एक होता अवचट - भाग १३

Submitted by सुर्या--- on 28 July, 2021 - 07:33

थोड्याच वेळात भुरकटराव आणि मीनाक्षीदेवी देखील अवचटच्या घरी पोहोचतात. पवळ्याची आई आणि शाम्भवी आश्चर्यचकित होतात. अवचटची आई त्या दोघांनाही ओळखते. परंतु आधी कधी जास्त बोलणं होत नसल्याने थोडं अडखळतच पाहुणचाराबद्दल विचारते.

अवचटची आई:- तुम्ही? मीनाक्षीदेवी आणि .... म्हणजे शाम्भवीचे आई-वडील ना? कसं येणं केलत? पाणी घेऊ का?
(एकामागून एक, प्रश्नांचा भडीमार सुरु झाला)
पवळ्याची आई, अवचटच्या आईला मदत करू लागते.

भुरकटराव:- (तब्येतीविषयी विचारणा करून झाल्यावर) अवचट दिसत नाही कुठे?
अवचटची आई:- कामावर गेलाय. काही काम होत का?
भुरकटराव:- काम तसं काही खास नाही. सहजच विचारलं.
पवळ्याची आई:- (मीनाक्षीदेवींना एका बाजूला घेऊन हळू आवाजात विचारू लागते.) काय ग मीने? अचानक कसं काय इकडे? सगळं ठीक आहे ना? भुरकटरावांना राग आला का, मी बोलल्याचं ?
मीनाक्षीदेवी:- नाही, तसं काही नाही. राग बीग काही नाही. शाम्भवी इकडे येताना दिसली, म्हणून आम्ही पण आलो.
पवळ्याची आई:- म्हणजे?
मीनाक्षीदेवी:- (डोळे मिचकावत)शाम्भवीला काय वाटतयं, त्याप्रमाणे ठरवता येईल.
पवळ्याची आई:- (एकदम excited होत, तोंडावर हात ठेवत) अय्या खर काय? खरंच? काय बोलतेस?

मीनाक्षीदेवी, पवळ्याच्या आईला शांत करते. इकडे या दोघींच्या अश्या खिदळण्याकडे शाम्भवी आणि अवचटची आई पाहत राहतात. भुरकटराव देखील घराची ठेवणं पाहून आनंदी होतात. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर विषय पुढे कसा घ्यायचा या कुचंबणेत असतानाच अवचटच्या आईला, अवचटचा फोने येतो. समोरून अवचट त्याच्या आईची चौकशी करत असतो.

अवचट:- हॅलो ... आई.. कशी आहेस आता? काही खाल्लं का?
अवचटची आई:- बरी आहे रे बाबा. जेवले मघाशीच. तू कधी येतोस घरी?
अवचट:- येईन तासाभरात. का ग?
अवचटची आई:- पाहुणे आले होते घरी.
अवचट:- कोण ग पाहुणे?
अवचटची आई:- शाम्भवी, तिचे आई-वडील आणि पवळ्याची आई.
अवचट:- शाम्भवी वगैरे? (आश्चर्यचकित होत). ठीक आहे, चल, ठेवतो मी. (अवचट फोने कट करतो. आणि विचारात पडतो, हे कसे अचानक आपल्याकडे)

तासाभरात, घाई-गडबडीत अवचट घरी पोहोचतो. अजूनही सर्व जण तेथेच थांबलेले असतात. अवचट हातावर हँडवॉश liquid घेतो. बाजूच्या खोलीजवळून बाथरूम मध्ये जातो. स्वच्छ अंघोळ करून मग बाहेर येतो. तोंडावर मास्क लावून सर्वांपासून लांब उभा राहून बोलू लागतो.

अवचट:- काय अण्णा? कस येणं केलत, आज अचानक?
नानी बऱ्या आहात ना. खूप दिवसांनी दिसता.
भुरकटराव:- तुझ्या आईबद्दल समजलं, म्हणून आलो त्यांना पाहायला.
मीनाक्षीदेवी:- हो ना.
पवळ्याची आई:- आणि तुलाही पाहायच होतच.
अवचट:- म्हणजे?
पवळ्याची आई:- खूप दिवस दिसला नाहीस ना, म्हणून बोलले. (सर्व जण हसतात)
अवचट:- चहा वगैरे काही?
भुरकटराव:- तू बैस शांत. चहा वगैरे घेतलाय. पुढे काय कस करणार मग?
अवचट:- म्हणजे? कशाबद्दल विचारता?
भुरकटराव:- हेच. तुझं काम धंद्याचं.
अवचट:-अण्णा सध्यातरी Lockdown उठत नाही, तोवर ऍम्ब्युलन्स आहेच. नंतर पुन्हा आपला दुकान सुरु करेनच.

भुरकटराव:- पणं , ऍम्ब्युलन्स वर रिस्क पण आहेच ना? शिवाय असा दिवसभर बाहेर राहशील तर घरात कोण लक्ष देणार?
पवळ्याची आई:- हो रे, तुझ्या आईला आता काही होत नाही.
अवचटची आई:- त्याला कधी कळणार कुणास ठाऊक?
पवळ्याची आई:- अरे तुझ्या लग्नाबद्दल विचारतात, भुरकटराव.
अवचट:- (लाजतच) बघू अण्णा. सध्याची परिस्थिती निवळल्यावर करेन विचार. माझ्यासारख्याला कोण देणार ना मुलगी?
भुरकटराव:- का कोण नाही देणार? तू सांग, आपण जाऊ विचारायला.

अवचट गोंधळून जातो, घाबरतो. काय बोलावं त्याला काहीच सुचत नाही. शाम्भवी मनातल्या मनात घाबरली होतीच पण या परिस्थितीत ती पण अवचट वर हसत होती. अवचट मधेच पवळ्याच्या आईकडे पाहायचा, पुन्हा शाम्भवीकडे मग भुरकटरावांकडे. अवचटची आईदेखील गोंधळली होती. तिला वाटले, अवचटने बाहेर मुलगी पाहिली आहे आणि तो तिच्यापासून लपवतो आहे.
भुरकटरावांनी अनेक हिंट देण्याचा प्रयत्न करूनही विषय कुणाकडूनही पुढे जातच नव्हता. द्विधा मनस्थितीत गुंतून राहिलेला विषय आज पुढे जात नाही हे ओळखून पवळ्याची आई, मीनाक्षीदेवींना खुणावते. शेवटी मीनाक्षीदेवी भुरकटरावांना खुणावून खात्री करतात आणि पवळ्याच्या आईला मान हलवून, डोळे बंद करून होकार देतात, तस पवळ्याची आई स्पष्टच विचारते, "अवचट, तुला शाम्भवी कशी वाटते?
अवचट गारद होतो. काय बोलावं काहीच सुचत नाही.

शेवटी शाम्भवीच्या चेहऱ्यावरील लाजून हसणे, मीनाक्षीदेवी आणि भुरकटरावांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि पवळ्याच्या आईच्या मिश्किल हसण्याने चित्र स्पष्ट होते. तो आनंदाने नाचू लागतो. मागे वळून शाम्भवीच्या डोळ्यात डोळे घालून पाहू लागतो.

समाप्त

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

वाचकांच्या पसंतीत उतरली नाही कथा त्यामुळे आवरती घेतली>> माफ करा, पण <<थोड्याच वेळात भुरकटराव आणि मीनाक्षीदेवी देखील अवचटच्या घरी पोहोचतात. पवळ्याची आई आणि शाम्भवी आश्चर्यचकित होतात.>> यामध्ये 'पोहोतात', 'होतात' या फॉरमॅटमुळे कथेची लय बिघडली असे मला तरी वाटले. बाकी कथा उत्तम सुरु होती.

छान होती कथा. अजून वाढवली असती तरी चालली असती. नेहमी प्रतिसाद देणं होत नाही याचा अर्थ असा नाही कि वाचकांना कथा आवडली नाही. पण आम्ही वाचकांनी पण आवर्जून प्रतिसाद दिला पाहिजे हे जाणवतं आहे. लिहीत रहा.

छान होती कथा. अजून वाढवली असती तरी चालली असती. नेहमी प्रतिसाद देणं होत नाही याचा अर्थ असा नाही कि वाचकांना कथा आवडली नाही. पण आम्ही वाचकांनी पण आवर्जून प्रतिसाद दिला पाहिजे हे जाणवतं आहे. लिहीत रहा. >>>> +१