेली बरी.

हॉस्पिटल हॉस्पिटल काय लागले आहे ह्यांना समजत नाही,

सगळीकडे वेल कवालिफाइड डॉकटर लोक रिकामे बसून आहेत , तुमचा आर्थिक व शैक्षणिक स्तर पाहिला तर तुम्ही पुणे , नाशिक , मुंबई अशा मेट्रोतच रहाणार आहात , गडचिरोलीत थोडेच जाणार आहात. तिथे तुम्हाला हव्या तश्या सुविधा मिळतीलच

सगळीकडे वेल कवालिफाइड डॉकटर लोक रिकामे बसून आहेत , तुमचा आर्थिक व शैक्षणिक स्तर पाहिला तर तुम्ही पुणे , नाशिक , मुंबई अशा मेट्रोतच रहाणार आहात , गडचिरोलीत थोडेच जाणार आहात. तिथे तुम्हाला हव्या तश्या सुविधा मिळतीलच>> अनुमोदन. आमचा स्पेशालिस्ट वर्ल्ड रिनाउन्ड आहे व लिटरली लोक कितीही वेळ थांबतात त्यांना भेटायला ते ही एकदा भेटलेकी व्यवस्थित वेळ देतातच. परत हे प्रत्येक सबर्ब मधील क्लिनिक मध्ये.

मला मध्यम्तरी दीर सांगलीला येउन राहा म्हटले होते पण मी गावात राहून काय करणार. त्यात थोरली नणंद जाम खाश्ट आहे. रोज रोज की मगज मारी काय कु. आपल्या घरी कसे ही राह्ता येतंय. जमिनीवर गालिचा टाकून पडले तरी चालतंय. भुकेला दोन पाव भाजून घेतले आणि नेट असलं की काम झालं. सुपर व्हिजन कश्याला हवी. त्यात मेडिकेअर उपलब्ध.

भुकेला दोन पाव भाजून घेतले आणि नेट असलं की काम झालं.>> Biggrin

पण अमा, दिरांचं ऐका तुम्ही. नणंदेला घाबरू नका. कुरकुरीनी करून खाऊ घाला त्यांना म्हणजे चांगल्या वागतील त्या. ऐका माझं. तुम्ही सांगलीत येऊन रहा थोडे दिवस. बघा कसा बिन पावसाचा महापूर येतो ते Biggrin
बादवे, सांगली बरं आहे की तुमच्यासाठी. अधुन-मधुन मुंबैला ये-जा करायला सोयीच्या अशा महालक्ष्मी, कोयना, शरावती/चालुक्य, हुबळी-एलटीटी आहेत. शिवाय नेट पण बरं स्पीड पकडतं. शांत-रमणीय परिसर. हाकेच्या अंतरावर कोल्हापूर-कराड. शिवाय कोरोनाचा नंबर वन क्राऊन आलटून पालटून सातारा-सांगली-कोल्हापुर मधेच तर फिरतो आहे गेले वर्षभर Biggrin .

तुम्ही पालखी घेऊन या इथे.. हवं तर सांगली आगार व्यवस्थापकांशी बोलणी करून तुमच्या पालखीला प्लॅटफॉर्म एक वर पर्किंगची सोय करता येते का ते बघू आपण. Biggrin

बहुधा इथे लिहिणाऱ्या सिनियर सिटीझन्स ची काळजी 'चांगले डॉ भेटतील का' पेक्षा 'अडचण आणि अर्जन्सी असेल तेव्हा त्या चांगल्या डॉ च्या हॉस्पिटल पर्यंत सोडणारी/त्वरित ऍम्ब्युलन्स मिळवून देणारी मंडळी भेटतील का' ही असावी असं वाचून वाटतं.

अअडचण आणि अर्जन्सी असेल तेव्हा त्या चांगल्या डॉ च्या हॉस्पिटल पर्यंत सोडणारी/त्वरित ऍम्ब्युलन्स मिळवून देणारी मंडळी भेटतील का' >
अहो त्याहून बरेच असते पुढे. अ‍ॅडमिट करणे, फॉर्म भरणे, मुख्य म्हणजे जबाबदारी घेणे ऑपरेशन किंवा ट्रीटमेंट होईपरेन्त थांबणे व घरी परत येणे. मग पेशंटला खायला देणे आरामात झोप वणे हे आहे.

हो. निदान मलातरी तसेच म्हणायचे आहे. आपले मेडिक्लेमचे पेपर्स, आजारपणाचा इतिहास, तोपर्यंत झालेल्या काही आजारांच्या वेगवेगळ्या डॉक्टर्सकडून झालेल्या उपचारांच्या वेगवेगळ्या फाईल्स, सध्या चालू असलेल्या औषधांचे डोस आणि वेळापत्रक हे सर्व आपण फिट असेपर्यंत व्यवस्थित राखतो. पण कार्यक्षमता कमी होऊ लागली की गडबड होते. त्यातून दोघांचीही कार्यक्षमता कमी होऊ लागली की गोंधळच. शेजाऱ्यापैकी कोणी जबाबदारीने माहिती राखून असेल तर बरे पडते. एखादा तल्लख मदतनीस मिळाला तर खूपच छान. ज्ये नांच्या वसाहतीत असे रेकॉर्ड ठेवत असतील तर उत्तमच. पण ही शक्यता दुर्मीळ.
अशी आणीबाणी एकदाच कधीतरी येणार, तरीही आपली सर्व तरतूद त्या एका प्रसंगासाठीच असते. नाहीतर रुळलेले ठिकाण आणि आयुष्य सोडून घर बदलण्याचा आणि 'सगळ्यांना सोयीस्कर ' ठिकाणी रहाण्याचा निर्णय कोणी का घेईल?
मुंबईत जसे गल्लोगल्ली नामांकित डॉक्टर आणि लहान मोठी रुग्णालये, दंतनेत्रतज्ञगृहे, रेडीऑलोजिस्ट, C T scan सुविधा, रक्त तपासणी गृहे (प्रसूतिगृहेसुद्धा; पण ज्ये नांच्या बाबतीत अप्रस्तुत) असतात तशी इतर ठिकाणी दिसत नाहीत. पुण्यातही दूरवरच्या नवीन वसाहतींत नाहीत. कोणी काहीही म्हणा.

हो अमा.
ते सगळे पण म्हणायचे होते मला.

अमेरिकेत शिफ्ट होणे ही मला अवघडच वाट्ते. तिथले हेल्थ इन्सुअरन्स हॉरर कथा, कदान्न व जनरली व्हायोलंट जीवन बघता ह्या वयात आवश्यक ती मनःशांती तिथे मिळणे अवघड वाट्ते. कधी तरी एकदा जीवनात पालकत्व सोडून वानप्रस्थ आश्रम घ्यावा हे धाडस करावे लागते. >>>
अमा सॉरी टू से पण हे वाक्य खूप generalized आहे. एखादा न्यूज मधिल प्रसंग वाचून मत बनवणे योग्य नाही. सगळी अमेरिका व्हायोलेंट आहे का ?? आपण अमेरिकेत कुठल्या भागात राहतो तेही महत्वाचे आहे. हे वाक्य युपी बिहार च्या बातम्यांमूळे भारत violent देश आहे असे म्हणण्यासारखे आहे.

भारतीय लोक्स तरी स्वतःच्या घरी बरेच प्रमाणात भारतीय जेवणच करतात. ते कदान्न कसे ? रोज कोणी पास्ता पिझ्झा खात नाही. आणि healthcare चे म्हणाल तर हो ते इथे महाग आहेच. पण इथे जी व्यक्ती तरुणपणी येते ती स्वतःची म्हातारपणाची सोय करतेच किंवा करावीच . पण जर तुम्ही वयाच्या साठीला इथे आलात तर ते महाग पडेलच. त्यातूनही इथे मार्ग आहेत. नंतर तर मेडिकेअर ही मिळते. वेळ पडल्यास एका फोन वर मदत मिळते.

ह्या गोष्टी अमेरिकेत आहेत ह्याची जाणीव सर्वाना आहेच. प्रत्येक ठिकाणचे फायदे तोटे आहेतच पण मला हा मुद्दा पटतो की वयाच्या साठीत सर्व पाश सोडून इथे केवळ मुलांबरोबर येऊन राहणं तितकेसे सोपे नाही. . कारण त्यांची कितीही इच्छा जरी असली तरी ती आपल्या जीवनात बिझी असतात. आपल्या adult मुलांच्या जीवनात आपले काय स्थान आहे ते तपासून मगच यावे. शेवटी तुम्हाला आनंदी ठेवणे हि तुमचीच जबाबदारी आहे. काहींना नातवंडे खेळवणे हा अत्यंत आनंदाचा भाग वाटेल. पण तेही काही वर्षात संपते. मग पुढे काय ? या वयात नवी मैत्री जमवता येते पण त्यासाठीही काळ जावा लागतो. तुमचे बंध कोणाशी जुळतील हे शोधावे लागते. किंवा एकट्याने मन रमवण्याचे मार्ग शोधावे लागतात.

मी वैयक्तिकरित्या डाउन साईझिंग ला ऑलरेडी सुरवात केली आहे. कारण मुलांना आपल्यामागे कमीत कमी निर्णय घयावे लागावे हीच इच्छा आहे.

अमा मी तुमचे प्रतिसाद आवडीने वाचते. खूप आवडतात.त्यामुळे चूक भूल देणे घेणे.

>>सगळी अमेरिका व्हायोलेंट आहे का ??>> उत्तर दुर्दैवाने एकाशब्दात 'हो' असे आहे. नुसती व्हॉयोलंट नाही, कॉन्स्टिट्युशनली व्हायोलंट आहे. बाकी इन्शुरन्स/ अन्न याला पर्याय आहेत. पण गन कंट्रोल बापजन्मात बदलू शकतील यावर माझा विश्वास नाही. अगदी सोन्याच्या राज्यांत रहात असाल तरी त्याचा उपयोग नगण्य आहे. हे बातम्यांमुळे नाही तर विचारपूर्वक लिहिले आहे. भारताचे गन लॉज आणि अमेरिकेचे यात जमिनअस्मानाचा फरक आहे. कायदा-सुव्यवस्था आणि गन लॉ ची कृपया गल्लत करू नका.
आणखी पुढे चर्चा विषयांतराच्या भयाने इथे कराविशी वाटत नाही, दुसरीकडे हलवू शकतो.

हो गन लॉज बद्दल एकमत आहेच. व ते लॉज बदली बद्दल दुमत नाही. पण ही चर्चा इथे योग्य नाही. पण तरीही म्हणावेसे वाटते कि कायदा सुव्यवस्था अजूनही अमेरिकेत आहे. पुढचे माहित नाही. माझा तरी अनुभव चांगलाच आहे.
टीकेचं म्हणायचे तर तसे भारतातही तलवारी सुरे घेऊन फिरणारे लोक आढळतीलच. रात्रीच्या वेळी रिक्षातून जाताना पुण्यातही आताशा भीती वाटते.

>>>> अमेरिकेत शिफ्ट होणे ही मला अवघडच वाट्ते. तिथले हेल्थ इन्सुअरन्स हॉरर कथा, कदान्न व जनरली व्हायोलंट जीवन बघता ह्या वयात आवश्यक ती मनःशांती तिथे मिळणे अवघड वाट्ते. <<<<
फारच विनोदी वाटले . अमेरीकेत असा किती काळ घातलाय तुम्ही? की फक्त एकीव गोष्टींवर मत देताय( रोजच्या सारखच)?

हे म्हणजे, दिल्लीची लोकं मला म्हणालेली, बंबईमें सब लोग, कायको, इधरको ऐसा हिंदी ही बोलते है ना? मूवीज मे तो वोही दिखाते है.
नाहितर, धारावी म्हणजेच पुर्ण मुंबई असे म्हणणारी महाभाग आठवलीत....

रोज कोणी पास्ता पिझ्झा खात नाही.>> पास्ता पिझा पेक्षा पुढे जा. अन्न बनवतात त्या इन्ग्रेडिअंट मधील प्रदूषण भयानक आहे.. प्रोसेस्ड व मॉडिफाइ ड फूड त्यात ज्याला चव नाही. अशी तक्रार इथेच वाचली आहे. घरी भारतीयच बनवतात पण त्यात वापरलेले घटक पदार्थ ह्या वर संशोधन करा म्हणजे उत्तर सापडेल. कॅन्सर व अ‍ॅलर्जीज टाइपच्या रोगांमागे हीच कारणे आहेत.

माबो वरील परदेशी सदस्यांशी माझे काही वैर नाही. ते सुखात व हेल्दी राहावेत त्यांना बंदुकीच्या रँडम अपघातांचा त्रास होउ नये अशीच माझी नेहमी इच्छा असते.

एका वया व अनु भवा नंतर तुम्हाला साकल्याने एका वेगळ्या पर्स्पेक्टिव्ह ने चित्र दिसू लागते त्यातून हे विचार येतात. मुळात दुसृयाचे काही वाइट चिंतून आपले भले होत नाही.

अअडचण आणि अर्जन्सी असेल तेव्हा त्या चांगल्या डॉ च्या हॉस्पिटल पर्यंत सोडणारी/त्वरित ऍम्ब्युलन्स मिळवून देणारी मंडळी भेटतील का' > । ह्या मुद्द्याव र पोस्ट लिहीली होती ती उडाली.

हे भारतातील परिस्थितीवर आहे

सोसायटीचा वॉचमन अ‍ॅम्ब्युलन्स मागवून देउ शकेल. पण होस्पिटल फॉर्मॅलि टीज व इतर धावप ळ करायला कोणीतरी लागते. जसे डेसिग्नेटेड
ड्रायव्हर आयोजून ठेवतात तसे करावे लागेल. पेशंट केअर हा २४ *७ जॉब आहे. त्यात काही कामे घरातील नाते वाइकांना किळ्स वाणी वाटू शकतात. तीन शिफ्ट मध्ये मावशी ठेवल्या तर ते महाग पडू शकते. त्याची तरतूद वुड बी पेशंट वृद्ध व्यक्तींनी जमेल तशी करून ठेवायची गरज पडेल.

माझी स्पाइन कोलॅप्स झालीव/ पक्षा घाताचा झटका आला बेड रिडन व्हायची वेळ आली तर ही केअर तरूण मुलीला व बहिण / इतर नातेवाइकांना करायची अपेक्षा धरणे मलाच चुकीचे वाट्ते. ऑपरेशन ची शक्यता होती तर दोन मेड सर्वंटना सांगून ठेवले होते पण ते पुढे रहित झाले . आता त्या विचारत राहतात. ही एक अवघड बाब आहे.

आता बाफ तील उदाहरणातील काकांच्या दोन्ही मुली जवळ नाहीत पुण्याला शिफ्ट झाल्यावर वहिनींच्या भावांच्या मुलांच्या बायका ही कामे करणार आहेत का? हे आधी विचारून घ्यावे. हा जरा टोकेरी विचार आहे. पण ट्राय डिस्पोजिन्ग ऑफ अ युज्ड अ‍ॅडल्ट डायपर.

मी उत्सव असिस्टेड लिविंग पाहून आलो....हाॅलिडे होम ...तुम्ही सुदृढ असेपर्यंत उत्तम आहे....पण तेथिल आहार घेणे अनिवार्य आहे...सामान्य निवृत्तांसाठी महाग आहे

आपण सर्व लोकांचे दिलेल्या मनःपूर्वक सल्ल्याबद्दल व विचारपू र्वक प्रतिसादां बद्दल आभारी आहे.
आज आम्ही नाशिकलाच राहण्याचा निर्णय घेतला.
कारणे
१) नातेवाईकांचा भावनिक तसेच प्रत्यक्ष आधार विश्वासार्ह वाटला नाही, त्यांची काहीच चूक नाही कारण गत काही वर्षात, त्यांच्या आयुष्यातील समीकर णे व त्यात आमचे स्थान यात कालानुसार बदल झला आहे.
२) पुण्यात स्व तःस अ‍ॅडजस्ट करता येणे कठीण वाटले
३) पाहिलेले फ्लॅट्स माझ्या नासिकमधील फ्लॅटच्या तुलनेत आअगदीच टुकात होते ( माझ्या बजेट साठी)
४) नाशिकमध्ये आम्ही आअमची आधार रचना अधिक सातत्याने करण्याचा निर्णय घेतला व आजतागायत ते का झाले नाही यावर अंतर्मुख होऊन विचार केल्यावर ते साध्य व आनंददायक असेल असे वाटले.
५) वैद्यकिय दृष्ट्या काही आता तरी अलार्मिंग वाटत नाही व डे केअर नासिकमध्ये सुध्दा आहे

आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार

रेव्यु,
आपला दोघांचा नाशिक रहिवास व्यवस्थित आणि सुखकारक होईल आणि होवो.

Pages