प्रतिसादांचा मी भुकेला

Submitted by वीरु on 10 July, 2021 - 21:20

प्रतिसादांचा मी भुकेला

शब्दास शब्द जोडतो मी
त्यालाच कविता म्हणतो मी
दुनियेस शहाणपण शिकवतो मी
प्रतिसादांचा मी भुकेला..

शब्दास शब्द जोडुनी कविता जरी केली
प्रतिसादांची झोळी मात्र रितीच माझी राहिली
प्रतिसादांचा मी भुकेला..

किती करु कल्पना काव्य काही स्फुरेना
कविता म्हणजे लखलखती वीज
ही बातच मला उमजेना
प्रतिसादांचा मी भुकेला..

केला मी निर्धार
दुनियेस का डरावे,
आपणच करावी कविता
आपणच प्रतिसाद द्यावे
प्रतिसादांचा मी भुकेला..

(कविता लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न. याचे श्रेय अर्थातच‌ मायबोलीकराना. कुणाला दुखावण्याचा आजिबात हेतु नाही, दुखावले गेल्यास माफी असावी.
कुणाला चार ओळींची भर टाकायची असेल तर आपलीच कविता समजा. सूचनांचे आणि टीकेचेही मनापासुन स्वागत.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लय भारी वीरू पाजी
...
शब्दास शब्द जोडित न्यावे
तैसेचि येथे नाते असावे
वाद संकोच मत्सर टाळावे
इतुके भान सदा असावे
कोण कोणाचा हे न पहावे
विश्व बंधुत्वाचे प्रयास करावे
कविता असो की कथा कल्पना
प्रतिसाद सायासे निश्चित लिहावे

तैसेचि येथे नाते असावे
वाद संकोच मत्सर टाळावे
इतुके भान सदा असावे
कोण कोणाचा हे न पहावे
विश्व बंधुत्वाचे प्रयास करावे
कविता असो की कथा कल्पना
प्रतिसाद सायासे निश्चित लिहावे>>
वाह! मस्तच!!

लिहणाऱ्याने लिहीत जावे
वाचणाऱ्याने वाचत जावे
वाचता वाचता एक दिवस
लिहणाऱ्याचा डयूआयडी शोधावा
(हे "देणार्‍याने देत जावे.... " च्या धर्तीवर)

कविता लिहीताना भाग १ , भाग २ असे करून लिहीत जावे. सात आठ भागापर्यंत प्रतिसाद मिळणार नाहीत. मग मधेच अंतिमा भाग लिहून एक कविता टाकावी. एकदम प्रतिसाद येतात. नंतर सावकाश पुढचे भाग टाकावेत.

कविता म्हणजे लखलखती वीज>>> हे आवडलं वीरूजी...
कवीने केलेलं कमी शब्दांत बरचसं अर्थपूर्ण वर्णन म्हणजे कविता असं मला वाटते..
तुम्ही आता कविताही करायला लागलात .. छान..!!
पुढील लेखनास शुभेच्छा तुम्हांला..!!

शीर्षक छान से किंवा कुतूहल निर्माण करणारे हवे.
अन्यथा लोक धागा उघडतही नाहीत. शीर्षक कवितेची एखादी ओळच असावी असे नाही.
उदा. "विबासं" असे नाव दिले ते खूप लोक धागा उघडतील.
पण कविता पावसावर असेल.
मग विबासं नाव का दिले असे कुणीतरी विचारणारच.
पण लगेच उत्तर द्यायचे नाही. अजुन तसे काही प्रतिसाद येतात, त्यावर जरा चर्चा होऊ, गंमत जंमत होऊ शकते ती होऊ द्यावी.
मग आपण जणु कविता पोस्ट केल्यानंतर आताच लॉग इन केलेय असे भासवून "विबासं नाव का दिले?" हा प्रश्न कॉपी करून त्यावर "विबासं म्हणजे विश्राम बागेतील संध्याकाळ" संध्याकाळी तिथे बसून कविता लिहिली असे उत्तर द्यावे.

कुणी मायबोलीवरील प्रचलीत विबासंचे पूर्ण रूप सांगितले तर "ओह, असं होय मला ते माहीत नव्हतं." असा प्रतिसाद द्यावा.

मानव , जाम हसले प्रतिसाद वाचून.
खरं तर मी जनरली कविता असली तर धागा उघडत नाही. आवड नाही. पण हा धागा शीर्षक वाचून च उघडला की 'कोणावर 'तरी विदंबन आहे की काय .

वाचणाऱ्याने वाचत जावे
वाचता वाचता एक दिवस
लिहणाऱ्याचा डयूआयडी शोधावा>> चांगली आहे आयडीया.

कविता लिहीताना भाग १ , भाग २ असे करून लिहीत जावे. >>म्हंजे कविता क्रमश: टाकायची? Lol

तुम्ही आता कविताही करायला लागलात .. छान..!!>> नाही हो रुपालीताई. सहज एक छोटासा प्रयत्न करुन पाहिला.

मानवजी किती हसवाल.
धन्यवाद वर्णिताजी.
अनंतनीजी धन्यवाद.

पण हा धागा शीर्षक वाचून च उघडला की 'कोणावर 'तरी विदंबन आहे की काय .
>>>>
+७८६
मलाही हेच वाटले
माझ्यावर कविता आली की काय Happy

वाह !

''भुकेस खाद्य नाही.
कवितेस शब्द नाही.
तरीही लिहिण्याची फार घाई ,
मिळावा प्रतिसाद ठायी ठायी.

जुन्या आयडीस मॉडिफाइ केला.
कारण...प्रतिसादांचा मी भुकेला. ''

( माझे बापडीचे, चार शब्द गोड मानून घ्यावेत.)

भुकेस खाद्य नाही.
कवितेस शब्द नाही.
तरीही लिहिण्याची फार घाई ,
मिळावा प्रतिसाद ठायी ठायी.>> वाह!

पहिलीच आज, कविता मी केली.
मन भरोनि, त्याची जाहिरात केली.
कुणी करंटा फिरेना म्हणुनी, कंमेंट मीच केली.
फिदी फिदी हसण्याची, कवायत मी केली.

इथून प्रेरणा घेऊन मी ही माझ्या मातृभाषेत (हिंदीत) कविता केली आहे. कशी वाटली हे नक्की सांगा.

कुहु-कुहु बोले कोयलिया
कुंज-कुंज में भंवरे डोलें
गुन-गुन बोलें ... कुहु ...
सजा सिंगार ऋतु आई बसंती
जैसे नार कोई हो रसवंती
सा नी दा मा दा नी सा, गा मा गा मा दा नी सा
रे Sआ नी दा नी सा रे सा नी सा रे सा नी
दा नी नी दा नी नी दा नी, मा दा दा मा दा दा मा दा
सा रे गा मा दा ना
सजा सिंगार ऋतु आई बसंती
जैसे नार हो रसवंती
डाली-डाली कलियों को तितलियाँ चूमें
फूल-फूल पंखड़ियाँ खोलें, अम्रित घोलें, आ ...

काहे घटा में बिजुरी चमके
हो सकता है मेघराज ने बादरिया का
श्याम-श्याम मुख चूम लिया हो
चोरी-चोरी मन पंछी उड़े, नैना जुड़े आ ...

चंद्रिका देख छाई, पीया, चंद्रिका देख छाई
चंदा से मिलके, मन ही मन मुस्काई
छैइ चंद्रिका देख छाई
शरद सुहावन, मधु मनभावन
विरही जानों का सुख सरसावन

छाई-छाई पूनम की घटा, घूँघत हटा
आ ... कुहु-कुहु ...

सारस रात मन भाए प्रीयतमा, कमल-कमलिनी मिले
किरण हार दमके, जल में चाँद चमके
मन सानंद, आनंद डोले रे
नी रे गा मा दा नी सा, दा नी सा, सा नी सा, गा रे गा
सा रे नी सा दा नी मा दा सा, नी रे नी रे
दा नी दा नी मा दा मा दा गा मा गा मा
गा मा दा नी सा, गा मा दा नी सा, दा नी सा

- अखिल बदाबदाहुनी

काव्य हा मनाच्या अंतरंगात उमलणारं फुलपाखरु आहे.या फुलपाखराचे सप्तरंग मनाच्या खोल गाभाऱ्यात कुठेतरी मुरलेले असतात मग सहजच या रंगाचा शिडकाव आपल्या दृगोच्चर मनावर करावा.चिंबं-चिंबं भिजून जातं मग मन!

वा!