भिजणारे मन - - - -

Submitted by जीजी on 17 June, 2021 - 06:51

भिजणारे मन - - - -

रिमझिमणाऱ्या, धारांमधुनी, भिजणारे मन
आठवणींच्या, हिंदोळ्यावर, झुलणारे मन

धो-धो धो-धो, सों-सों सों-सों, पावुस वारा
या खिडकीतुन, त्या खिडकीतुन, बघणारे मन

धूसर-धूसर, डोंगर-झाडे, भिरभिरणारी
पानामधुनी, रानामधुनी, पळणारे मन

लख-लख लख-लख, चक-चक चक-चक, वीज-नभातुन
अंगागातुन, रक्त-कणातुन, जळणारे मन

आनंदाचे, सूर-हरिच्या, बासूरीचे
मोहरणारे, भुलवणारे, भुलणारे मन

आपण दोघे, तरिही निश्चल, झाडा खाली
परस्परांच्या, डोळ्यांमधले, झुरणारे मन

आला आला, पावुस आला, माझा जिवलग
प्राण-सख्याच्या, स्पर्शामधुनी, फुलणारे मन

जीजी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults