येन केन प्रकारेण . . .

Submitted by pkarandikar50 on 30 July, 2021 - 08:19

येन केन प्रकारेण . . .
आजच्या युगाला ‘प्रसिद्धीचे आणि जाहिरातीचे युग‘ म्हटले जाते. माध्यमांची एखाद्या विस्फोटाप्रमाणे झालेली वाढ; निवडणुकीच्या राजकारणाचा माध्यमांवर बसलेला अनिष्ट पगडा आणि अफाट वेगाने विस्तारणारी बाजारू संस्कृती या सर्वांचा तो एकत्रित परिणाम असावा. त्यामुळे बरी-वाईट कशीही चालेल परंतु प्रसिद्धी हवी, आपली सतत कोणीतरी दाखल घेतली गेली पाहिजे असे भल्या-भल्यांना वाटू लागले आहे.
काही वर्षांपूर्वी संजय दत्त या अभिनेत्याला कोर्टाने दोषी ठरवून कारावासाची सजा फर्मावली होती. त्यावेळी त्याला अटक करून येरवड्याच्या तुरुंगात पोलीस घेऊन चालले होते. वेळ जवळपास मध्यरात्रीची होती. तरीही नाक्या-नाक्यावर त्याचे चाहते त्या वीरपुरुषाचे दर्शन घेण्याकरता जमले होते. जणू काही संजय दत्त कोणी थोर देशभक्त किंवा क्रांतिकारक असल्यासारखे वृत्त वाहिन्या ‘त्या’ दृश्यांचे ‘लाईव्ह’ प्रक्षेपण करत होत्या! या सगळ्या प्रकारात त्या चाहत्यांची कीव करावी की वाहिन्यांची ते मला समजत नव्हते.
जेथे जेथे काही जमाव गोळा होत असेल, जेथे जेथे काही अघटीत घडत असेल, अशा सर्व ठिकाणी आपण हजर असले पाहिजे आणि इतरांपेक्षाही आधी आपल्या वाहिनीवरून तो ‘इव्हेंट’ प्रक्षेपित झाला पाहिजे हे आजच्या बाजारू माध्यमांचे भागधेय बनले आहे. ‘प्रसिद्धी’ ची जनमानसावरील पकड किती घट्ट होत चालली आहे याचे ते एक उदाहरण आहे. अशी अनेक उदाहरणे आपल्याला जाता-येता दिसतात आणि त्यावर काही विचार करण्याचेही कष्ट आपण घेईनासे झालो आहोत. मग प्रतिक्रिया देणे ही फार लांबची गोष्ट झाली.
घटम भिंद्यात पटम छिन्द्यात कुर्याद आसभारोहणम |
येन केन प्रकारेण प्रसिद्ध: पुरुषो भवेत |
या जुन्या श्लोकातील ‘येन केन प्रकारेण’ हा शब्द प्रयोग चांगलाच प्रचलीत आहे. एके काळचे विख्यात नाट्यछटाकार दिवाकर यांची ‘तेव्हढेच ज्ञानप्रकाशात’ ही नाट्यछटा अजूनही आठवते. यावरून एक गोष्ट सिद्ध होते की प्रसिद्धीचा हव्यास ही काही नवी बाब नाही. फक्त त्याची व्याप्ती अलीकडे अतोनात वाढली आहे. त्यासोबतच, कोणत्या घटनेला ‘बातमी-मूल्य’ आहे याचे ताळतंत्र सुटल्याचे दिसते. कोणा अभिनेत्याला एखादा पुरस्कार मिळाला तर त्याची बातमी होणे स्वाभाविक आहे परंतु ‘बिग बॉस’ मालिकेतून हकालपट्टी झाली तर त्याचीही ‘बातमी’ होऊ लागली आहे आणि त्या पुरुषोत्तमाच्या मुलाखती दाखवल्या जाऊ लागल्या आहेत, हे विशेष!
नवे ‘पेग्यासस’ प्रकरण हे एक लक्षणीय उदाहरण आहे. एका व्यंगचित्रात दाखवले आहे की एक पत्नी आपल्या पतिराजांची अवहेलना करत म्हणते, “ तुमचा जन्म व्यर्थ गेला. अजून तुमचा फोन tap होत नाही म्हणजे काय?”

Group content visibility: 
Use group defaults

पेगॅसस हे प्रसिद्धीच्या हव्यासाचे प्रकरण कसे ते कळले नाही. त्यात कोणाला प्रसिद्धी हवी आहे?

या प्रकाराबद्दल काय म्हणाल?
himanta.jpg

अस काय करता, ऐनवेळी लवलीनाचा फोटो कुठून आणणार बॅनर वर लावायला. जो होता तो आणि पैसे ज्याने दिले त्याचा फोटो वापरला. Happy

पेगॅसस हे प्रसिद्धीच्या हव्यासाचे प्रकरण कसे ते मलाही कळले नाही.

किंबहुना पेगॅसस ला जितकी प्रसिद्धी मिळायला हवी होती तितकी मिळाली नाही. अमेरिकेत अशा कारणाने अध्यक्ष पायउतार होतात. पेगॅसस च्या बातम्या देऊ नका, त्या ऐवजी एखाद्या चमचमीत बॉलीवूडी स्कँडल मध्ये जनतेला गुंग ठेवा असे आदेश आहेत की काय शंका येते.

आत्ता २०२१ असलं तरी ऑलिम्पिक्स २०२० असंच नाव आहे.
पेगॅससचा प्रसिद्धीच्या हव्यासाशी संबंध कळला नाही.
बाकी पटलं.

थोडा पटला
आजच सकाळी बातम्यांमध्ये करिनाने करिष्मा बरोबर चॉकलेट केक खाल्ला आणि नंतर सोफ्यावर घोरत पडली या बातमीला तब्बल 5 मिनिटे फुटेज दिले होते Happy