नवीन कार

Submitted by समीप१ on 13 July, 2021 - 07:27

नवीन कार घेण्यासाठी मार्गदर्शन हवे आहे

कुटुंबासाठी नवीन कार घेण्याचा विचार चालू आहे . बजेट ८ ते ९ लाखापर्यंत . टाटा कार सुरक्षित असतात पण मारुती चे मायलेज चांगले असते असे मित्रांकडून कळते. ह्युंदाई चा अनुभव नाही. सीएनजी ची सुरक्षितता कमी असते का? सामान ठेवायची जागा सीएनजी टाकीमुळे खूप कमी होते का? आपल्यापैकी कुणी नुकतीच गाडी घेतली असेल तर कृपया गाडी खरेदीचा अनुभव सांगावा . नवीन गाडी लाँच बद्दल माहिती असेल तर त्याचीही चर्चा करता येईल . धन्यवाद

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टाटा कार सुरक्षित असतात पण मारुती चे मायलेज चांगले असते असे मित्रांकडून कळते.>> सुरक्षा महत्वाची की मायलेज?तुम्हीच उत्तर द्या.

पुणे मध्ये सेकंड हॅन्ड वॅगन R किंवा hyundai सँट्रो साठी कोणी चांगला एजन्ट माहित आहे का ?
त्या शिवाय दुसरे कोणत्या प्रकारे घेता येईल ? olx आणि कार साईट्स पाहून झाली आहेत पण अनुभव फारसा चांगला नाही , बऱ्याच जाहिराती ह्या एजन्ट लोकांच्या दिसल्या

सेकंड हॅन्ड वॅगन R >>> त्यापेक्षा नवीन wagon R बघा. बाकी details माहिती नाही पण looks छान आहेत. Legspace bharpoor .

Tata शेवटी Tata आहे. आम्ही 6 महिन्यापूर्वी घेतली. Hyundai , Honda , Maruti, Kia सगळ्या बघून झाल्या. शेवटी TATA च घेतली.
सुरक्षा महत्वाची की मायलेज?तुम्हीच उत्तर द्या. >>> अगदी अगदी.

नवीन wagon R बघा.-++११
Cng चालत असेल तर तेच घ्या
किफायतशीर आहे

सर्वांचे धन्यवाद. सुरक्षिततेमुळे टाटा कडेच कल आहे. टाटाच्या टिआगो / अल्ट्रोज या मॉडेल चा विचार आहे. नेक्सन , मारुती एर्टिगा हे थोडे महाग पण चांगले ओपशन आहेत. एर्टिगाला प्रतीक्षा देखील करावी लागते असे कळले. आपला वापरण्याचा अनुभव असल्यास कृपया शेयर करा.

मोठी गाडी हवी असेल तर ertiga भारीये
Price range तसेच comfort वगैरे च्या दृष्टीने
Cng सुद्धा आहे.

Saftey च्या बाबतीत भारतात तरी tata best आहे.
Rating जबरदस्त आहे. मारुती ची गाडी आणि tata ची गाडी compare करून पहा. मजबूत कोणती लगेच समजेल.

Altroz पण छान आहे मला आवडली, फक्त avg कमी म्हणून घेतली नाही आम्ही (budget ही वाढवावे लागले असते )

खालील प्रश्नांची उत्तरे मिळाल्यास गाडी निवडणे सोपे जाईल,
1. बजेट (वर ८-९ लाख रेंज दिली आहे पण थोडे कमी जास्त चालणार आहे का?)
2. रोजचा वापर साधारण किती किमी असेल?
3. गाडी स्वतः चालविणार की ड्रायव्हर असेल?( शॉफेर ड्रीवन की सेल्फ ड्रीवन)
4. वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किमतीनी किती फरक पडणार आहे?
5. Driving Pleasure हे कितपत लागू आहे?
6. CNG गाड्यांना पिक अप आणि टॉर्क कमी असतो, घाटातून वगैरे रोजचा प्रवास असल्यास त्रास होऊ शकतो आणि long term reliability कमी असते. CNG गाडी घेत असल्यास कंपनी Warranty किती दिवसाची आहे हे तपासून पाहावे तसेच Extended warranty उपलब्ध असल्यास थोडे जास्त पैसे देऊन घ्यावी. Insurance ही ५ वर्षांचा घ्यावा.
7. फीचर्स किती महत्वाचे आहेत? ( Infotainment system, Reverse Camera, Climate Control, Auto- Headlamps and wipers etc.)
8. गाडी किती वर्षे स्वतःकडे ठेवणार आहात?
एकूण तुमच्या बजेट मध्ये Tata Nexon Patrol XE version चांगले वाटत आहे. त्याची किंमत ८.५० लाख ( पुणे आणि मुंबई) आहे. carwale.com वर तुमच्या भागातली किंमत बघू शकता. carwale बऱ्या पैकी रोज data update करतात. Nexon का त्याची कारणे खाली देत आहे,
1. Nexon गाडीला NCAP रेटिंग 5 star आहे जे इतर कोणत्याही भारतीय गाडीला नाही. शेवटी तुमची आणि परिवाराची सुरक्षितता सर्वात महत्वाची.
https://www.globalncap.org/news/global-ncaps-first-five-star-car-in-india-the-tata-nexon
2. उत्तम विश्वसनीयता. गाडी २०१७ मध्ये लाँच झाली आणि तेंव्हापासून गाडी बद्दल ग्राहक तक्रारी फार कमी आहेत. मेंटेनन्स कॉस्ट फार कमी आहे.
3. कमी किंमतीत प्रीमियम लूक.
4. गाडीचे मायलेज १६-२२ प्रती लिटर आहे. शहरात लोकांना साधारण १६ आणि हायवे वर २० पर्यंत मिळते.
5. उत्तम बूट स्पेस. लांबच्या प्रवासासाठी खूप उपयोगी.

गो फॉर नेक्सॉन/ आल्ट्रोज
नेक्सॉन चा अ‍ॅक्सिडंट मधील सुरक्षेचा रेकॉर्ड अतिशय चांगला आहे. (गेल्या २ वर्षातील अनेक बातम्या वाचून). गाडी उलटीपालटी झाली, दरीत
(छोट्या) पडली तरी आतली माणसं जिवंत.

टाटा डिलरशिप/सर्व्हिसिंग मधली माणसे मात्र थोडी अनपॉलिशड असतात.त्याला नाईलाज आहे.
पण हायवे ड्रायव्हिंग जास्त होणार असल्यास नेक्सॉन घ्याच. सिटी ड्राईव्ह्/सर्व्हिस सेंटर ची विशाल अव्हेलेबिलिटी हे मुद्दे असल्यास गो फॉर मारुती.

>> टाटा कार सुरक्षित असतात पण मारुती चे मायलेज चांगले

सुरक्षित म्हणजे नक्की कोणत्या दृष्टीने व काय अपेक्षा आहेत? कारण मी गेली पंधरा ते वीस वर्षे मारुती च्या वेगवेगळ्या गाड्या वापरल्या मला असुरक्षित कधीच नाही वाटले. हो मायलेज नक्कीच चांगले. मारुतीची मला जाणवलेली एकच नकारात्मक गोष्ट म्हणजे उंची कमी (ग्राउंड क्लिअरन्स) आहे इतर कार च्या तुलनेत. पण मला वाटते नवीन मोडेल्स मध्ये वाढवली आहे (ऐकीव माहिती).

नवीन दहा लाखाच्या पुढची कोणतीही कार घेऊ नये. हे पैसे कुठे तरी गुंतवले तर त्याचे पैसे वाढत राहतील. नवीन कार तुम्ही १५ वर्षांसाठी वापरू शकाल. त्यानंतर जर रजिस्ट्रेशन रिन्यू केलं (जे आत्ता अव्वाच्या सव्वा फीस घेऊन केलं जातंय आणि दर वर्षी वाढवलं जाईल) तर अजून फक्त ५ वर्षे, ही गाडी घेण्यासाठीचा हप्ता किमान १७,००० ते २०,००० रूपये दरमहा होईल. इन्शुरन्स दरवर्षी दीड दोन लाखाच्या घरात जाईल. एकूण लाईफ मधला मेन्टेनन्स आणि रिपेअरचा खर्च १ ते २ लाखापर्यंत जाऊ शकतो. थोडक्यात महिना २५,००० रूपये खर्च कारसाठी गृहीत धरावा. ड्रायव्हर ठेवला तर वेगळा खर्च. आणि नंतर रीसेल व्हॅल्यू १५ वर्षाची मुदत जसजशी जवळ येईल तसतशी कमी कमी होत जाईल. १५ व्या वर्षी ग्राहक फुकटात सुद्धा मिळणार नाही.

अशा परिस्थितीत ऊबेर / ओला शिवाय पर्याय राहणार नाही. बॅटरीच्या कारलाही पुढे मागे असेच खर्च येतील. आत्ता प्रमोशन साठी सवलती देतंय सरकार. पण एकदा बॅटरीच्या कार्सचं जाळं विस्तारलं, चार्जिंग स्टेशन्सचं जाळं सुरू झालं की चार्जिंगसाठीच्या वीजेला कमर्शियल दर लागतील. सध्याच वीजेचा वापर जास्त आहे. सगळं वाहन क्षेत्र वीजेवर गेल्यावर अतिरिक्त वीज आणणार कुठून ? त्यासाठी अदानी साहेबांना कमर्शिअल अटींवर वीजनिर्मिती करा म्हणून गळ घालावी लागेल. त्याचे पैसे ते वसूल करतील. म्हणजे हा पर्याय भविष्यात स्वस्त अजिबात होणार नाही.

Nexon गाडीला NCAP रेटिंग 5 star आहे जे इतर कोणत्याही भारतीय गाडीला नाही.
>>>
एक्सयूव्ही ३०० : ५ स्टार
अल्ट्रोज : ५ स्टार

अशा परिस्थितीत ऊबेर / ओला शिवाय पर्याय राहणार नाही.
>>
असाच विचार करून नोव्हेंबर २०१६ ते ऑक्टोबर २०१७ रोजच्या ऑफिस ट्रॅव्हलसाठी (१२ किमी वन वे) ओला, ऊबर, यूटू कॅब्ज वापरल्या.
सुरुवातीला @१८० रु. च्या आसपास असणारे दर शेवटी @३५०-४०० ला पोचले होते.
सुरुवातीला २ मिनिटात मिळणारी कॅब वर्षानंतर सुमारे तासाभराच्या (कधी कधी दोन तासावर) प्रतिक्षेनी मिळायला लागली.
त्यात ड्रायव्हर्सचे नखरे : डेस्टिनेशन विचारू न ट्रिप कॅन्सल करणे, ट्रिप नंतर जीपीएस फेल्युअरचं कारण देऊन फेअर वाढवणे, जवळच असूनही पीक अवर्समधे ट्रॅफिकचं भाडं असेल म्हणून ट्रिप्स अ‍ॅक्सेप्टच न करणे, ट्रिप अ‍ॅक्सेप्ट करूनही गाडीत झोपून रहाणे ई. ई. त्रासाला वैतागलो
टॅक्सी ही कधी मधीच्या प्रवासाला ठीक आहे
रोजच्या साठी स्वतःचीच गाडी बरी...

हो.
अँकी ते मात्र आहे. बरेचदा पेमेंट युपीआय किंवा ओला मनी आहे म्हणून ट्रिप रद्द करणे.मॅप लोकेशन चे पण फार गोंधळ होतात.

पीक पीरीयडमधे दर वाढलेले असतात हे मान्य. प्रतिक्षा कालावधी पण तासाचा आहे हे ही मान्य.
सध्या ऊबेर, ओला मधे ड्रायव्हरसच्या संपामुळे काही समस्या उद्भवलेल्या आहेत. पण ऊबेर स्वतःच्या इलेक्ट्रीक कार्स विकत घेणार आहेत. त्यानंतर समस्या राहणार नाहीत. ऊबेर स्वतःचे प्रॉडक्शन सुरू करणार अशीही बातमी ऐकलेली मध्यंतरी.

ऊबेर भारतात
https://www.youtube.com/watch?v=nUdkLuaeri8

ऊबेर एअर टॅक्सी
https://www.youtube.com/watch?v=nwZNe1rIo0s

कारण मी गेली पंधरा ते वीस वर्षे मारुती च्या वेगवेगळ्या गाड्या वापरल्या मला असुरक्षित कधीच नाही वाटले
>>
मारुतीच्या पूर्वीच्या गाड्या बर्‍याच चांगल्या होत्या (सध्यापेक्षा)
पण जेंव्हापासून त्यांनी हार्टेक प्लॅटफॉर्मवर गाड्या बनवायला सुरुवात केली तेंव्हापासून माशी शिंकली.
भारतात लोकं सेफ्टीपेक्षा मायलेजला प्राधान्य देतात हे पाहून त्यांनी गाडीचा पत्रा पातळ केला अन बरेच इतर पैंतरे वापरून गाडीचं वजन कमी केलं.
यामुळे गाड्या मायलेज जास्ती देतात, पण जरा धक्का लागला की लोळागोळा होतात.

मारूती आता हॅचबॅक्समधे बर्‍यापैकी कॉस्टकटिंग करते
उदा: नवीन वॅगन आरला टचस्क्रीन आहे, पण पुढचे, मागचे कुठलेच हेडरेस्ट अ‍ॅदजेस्ट होत नाहे. सीट्सही भरपूर पातळ झाल्या आहेत. पूर्वीच्या वॅगन आरमधे सीट्स बर्‍यापैकी काम्फर्टेबल होत्या, आताच्या बिल्कुल नाहीत.

ह्युंडई च्या गाड्याही फार जास्ती सेफ नाहीत पण फीचर्स अन बर्‍यापैकी कम्फर्टच्या जोरावर मारून नेतात.
टाटा आणि रेनो - निस्सानच्या नव्या गाड्या सेफ्टी मधे चांगल्या आहेत, पण आफ्टर सेल्स सर्विस बघून घ्याव्यात (घराजवळ सर्विस स्टेशन वगैरे)

येत्या काही महिन्यांमधे टाटा एचबीएक्स लाँच होईल
१२०० सीसी टर्बो अन नॉन टर्बो इंजिन्स आणि मॅन्युअल / एएमटी ऑप्शन्स असतील.
अल्ट्रोजलाही डीसीटी ऑटो गिअरबॉक्स मिळण्याची शक्यता आहे (नेक्सॉनलाही येईल, पण अल्ट्रोज नंतर)

पत्रा पातळ केला. बीएस ५ पासून सेफ्टी स्टँडर्ड अंतर्भूत झाले आहे. मायक्रो कॉर्‍युगेशन मुळे स्ट्रेन्ग्थ वाढते. (समोरासमोरच्या धडकीत नाही).

मारुती बलेनोचं NCAP रेटिंग ३ स्टार आहे, आणि Wagon R चं २. हां आता सुरक्षितता पेक्षा मायलेजला प्राधान्य असेल तर मारुती सर्वोत्तम.

सेफ्टी हवीय तर Land Rover घ्यावी Wink माइलेज हवे तर मारुतीला पर्याय नाहीच
--------
कम्फर्ट - लो मेन्टेनन्स - सर्विस क्वालिटी - मजबूतीसाठी टोयोटा खुप छान आणि नवीन वैगन आर घेण्यापेक्षा यूज्ड कार्स मध्ये इटिओस जी डी किंवा करोला अल्टिस डिझेल मॉडेल सर्व दृष्टीने फायदेशीर सौदा !

सिव्हिक मिळेल स्वस्त पण नंतरच्या मेन्टेनेन्सला भारी पड़ते आणि कोणी मारुती ठोकली काय होंडा ठोकली काय चुराडा ह्याच २चा होणार

महिंद्रा टोयोटा टाटा मध्ये पगड़ी५०साठी सर सलामत राहणार नं

Etios, altis आणि जुनी Civic सगळ्या discontinued गाड्या आहेत. साधा दरवाजाचा हँडल मोडला तर मिळवण्यासाठी मरमर करावी लागेल. जुन्या बाजाराच्या चकरा वाढतील.

क्रुपया मारूती घेऊ नये.
आठ लाखापेक्षा कमीच्या बजेटमध्ये मारूतीच्या चांगल्या गाड्या नाहीत.
मारूती चे Vitara breeza,s-cross ह्या गाड्या चांगल्या आहेत पण बजेट जास्त आहे थोडं
तुम्ही हे पर्याय पाहु शकता बजेटमधे.सेफ्टी प्रायोरिटी असेल आणि मायलेज मधे थोडे कॉम्प्रमाईज चालत असेल तर.
VW polo, Tata altroz, Ford free style, Nexon, I-20.

हा बहुधक अपवादात्मक प्रसंग असावा असे मानू.
पण भारतातल्या युनिट मधल्या गाड्या मुद्दाम दुय्यम प्रकारे बनवल्या जात असतील तर कठीण आहे.(बातम्या आपल्याला जे दाखवतात ते आपण सत्याचं व्हर्जन मानतो.किंवा कदाचित हा डिफेक्ट लक्षात आल्यावर काही सुधारणा पण केल्या असतील.)
https://auto.hindustantimes.com/auto/cars/a-kia-seltos-splits-in-half-in...

फोर्ड aspire.. ncap 3.. दोनच varient आहेत, top मॉडेलला सहा airbag चा option आहे. मला पेट्रोल टॉप मॉडेल महाराष्ट्रात 9 लाखात पडली, एप्रिल महिन्यात घेतली. 4000+ किमी झालेत. 2500 km ची कोकण ट्रिप झाली, ड्रायव्हर जबरदस्त असल्याने जवळपास 18 चा ऍव्हरेज मिळाला. गाडीत बसल्यावर सुरक्षित वाटतं. 120 च्या स्पीडवर घेतलेला शार्प टर्न, तरी आतल्या कुणाला काहीच जाणवलं नाही (ड्रायव्हरच्या भाषेत: गाडी रस्त्याला चिपकुन चालते दादा, मस्त आहे, मुद्दामून पलटी करतो म्हटलं तरी होणार नाही ही गाडी). मजबूत पत्रा, जर्मन इंजिन, पॉवरफुल ac. मजेदार आहे गाडी

कोणत्या तरी राजकारण्याचा मुलाचा मृत्यू मर्सिडिझ मेबॅख (उच्चार चुकला असेल तर बरोबर करा) च्या अपघातात झाला होता.

सुरक्षा ही अपवादात्मक उदाहरणांवरुन नव्हे तर जास्तीत जास्त उदाहरणांवरून ठरवावी.

कोणत्या तरी राजकारण्याचा मुलाचा मृत्यू मर्सिडिझ मेबॅख (उच्चार चुकला असेल तर बरोबर करा) च्या अपघातात झाला होता.
हो.
नीम्स मधे आलेल्या उच्च वर्तुळात पार्टी करुन रात्री साधारण २:३० वाजता अतिशय मद्यधुंद अवस्थेत मला घरीच जायचय बॉडीगार्ड आणी ड्रायव्हर नाही म्हणत असताना व तिथे नीटनेटकं गेस्ट हाउस असताना एकटाच असा हट्ट करुन निघाला. मुंबई-आग्रा हायवेवर सावळदा फाट्याच्या जस्ट पुढे कंटेनरला ओव्हर्टेक करताना रस्त्यावरच्या दुभाजकाला कार ठोकली गेली असताना लॉक झालेला स्पीड २३० होता. इंजिन तुटुन बाहेर निघालेले, बेल्ट लावलेला नव्हता आणी मुख्य म्हणजे एअर बॅग ओपन झाल्या नव्हत्या.

टकाटा (Takata) एअर बॅग्जच्या काही बॅचेस मध्ये मध्यंतरी प्रॉब्लेम होता. मर्सिडीज, याग्वार, लँड रोव्हर, फोक्स वॅगन सगळ्यांनी गाड्या रिकॉल करून एअरबॅग्स बदलल्या होत्या.
२०1६ - २०१८.

पतंगराव कदम ह्यांन्चे सुपुत्र अभिजीत कदम ह्यांचा अ‍ॅक्सिडेंट सोलापुर पुणे रोडवरिल मोहोळ येथे मर्सिडिस अतिवेगात झाडाला धडकल्याने झाला व त्यात त्यांचा मृत्यु झाला.

टाटा नेक्सॉन ला सुद्धा सुरक्षित कार म्हणून पुरस्कार मिळालेला आहे. तिचे चार अपघात गेल्या वर्षी झाले. एक अपघात कोल्हापूर मुंबई महामार्गावर पुण्याजवळ आंबेगाव न-हे इथे नवले पुलावरून पडल्याने कार चेचून झाला. एक अपघात टँकरखाली आल्याने सर्वांचे मृत्यू होऊन झाला आणि एका अपघातात कार हायवे सोडून शेजारच्या खंदकात गाडी पलटी होऊन झाल्याने झाला.
सुरक्षेचे पॅरामीटर्स ठरलेले असतात. २३० च्या वेगात ठोकल्यावर कंपनी सुरक्षिततेची हमी घेते का ?

पतंगराव कदम यांच्या मुलाच्या अपघाताच्या संदर्भात इन्शुरन्स कंपनीने दिलेल्या अहवालात सीट बेल्ट लावला नसल्याने एअर बॅग्स उघडल्या नाहीत असे नमूद केले होते. आज कालच्या गाड्यांमध्ये ड्रायव्हरने सीट बेल्ट लावला नसल्यास सायरन बीप होत राहतो.
बाकी, नवले पुलावरून पडून पण गाडीला आणि आतमधल्या माणसांना काही होऊ नये अशी अपेक्षा असेल तर रणगाडाच घ्यावा. किंवा मग सरळ नवले पूल पाडून टाकावा.

२३० च्या वेगात ठोकल्यावर कंपनी सुरक्षिततेची हमी घेते का ?
ते ही आहेच म्हणा , पण एअरबॅगचे काय ?

एअरबॅग न उघडण्याची कारणे माहीत असतील तर त्यावर बोलता येईल. अंदाज करण्यात अर्थ नाही.
कंपनीचा फॉल्ट लक्षात आल्यावर कंपनीने त्या परत घेणे हे सुद्धा सुरक्षेशी तडजोड न करण्याचे लक्षण मानता येईल.
अर्थात गाडीच घेऊ नये हे माझे मूळ मत आहे.
सुरक्षेचा मुद्दा यासाठी मांडला आहे कि, सुरक्षा व्यक्तीसापेक्ष ठरत जाईल. तेव्हढे पैसे देणार का मग ? शेवटी प्रत्येक जण बजेटप्रमाणे तडजोड करतो. ज्यांना रात्री बेरात्री मेडीकल अर्जन्सी साठी कार अत्यावश्यक आहे त्यांनी सिटी कार घ्यावी. ज्यांना शक्य आहे त्यांनी रिक्षा, कॅब किंवा सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य द्यावे. यामुळे रहदारी आटोक्यात राहील, प्रदूषण कमी होईल आणि अपघात सुद्धा कमी होतील.

>> Submitted by अँकी नं.१ on 14 July, 2021 - 17:07

हि सगळी माहिती माझ्यासाठी नवीन आहे. खूप खूप धन्यवाद.

>> सुरक्षा व्यक्तीसापेक्ष ठरत जाईल
>> Submitted by शांत माणूस on 15 July, 2021 - 13:28

सहमत आहे. सुरक्षित म्हणून गणल्या गेलेल्या कारच्या भीषण अपघातात मृत्यू म्हटले कि मला सर्वप्रथम डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या मित्सुबिशी लान्सर ला २००४ साली झालेला भीषण अपघातच आठवतो. कारण तेंव्हा ती 'सुरक्षित कार' म्हणूनच प्रसिद्ध होती. ट्रकला ओव्हरटेक करत असताना समोरून वेगात आलेल्या एसटीला समोरून धडकली. कारचा वेग सुद्धा प्रचंड होता. तेंव्हा 'एअर बॅग्स उघडल्या नाहीत' हीच चर्चा झालेली आठवते. डॉ. जिचकार यांना बाह्य दुखापत फार झाली नव्हती पण 'कठीण पृष्ठभागावर जोरदार आदळल्याने फुफ्फुसांना तीव्र मार लागून त्यामुळे ह्र्दयविकाराचा झटका आला' असे काहीतरी विश्लेषण आले होते. एअर बॅग्स वेळेत उघडल्या असत्या तर ते वाचले असते अशी चर्चा होती तेंव्हा.

खूप वर्षांपूर्वी एकदा आमच्या कंपनीने हेल्मेट सक्ती केली, हेल्मेट नसेल तर बाईक आत येऊ द्यायची नाही, पार्क बाहेर करा.

तेव्हा एकाने सांगितले की कसली आलीय हेल्मेटने सुरक्षा? आमच्या एका मित्राचा भाऊ ऍक्सिडेंने गेला मोठा ट्रेलर डोक्यावरून गेला. हेल्मेटच चेपले. ते काढता आले नाही, हेल्मेट सकट क्रियकर्म करावे लागले.

तर या / अशा घटनेवरून हेल्मेट निरुपयोगी हा निष्कर्ष काढायचा की वापरणे हे न वापरणे अधिक सुरक्षा देते ज्याने त्याने ठरवावे.

एअरबॅग इंफ्लेट होणे हा सिरीयस प्रॉब्लेम आहे. त्यात लक्ष घालून ते सुधरवतील ही अपेक्षा. पण एअर बॅग ने जीव वाचले/दुखापत कमी झाली अशी उदाहरणे आहेत. एअरबॅग वापरणे सोडून देण्या पेक्षा काही केसेस मध्ये का उघडल्या नाहीत याचा अभ्यास करून दुरुस्ती करणे अधिक हितकारक ठरेल.

आणि अर्थात ज्यांना शहराबाहेर गाडी न्यायचीच नाही, गाडी चाळीस पन्नास पेक्षा जास्त वेगात जायची शक्यता नगण्य असेल तर सुरक्षेवर अधिक भर देऊन उपयोगी नाही. एअरबॅग नसलेली गाडी चालेल.

एअरबॅग मध्येही बरीच प्रगती झाली आहे.
पूर्वीच्या एअरबॅग फक्त फ्रंट अगदी हेड ऑन कोलिजन ला डिप्लॉय होत असतील (इतक्या इंग्लिश बद्दल माफी)
टकाटा एअरबॅग्स मध्ये एअरबॅग फुटून आतला खिळ्यासारखा भाग मानेला लागून लोक मेले. या लगेच रिकॉल केल्या.
तसेच एअरबॅग पुढून झालेल्या अपघाताला/झाडावर आपटण्याला सपोर्ट देणार. मागून एखाद्या मोठ्या वाहनाने धडक दिल्यास मागच्या लोकांना डिकी ची बॉडी सोडून बाकी प्रोटेक्शन नाही. ६०० फूट दरीत कार कोसळल्यास कितीही चांगली गाडी असो मृत्यू होणार.
हेल्मेट चिरडली जायचे/कश्याखाली आल्यावर हेल्मेट चा स्ट्रॅप तुटून ते निघून यायची उदाहरणे आहेत.पण तरीही प्रमाण कमी आणि वापरल्याने सुरक्षेचे प्रमाण जास्त आहे.
त्यातल्या त्यात मजबूत बॉडी, २ एअर बॅग आणि क्रॅश टेस्ट चे रेटिंग चांगली असलेली गाडी घ्यावी, बाकीचे देव आणि रत्यावर आजूबाजूला गाड्या चालवणार्‍यांच्या कृपेवर सोडून द्यावे.

टेक्नॉलॉजी कितीही आधुनिक असली (आणि प्रत्येक काळात ती त्या काळानुसार अत्याधुनिकच असते) तरी सुरक्षितता ही अखेर ज्या त्या व्यक्तीच्या जबाबदारपणावरच असते, असे मला म्हणायचे आहे. Safety still boils down ultimately to user's resposible behavior. याला अजूनही तितका प्रभावी पर्याय आलेला नाही. याचा अर्थ ती टेक्नॉलॉजीज कुचकामी आहेत किंवा वापरू नयेत असे नव्हे. पण त्या पूर्णपणे भरोसा ठेवण्यासारख्या सुद्धा नाहीत. उत्क्रांत होत आहेत अजूनही. बरेचदा ते नुसते Selling features म्हणून सुद्धा वापरतात.

गाडीचे वा अजून कुठलेही सेफ्टी फीचर्स हे आपण कितीही काळजी घेत असलो तरी अघटीत (unforeseen) घडल्यास काय, या साठी आहेत.

मी खूप सेफ चालवतो या म्हणण्याला काही अर्थ नाही, अनलेस तुम्ही इंजिन सेट करून घेतलय तीस च्या वर स्पीड जाणारच नाही असे.

Pages