विलाप

Submitted by सामो on 26 July, 2021 - 10:06

अन्यत्र पूर्वप्रकाशित
-----------------------------------------------------------------
जोपर्यंत एखादा क्षण, आपल्याबरोबर घटलेली तीव्र दुर्दैवी घटना resolve होत नाही तोवर ती तुटकी, कुरुप, unintegrated अशी आपल्याला छळत रहाते. त्यातून मग ते साधण्याकरता कोणी देवदेव करतं तर कोणी गुन्हेगारीची कास धरतं. असा माझा कयास आहे. तो खरा असणारच असा हट्ट नाही. पण मानवी मनातील , तुमच्या माझ्या अशाच तुटक्याफुटक्या पैलूंना एकसंध करण्याकरता लिहीलेले/सुचलेले हे मनोगत.
___________
हे सखे आता हा विलाप सोड. जे व्हायचे ते होउन गेले. प्रकाशाचा नाचरा कण न कण अंगोपांगी खेळवल्यानंतर आता दाटून आलेल्या अंधाराच्या साम्राज्यने तुला भिवावावे यात नवल ते काय! पहाट जितकी उजळ होती, दिवस जितका तेजोमय होता , तेवढीच संध्याकाळ हुरहूर लावते हे तुला ठाउक नव्हते काय? "रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषा:काल " या ओळी जितक्या खर्‍या तितकेच दे देखील खरे - "पुनरपि जननं पुनरपि मरणं". जिवंतपण भोगलेल्या तुला हा मुर्दाड विजनवास सहन होत नाही. सर्व आशा कोळपलेल्या तुला वेगळ्या भूमिकांमध्ये अर्थ शोधावा लागेल. नपेक्षा मी मरुनच का जाउ नये हा प्रश्न तुला अनेकदा भेडसावेल. ही तर फक्त सुरुवात आहे. इतक्यात कुठे गठळलीस? अजून तर पुढे अंधार अधिकाधिक वाढत जाणार. तुझी चुकी नव्हती. आणि आता असली तरी काय, नसली तरी काय , सृष्टीचक्र परत फिरवता येणारच नाही हेच सत्य नव्हे काय?
.

To every thing there is a season,
and a time to every purpose under the heaven:
A time to be born, and a time to die;
a time to plant, and a time to pluck up that which is planted;
A time to kill, and a time to heal;
a time to break down, and a time to build up

.
ऋतुचक्राचे आस हे फिरताच रहाणार मनुष्य सुख-दु::खाच्या गटांगळ्या खातच रहाणार.. यशाने हुरळून जाउ नये आणि अपयशाने खचून जाउ नये हा धडा जरी शिकली असशील तरी भरून पावलीस.
थांब जाण्यापूर्वी या ओळी ऐक -
.

वह प्रदीप जो दीख रहा है झिलमिल दूर नहीं है;
थक कर बैठ गये क्या भाई मन्जिल दूर नहीं है।
चिंगारी बन गयी लहू की बूंद गिरी जो पग से;
चमक रहे पीछे मुड़ देखो चरण-चिह्न जगमग से।
बाकी होश तभी तक, जब तक जलता तूर नहीं है;
थक कर बैठ गये क्या भाई मन्जिल दूर नहीं है।

.
तुझे धडे तूच गिरवायचेस, तुझे उन्माद जसे अन्य कोणी ना जाणू शकते ना त्यांची ऊंची गाठू शकते तसेच ना तुझे काळेकुट्ट मूड कोणाच्या लक्षात येऊ शकतात. या दोन्ही गोष्टी फक्त तुझ्यात आणि माझ्यात. मी आहे ना अंतापर्यंत आणि कदाचित अंताच्याही पलीकडे प्रवासात साथ देणारा तुझा सांगाती - तुझे मन. माझ्याशी गूजगोष्टी कर. मला सांग प्रत्येक ओरखडा. मी साक्षी आहे. मी तुला जाणून घेऊ शकतो. मी तुला विसावा देऊ शकतो. तूच श्रद्धेचा खुराक देऊन पोसलेला मी, वेळेवर तुझ्यापाठी ऊभा राहू शकतो. केवळ मीच.
.
सोड हा जगाचा नाद. सोड त्याची संगत जे आज असते अन पुढल्या क्षणी अळवावरच्या थेंबासम विरुन जाते. किती नश्वर किती चंचल किती बेईमान! का ध्यास घेतेस अशा नश्वरतेचा. या नश्वरतेकडून ईश्वरतेकडे नेण्याचा राजमार्ग मी दाखवेन.
.

दिशा दीप्त हो उठी प्राप्त कर पुण्य-प्रकाश तुम्हारा;
लिखा जा चुका अनल-अक्षरों में इतिहास तुम्हारा।
जिस मिट्टी ने लहू पिया, वह फूल खिलाएगी ही;
अम्बर पर घन बन छाएगा ही उच्छ्वास तुम्हारा।
और अधिक ले जाँच, देवता इतना क्रूर नहीं है;
थककर बैठ गये क्या भाई! मंज़िल दूर नहीं है।

Group content visibility: 
Public - accessible to all site users