तो !

Submitted by _आदित्य_ on 16 July, 2021 - 04:57

तो सांज सावळी क्षितिजावरती भिरभिरणारी
तो रात्र आंधळी डोळ्यांवरती थरथरणारी
तो शब्द सुगंधित कवितेमधूनी दरवळणारा
तो सूर आनंदित ह्रदयामध्ये विरघळणारा

तो अश्रू हळवा पापणकाठी विसावलेला
तो श्वास मोकळा उराउराशी सुखावलेला
तो स्वप्न निराळे तनामनाला पछाडणारे
तो घन झरणारे, वीज होऊनी कडाडणारे

तो रहस्य अवघे कधी कुणा ना उलगडलेले
तो अर्थ जीवना कसे कसे अन किती दिलेले
तो चित्र वेगळे भगवंताने रंगवलेले
तो गीत मधुर जे ऐकताक्षणी माझे झाले

... आदित्य

Group content visibility: 
Use group defaults