तुझे लहरी वागणे

Submitted by स्वरुप on 17 July, 2021 - 11:42

कधी ओळखीचे हसू; कधी कोरासा चेहरा
कधी खळीत लाजणे; कधी आठ्यांचा पसारा

कधी लाविते पाल्हाळ; कधी नि:शब्द उसासा
कधी गुंफण बोटांची: कधी दुरावा उगासा

कधी मधाळ आर्जवे; कधी अबोल अबोला
कधी खट्याळ कटाक्ष; कधी अश्रू एक ओला

कसे लावावे मी अर्थ; कसा ठेवू भरवसा
तुझे लहरी वागणे; माझा जीव कसनुसा

स्वरुप कुलकर्णी

Group content visibility: 
Use group defaults

छान कविता...
अजून थोडी refine करता येईल...

छान