माझ्या अंगणातली बाग

Submitted by अनुश्री अविरज on 22 July, 2021 - 11:48

*माझ्या अंगणातली बाग*
(अनुश्री अविराज)
माझं लहानपण हे एका खेडेगावात गेलं. आमच्या घरही अगदी जुन्या पद्धतीचं होतं. स्वयंपाक घर, मग मधली खोली, सोपा आणि त्याच्यानंतर भलमोठा अंगण. मी तेव्हा ३री-४थीला असेन. शाळा सुटल्यानंतर शेजारच्या बऱ्याच मुली आमच्या अंगणात खेळायला यायच्या. माझं मात्र घर झाडून काढणे, कपड्यांच्या घड्या घालने, चहा बनवणे, भात शिजवणे अशी कामं चालूच असायची. आता सगळी कामं झाली की त्या मुलींबरोबर खेळायला जायचं असं मी ठरवलं. काम उरकुन अंगणात आले तर संध्याकाळची रात्र होऊन गेली होती आणि अंधार पडल्यामुळे सर्व मुली आपल्या आपल्या घरी गेल्या होत्या. मग ठरवलं, आता उद्या आपण पटकन काम उरकायची म्हणजे त्यांच्याबरोबर खेळायला मिळेल. दुसऱ्या दिवशी मुली अंगणात खेळायला आल्या पण माझं काम काही उरकलं नाही आणि तेच झालं. आता तर मला अगदी रडूच कोसळलं होतं. रोज इकडे माझी कामं आणि तिकडे मुलीचं खेळणं चालूच असायचं. त्या मुलींचे हसतानाचे, खेळ खेळतानाचे, तुझं माझं करतानाचे असे अनेक आवाज माझ्या कानी पडाचे आणि आतल्या आत मी हॆळायला न मिळाल्याने आतल्या आत खलात राहीचे. आणखीनच दुःखी होऊन जायचे. हळू हळू मला हे अंगणाच नसत तर किती बर झालं असत कमीत कमी खेळायला मिळत नाही याची रोज रोज जाणीव तरी झाली नस्ती. आस जरी वाटत असाल तरी रोज रोज ते दृश्य समोर असायचंच पुढे पुढे तर मला त्या मुलींचा, माझा कामाचा आणि शेवटी माझाच तिरस्कार वाटू लागला.

अशीच एक दोन वर्ष निघून गेले आणि एक दिवशी शनिवार होता आणि शाळेतल्या बाईंनी शाळेच्या छोट्या बागेत साफसफाई करायला सांगितली. साफसफाई करता करता माझ्या डोक्यात आल, आपल्या पण घर पुढे अंगणात भरपूर जागा आहे आणि मला आमच्या अंगणात झाड लावायची कल्पना सुचली. मी ती वडिलांजवळ व्यक्त केली. वडिलांचा सृजनशीलतेला पाठिंबा असल्यामुळे त्यांनी लगेच होकार दिला आणि त्या रविवारी आम्ही अंगणाच्या एका कोपऱ्यात खोदकाम सुद्धा केलं. मग मी आणि माझ्या बहिणीने शाळेच्या बागेतून चीनी गुलाब, सदाफुली अशी दोन चार फुलांची रोपे घेऊन आलो आणि त्या कोपऱ्यात लावली. सकाळची बरीच काम अंगणातच असायची. आंघोळीला पाणी तापवणे, पाणी भरणे, कपडे धुणे या सगळ्या बरोबर झाडाला पाणी घालणे आणि त्यांची निगा राखणे अगदी सहज होऊन जायचं.

उठल्या उठल्या पहिल्यांदा झाड बघणे हा छंदच जडला होता आता. शाळेतून घरी आल्यानंतर पहिल्यांदा कोपर्‍यातली झाड बघायचा नियम चुकायचा नाही आणि झाड बघुन मग मी कामाला लागायचे. त्या मुली अंगणात खेळत असायच्याच, पण आता त्यांचा आवाज माझ्या कानापर्यंत पोचत नाही कारण माझ्या डोक्यात हल्ली कोणत्या झाडाला फुल येईल, कोणत्या झाडाला पान आलं, कोणत्या झाडाला फुल अली आहेत, कोणत नवीन रोपटं लावता येईल या विचारात गुंग असायचे. अस मनातिला आवाज आपल्याशी एकरूप होणार असले की बाहेरच्या दंगा गोंगाट आत शिरत नाही. आता आम्ही कोणाकडे गेलं की माझं आणि बहिणीच लक्ष त्यांच्या बागेकडे, अंगणातल्या झाडांकडे असायच. नवीन काही दिसलं की लगेच विचारायची एक संधी आम्ही सोडयाचो नाही. असं करत करत आमच्या बागेत बरीच झाड लावली. दिवसेंदिवस आमची बाग फक्त आकाशाकडे वाढत नव्हती तर कोपराच्या दोन्ही बाजूनेही वाढत चालेली. आता शेजारच्या मुलींशी कधी भांडण झालं तर त्याचा राग आमच्या बागेवरती निघायचा. तेवढी एकच तर आम्ही स्वतः कष्टाने वाढवलेली उघड्यावरची आमची संपत्ती होती. कधी कधी शेजाऱ्याच्या शेळी, गाई, म्हशी येता-जाता आमच्या बागेच्या फुलझाडांची चव चाखायचे. मला आणि माझ्या बहिणीला दोन्ही प्रसंगात खूप वाईट वाटायचं कारण बागेतला प्रत्येक पानाचे वाढताना, फुलताना, बहरताना आम्ही साक्षीदार होतो.
लोक सत्यनारायण किव्हा आणखी कोणत्या पूजेला आमच्याकडे फुल मागायला यायची आणि आम्ही खुशी खुशी त्यांना द्यायचोही. आमच्या अंगणातल्या बागेची माहिती बऱ्याच लोकांना मिळाली आणि बरीच माणसे आमच्याकडे फुल घेण्यासाठी यायला लागली, हे बघून मला खूप आनंद व्हायचा.ज्या अंगणाचा मला तिरस्कार वाटत दुःखच कारण होत त्याच अंगणतली बाग आज माझ्या आनंदच,कौतुकच कारण होती . अश्या प्रकारे ती बाग फक्त अंगणातच बहरली नाही तर माझं मन पण बहरुन गेली. बागेच्या विचारत मी कामाचा ताण विसरून जायचं आणि काही तरी नवनिमिर्ती करतोय म्हणून स्वतःवर हि प्रेम करू लागले.
आयुष्य हे असंच असतं ना बरीच काम आपल्याला इच्छा नसताना करावी लागतात पण मनाच्या कोपऱ्यात आपण काही तरी नविन करायच ठरवल, छंद जोपासला कि आपण मन प्रसन्न राहत आणि मग नको असलेल्या कामाचा ताण वाटत नाही. काही वेळा आपल्या छंद, नवनानिमिर्तीच्या झाडाला सुदर फुलं येतात तर काही सुदर मोहक सुगंध देऊन संपूर्ण वातावरणच मंत्रमुगड करतात. आठवा एखादा प्रसंग जिथे मैत्रिणीला गाण्यची आवड आहे आणि तिच्या गाण्यात सर्व लोक तल्लीन झालेत.

मी माझ्या अंगणातल्या बागे कडून बरंच काही शिकले आणि मनाच्या कोपऱ्यात छंद जोपासले. याच्यामुळे कामाचा तणाव वाटला नाही. बघाना लेखन हे एक त्याच बागेतले झाड आणि आजचा लेख झाडावरचं फुल. ज्याने मलाही सुगंध दिला आणि भौतेक तुम्हालाही. चला तर मग काय आहे तुमच्या अंगणातल्या बागेत, मन प्रसंन्न करणारी हिरवळ, मनमोहक फुल कि मंत्रमुग्ध करणारा सुवास. नक्की कळवा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान, आवडले लिखाण.
लहानपणी आम्ही पहिल्या मजल्यावर, व्हरांड्यात बाग केली होती. फुलझाडे, सोबत कारली, वांगी, भेंडी सुद्धा.

छान

>>>>मनातिला आवाज आपल्याशी एकरूप होणार असले की बाहेरच्या दंगा गोंगाट आत शिरत नाही.
बरोब्बर!
>>>>तेवढी एकच तर आम्ही स्वतः कष्टाने वाढवलेली उघड्यावरची आमची संपत्ती होती.
वाह!

>>>>सुंदर आठवणी आणि संदेश. +१