रोहन प्रकाशन, पुणे यांच्या website वर प्रकाशित होणारं सदर

Submitted by Theurbannomad on 27 July, 2021 - 04:12

नमस्कार मायबोलीकर,
रोहन प्रकाशन, पुणे यांच्या नव्या कोऱ्या website वर माझ्या अरबस्तानच्या भटकंतीवरचे लेख प्रकाशित होत आहेत. हे सदर रोहन प्रकाशन यांनी माझ्या विनंतीप्रमाणे विनामूल्य उपलब्ध करून दिलेलं आहे. तुम्हा सगळ्यांना इतकीच विनंती आहे, की हे website ला भेट देऊन माझं लिखाण वाचा, त्यावर website वरच प्रतिक्रिया द्या आणि काही सूचना करायच्या असल्यास हक्काने करा. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची अपेक्षा आहे!

आशिष काळकर

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"अबू धाबी अमिरातीमध्ये एक असं बेटसुद्धा अस्तित्वात आहे, जिथे आजही या भागातल्या प्राचीन काळच्या जीवनपद्धतीच्या खाणाखुणा दिसू शकतील" ओमरने सांगितलं. मी चकित झालो... हे बेट कुठलं, ते कुठे आहे आणि त्याची वैशिष्ट्यं कोणती, हे जाणून घेण्यासाठी वाचा हा लेख - https://rohanprakashan.com/category/maifal-exclusive/

अरब अमिरातींमधली वेगळी, फारशी ठाऊक नसलेली स्थळं 'दाखवणारी' लेखमालिका : अरबस्तानच्या अनवट वाटा, लेखक - आशिष काळकर

खूप छान. रोहन प्रकाशकांचे हार्दिक आभार. यूएई बद्दल फारशी माहीत नसलेली माहिती वाचायला मिळणार.

अभिनंदन.
<<रोहन प्रकाशकांचे हार्दिक आभार. यूएई बद्दल फारशी माहीत नसलेली माहिती वाचायला मिळणार>>
+100

कृपया website वर लेख वाचल्यावर प्रतिक्रिया नक्की नोंदवा, ही नम्र विनंती. माझा वाचकवर्ग वाढला तर पुढे अधिकाधिक लिखाण मला रोहन प्रकाशनाच्या मार्फत लोकांपुढे आणणं शक्य होईल.

प्रतिक्रिया नोंदवली. पण मॉडरेशनला गेली. काही ब्लॉग साईटसवर असा स्पीडब्रेकर नसतो.

स्थापत्यकौशल्यादृष्टीने बर्जिलचा उपयोग कळला तसेच इतरही काही यावे. अडोबि म्हणजे मातीचे घर ते दुमजली कसे करतात? तिथे वाळू आहे का मऊ माती?

भारतीय लोक जे तिकडे नोकरीनिमित्त राहातात त्यांचा प्रत्यक्ष अरब लोक, गावं आणि विशेषत: गावातल्या स्थानिक अरब जनतेशी संबंध येत नाही. ते अरब ( विशेषत: सामान्य )काय करतात वगैरे जाणून घ्यायला आवडेल.