नुकतेच अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने Brincidofovir या औषधाला देवीरोगावरचा (smallpox) उपचार म्हणून मान्यता दिली (https://www.fda.gov/drugs/drug-safety-and-availability/fda-approves-drug...). हे वाचल्यानंतर सर्वसामान्य माणूस नक्कीच बुचकळ्यात पडेल ! तुम्हीसुद्धा पडले असाल, नाही का ?
देवीच्या आजाराचे तर फार पूर्वीच उच्चाटन झालेले आहे. मग जो आजार आता मानवजातीत अस्तित्वातच नाही, त्याच्यासाठी औषधाला मान्यता देण्याची गरज काय, हा प्रश्न अगदी स्वाभाविक आहे.
याचे स्पष्टीकरण रोचक असून ते देण्यासाठीच हा लेख लिहीत आहे. पण त्यापूर्वी आपण या एकेकाळच्या जागतिक महासाथीच्या रोगाचा इतिहास थोडक्यात पाहू.
हा आजार Variola या विषाणूमुळे होतो. तो अतिप्राचीन आहे. इजिप्तच्या ममीजमध्ये देखील त्याचे काही पुरावे आढळले आहेत असे संशोधक म्हणतात. साधारणपणे इसवी सनाच्या चौथ्यापासून ते पंधराव्या शतकापर्यंत हा आजार संपूर्ण जगभर फोफावलेला होता. त्यात लोक गंभीर आजारी पडायचे आणि कित्येक लोक मृत्युमुखी पडत होते. त्यानंतर त्याच्या विरोधातील उपचार आणि व्यापक प्रमाणावरचे लसीकरण केल्यानंतर हळूहळू हा आजार आटोक्यात येऊ लागला. अमेरिकेत १९४७ मध्ये शेवटचे १२ रुग्ण सापडले. मात्र तेव्हा विकसनशील देशांमध्ये हा आजार बऱ्यापैकी अस्तित्वात होता. विकसित देशात या रोगाविरुद्धचे लसीकरण १९७२च्या दरम्यान थांबवण्यात आले. त्यानंतर हा आजार मागासलेल्या देशांतमध्येच राहिलेला होता. त्याचा बीमोड करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने खूप मोठी मोहीम हाती घेतली. एकीकडे व्यापक लसीकरण चालू होतेच.
हा आजार फक्त माणसाला होतो आणि या विषाणूचा प्राणिजन्य साठा नाही, ही बाब आपल्या पथ्यावर पडणार होती. त्यामुळे या आजाराचे पूर्ण उच्चाटन होऊ शकेल याची खात्री होती. 1975 च्या दरम्यान WHOने जागतिक स्तरावर याचे रुग्ण शोधण्याची मोहीम हाती घेतली. अनेक लोक हा आजार होऊनही तो लपवत असायचे. त्यांना शोधून काढणे फार महत्त्वाचे होते. मग यावर एक युक्ती काढली गेली. जो माणूस देवीचा रोगी शोधून काढेल त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर बक्षीस ठेवण्यात आले. हा मोहिमेतला आकर्षक भाग होता. भारतातही त्यादरम्यान “देवीचा रोगी कळवा आणि हजार रुपये मिळवा”, ही घोषणा मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक ठिकाणी ठळकपणे लावलेली असे.
अशा तऱ्हेने जागतिक निर्मूलन मोहिमेला यश येत होते. 1977 मध्ये डब्ल्यूएचओने जाहीर केले, की जगातील शेवटचा देवीचा रुग्ण हा सोमालियामध्ये आहे; बाकी इतरत्र या आजाराचे उच्चाटन झालेले आहे. हे जाहीर झाल्यावर एका अमेरिकी विज्ञान वार्ताहराने त्या रुग्णाला भेटायचे ठरवले. हा वार्ताहर देवीरोगावर एक पुस्तक लिहित होता आणि त्याच्या संशोधनाचा भाग म्हणून त्याला ही गोष्ट आवश्यक वाटली. मामला अवघड होता. सोमालियाने तेव्हा सर्व परदेशी पत्रकारांना त्यांच्या देशात येण्यास बंदी घातली होती. आता हे वार्ताहर पेचात पडले. म्हणजे, तिथे काही करून जायचेच तर स्वतः पत्रकार असल्याचे लपवणे भाग होते. पण हे त्या व्यवसायातील नियमाविरुद्ध असते. त्यातून खोटेपणाने तिथे प्रवेश केला आणि पुढे जर उघडकीस आले, तर मग थेट तुरुंगवासच घडला असता. पण हे वार्ताहर मोठे जिद्दीचे. त्यांनी WHOशी संपर्क साधला आणि संघटनेने त्यांना अधिकृत ‘निरीक्षक’ असा दर्जा दिला. त्या प्रमाणपत्रावर आता ते सोमालियाच्या व्हिसासाठी प्रयत्न करू लागले. त्यासाठी ते दिल्लीला आले.
व्हिसा मिळवणे अजिबात सोपे नव्हते. दरम्यान दिल्लीतील हॉटेलमध्ये त्यांना एक शिकाऊ पत्रकार तरुणी भेटली. ती आकर्षक होती. त्यांनी तिला त्यांची अडचण समजावून सांगितली. त्यावर ती विचार करते म्हणाली. संध्याकाळी हॉटेलच्या बारमध्ये त्या तरुणीने कोण कोण आलंय याचा अंदाज घेतला. तर तिथे तिला सोमालियाच्या राजदूताचा पुतण्या भेटला. तिने एकूणच आपल्या सौंदर्याची त्याच्यावर भुरळ टाकली आणि त्याला पटवला ! या वार्ताहराबद्दल काहीतरी गोलमाल सांगितले. अखेरीस चर्चा वगैरे होऊन या गृहस्थांना व्हिसा मिळाला. मग ते प्रवासास निघाले. त्या दरम्यान सोमालिया व इथिओपिया यांचे युद्ध चालू होते. एकंदरीत वातावरण भयभीत करणारे होते. मजल दरमजल करीत हे वार्ताहर अखेर तिथे पोचले. मग देवीचा रुग्ण जिथे होता त्या गावात गेले.
(यापुढील घटनाक्रम त्यांच्या लेखनातून समजला).
देवीचा तो रुग्ण एका रुग्णालयात स्वयंपाकी म्हणून काम करीत होता. त्याचा, देवीचा रोग झालेल्या अन्य एका कुटुंबाशी जेमतेम १५ मिनिटे संपर्क आला होता. त्यानंतर त्याला तीव्र ताप, सांधेदुखी आणि उलट्या हा त्रास सुरू झाला. सुरुवातीस डॉक्टरांनी त्याचे निदान कांजिण्या असे केले. परंतु लवकरच त्याला अंगावर पुरळ उठले आणि आता तो देवीचा रोगी असल्याचे स्पष्ट झाले. मात्र आता त्याने घाबरून आजार लपवायचे ठरवले होते. परंतु सर्वेक्षण करणाऱ्या माणसाने त्याला बरोबर पकडले आणि मग थेट त्याची रवानगी रुग्णालयात झाली.
ज्या रुग्णालयात त्याला आणायचे ठरवले होते तिथले सर्व रुग्ण आधी अन्यत्र हलविण्यात आले. त्या सर्वांचे देवीचे लसीकरण झाल्याची खात्री करण्यात आली. त्या रुग्णालयाकडे येणारे सर्व रस्ते नंतर अडवून ठेवण्यात आले. त्या परिसरातील ५५,००० जणांचे लसीकरण करण्यात आले.
लवकरच तो रुग्ण बरा झाला. नैसर्गिक संसर्गातून देवीचा आजार झालेला हा शेवटचा रुग्ण गणला गेला. पण, पुढे अजून काही विपरीत घडायचे होते......
लंडनच्या एका रुग्णालयात एक स्त्री आजारी पडली. त्या रुग्णालयाच्या प्रयोगशाळेमध्ये देवीच्या विषाणूवर संशोधन चालू होते. तिथून तो कुठल्यातरी मार्गाने बाहेर निसटला आणि त्यातून ही तरुणी आजारी पडली. पुढे 1978 मध्ये बर्मिंगहॅम रुग्णालयातील प्रयोगशाळेतील एक कर्मचारीही देवीने आजारी पडला आणि त्याचा आजार बळावल्याने त्याचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना होती. त्याचा धसका घेऊन त्या रुग्णालयाच्या संचालकांनी आत्महत्या केली. हे सगळे प्रकरण पाहता इंग्लंडने त्यांच्याकडील विषाणूचे सर्व नमुने नष्ट केले.
अखेर 1980 मध्ये डब्ल्यूएचओने या आजाराचे पूर्ण उच्चाटन (eradication) झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर प्रत्यक्ष कुठल्याही माणसामध्ये हा आजार दिसलेला नाही. आता हा आजार घडविणाऱ्या विषाणूचे नमुने अभ्यास-संदर्भ म्हणून अतिशीतगृहात कडेकोट बंदोबस्तात ठेवावयाचे ठरले. अधिकृतपणे डब्ल्यूएचओची अशी दोनच केंद्रे आहेत. त्यातील एक अमेरिकेतील अटलांटामध्ये तर दुसरे रशियामध्ये आहे. आता पुन्हा एक प्रश्न उपस्थित होतो. तो म्हणजे,
कशासाठी ठेवायचे हे घातक नमुने ?
वैज्ञानिकांना सतत एक भीती वाटत असते. जर का या विषाणूंचे अनधिकृत नमुने कुठून तरी दहशतवाद्यांना मिळाले, तर ते त्याचा जैविक अस्त्र म्हणून वापर करतील. एकदा का असा विषाणू जगात सोडला की मग काय हाहाकार होतो ते आपण सध्या जाणतो. हा धोका कायम असल्याने वैज्ञानिकांनाही या रोगावरील आधुनिक उपचार आणि लसनिर्मितीच्या संशोधनासाठी मूळ विषाणूचे नमुने ठेवणे आवश्यक वाटते. असे अनधिकृत नमुने जगात कुठे ठेवलेले आहेत का, याचा शोध अमेरिकेची सीआयए संघटना सतत घेत असते. त्यांच्या 2002 मधील अंदाजानुसार अन्य ४ देशांमध्ये असे नमुने लपवलेले आहेत !
थोडक्यात, हा विषाणू सध्या गाढ निद्रितावस्थेत शीतगृहात आहे. मात्र अनधिकृत मार्गाने जर त्याचा जैविक अस्त्र म्हणून वापर केला गेला तर अनर्थ माजेल. याच भीतीपोटी त्याच्याशी लढण्यासाठी एखादे चांगले औषध आपल्या भात्यात असणे कायम आवश्यक आहे. या हेतूनेच वर उल्लेखिलेले औषध मान्यताप्राप्त करून तयार ठेवलेले आहे. हे जुनेच औषध असून अन्य काही विषाणूंच्या उपचारांसाठी ते वापरले जाते. देवी विषाणूच्या समजातीय विषाणूंवर काही प्रयोग करून त्याची चाचणी घेण्यात आली. यापूर्वी २०१८मध्ये देवीसाठीच्या अन्य एका औषधालाही अशीच मान्यता दिलेली आहे. देवीविरोधी लस देखील उपलब्ध असून ती 2002 पासून अमेरिकी लष्करातील काही निवडक लोकांना दिली जाते.
विषाणूंचा जैविक अस्त्र म्हणून वापर कधीही न होवो अशीच आपल्या सर्वांची इच्छा आहे. वैज्ञानिकांनी या बाबतीत गाफिल न राहायचे ठरवले असल्यामुळे त्यांनी अशा औषधांची निर्मिती करून ठेवलेली आहे.
...............................................................
अभिप्राय व पूरक माहिती बद्दल
अभिप्राय व पूरक माहिती बद्दल वरील सर्वांचे आभार !
* बाई पूर्वी बहुतेक म्युनिसिपाल्टीत चर खणायचं काम करत होत्या" >>
* microneedle patch >> छान, उपयुक्तच .
विज्ञान च वापर मानव कल्याण
विज्ञान च वापर मानव कल्याण साठी करायचा असा हेतू असणारा जमाना कधीच निघून गेला.
विसाव्या शतका पर्यंत हाडाचे संशोधक होते त्यांना मानव कल्याण करायचे होते.
आता संशोधक पैसा पिपासू कंपन्या,वर्चस्व वादी सरकार ह्यांचे गुलाम आहेत.
Dr नी जे सांगितले आहे ते अतिशय किरकोळ गोष्ट असण्याची शक्यता आहे.
जेनेटिक अभियांत्रिकी चे अर्थवट ज्ञान प्राप्त गुलाम संशोधक मंडळी नी अतिशय खतरनाक जिवाणू ,विषाणू कधीच बनवले असतील.
Corona एक झलक आहे.
अवांतर : देवीच्या लसीच्या
अवांतर : देवीच्या लसीच्या खुणेवरून एखाद्याच्या वयाचा अंदाज करतात लोक , हे असंच कोणीतरी पूर्वी सांगितल्याचे आठवतंय. म्हणजे दोन्ही दंडांवर नाण्याच्या आकाराच्या खुणा असल्यास त्याचं वय अमुक आणि एकाच दंडावर छोटीशी खूण असल्यास अमुक.
मस्त लेख आणि रोचक माहिती!
मस्त लेख आणि रोचक माहिती!
मस्त लेख आणि रोचक माहिती!
मस्त लेख आणि रोचक माहिती!
छान माहितीपूर्ण लेख.
छान माहितीपूर्ण लेख.
या लेखाच्या निमित्ताने थोडे
या लेखाच्या निमित्ताने थोडे वाचन केले असता काही रोचक गोष्टी कळल्या त्या इथे शेअर करत आहे (लेखात यांचा ओझरता उल्लेख आहेच पण इथे जरा तपशिलात):
१. या चार देशांनी अजूनही जतन केलाय हा विषाणू(?)
२००२ सालच्या या वृत्तानुसार इराक, रशिया, नॉर्थ कोरिया आणि फ्रान्स या देशांनी देवीचे विषाणू अद्यापही जतन करून ठेवले असल्याचा पुरावा अमेरिकेच्या सीआयए या गुप्तचर संघटनेकडे आहे
२. १९७८ सालचा इंग्लंडमधला आऊटब्रेक:
१९७८ साली इंग्लंडमधल्या बर्मिंगहॅम येथील वैद्यकीय विद्यापीठाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील प्रयोगशाळेत संशोधनासाठी जतन करून ठेवलेल्या देवीच्या विषाणूंचा संसर्ग होऊन, त्याच इमारतीत प्रयोगशाळेच्या वरच्या मजल्यावरील खोलीत काम करणारी जॅनेट पार्कर हि कर्मचारी स्त्री देवीरोगाने आजारी पडली. ती या विभागात वैद्यकीय-फोटोग्राफर म्हणून काम पाहत होती. या घटनेने तेंव्हा बर्मिंगहॅम व इंग्लडमध्ये मोठीच खळबळ उडाली. तिच्या थेट संपर्कात आलेल्या व त्याच बिल्डिंगमध्ये काम करणाऱ्या असे एकत्र मिळून जवळपास पाचशे जणांचे विलगीकरण करण्यात आले होते. या दुर्घटनेला सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख हेन्री बेड्सन हेच बेजबाबदार असल्याचा आरोप माध्यमांनी उचलून धरला. यामुळे ते अत्यंत व्यथित झाले. जॅनेट आजारी पडल्यानंतर पंधरा दिवसांतच त्यांनी आत्महत्या केली. याच दरम्यान जॅनेट पार्कर हिच्या वडीलांचासुद्धा विलगीकरण कक्षात मुलीला भेटत असतानाच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. आणि या दोन दुर्दैवी मृत्यूंनंतर स्वत: जॅनेट पार्कर हिचा एक महिन्याच्या आजारपणानंतर अखेर वेदनादायक अवस्थेत मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर या घटनेचे तीव्र पडसाद आख्ख्या इंग्लंडभर उमटले. या घटनेची सरकारने अतिशय गंभीर दखल घेऊन केवळ ती प्रयोगशाळा आणि सूक्ष्मजीवशास्त्र विभागच नव्हे तर या विभागाची संपूर्ण इमारतच नंतर जमीनदोस्त केली. हा विषाणू प्रयोगशाळेच्या वरच्या मजल्यावर काम करणाऱ्या जॅनेट पार्कर हिच्या पर्यंत नक्की कसा पोहोचला याचे मात्र ठोस उत्तर आजतागायत कधीच मिळाले नाही. इमारतीत हवा खेळती राहण्यासाठी लावलेल्या एअर डक्ट मधून हा विषाणू संक्रमित झाला असेल असे सांगणारा अहवाल सुरवातीला सादर केला गेला. पण नंतरच्या काळात विविध तज्ञांनी वेळोवेळी केलेल्या अभ्यासाअंती, असे संक्रमण जवळजवळ अशक्य असल्याचे निदर्शनास आणून दिले. जॅनेट पार्कर हि देवीच्या आजाराने मृत्यूची नोंद झालेली जगातली आजवरची अखेरची रुग्ण मानली जाते.
(संदर्भ: विकिपीडिया)
अभिप्राय व पूरक माहिती बद्दल
अभिप्राय व पूरक माहिती बद्दल वरील सर्वांचे आभार !
अजून रोचक माहितीची भर पडते आहे .
छान !
ओह.
ओह.
जेनेट पार्कर चे दुर्दैव.कसे संक्रमण झाले हे कळायला हवे खरं.
माहितीपूर्ण लेख. नवीन माहिती
माहितीपूर्ण लेख. नवीन माहिती कळली .
अजून रोचक माहितीची भर पडते
अजून रोचक माहितीची भर पडते आहे .>>>> होय खरंय. धन्यवाद अतूल. त्या जेनेट पार्करला लागण कशी झाली हे अजून पर्यंत कोडंच आहे म्हणायचं. (ह्यावर एखादी उत्तम सिरीयल होऊ शकते)
अतुल, छान पोस्ट.
अतुल, छान पोस्ट.
आवडली. भारीच !
छान लिहिलंय, PSM मध्ये हे
छान लिहिलंय, PSM मध्ये हे प्रश्न विचारले जायचे ते आठवले, देवी उच्चाटन होऊन पण त्याचा अभ्यास इतक्या वर्षांनंतरही का करतोय (PSM मधील बर्याचtopic बद्दल मला तेव्हा असंच वाटतं असे तो भाग वेगळा) व अजूनही virus चा नमूना का ठेवलाय? वैद्यकीय शास्त्रात प्रत्येक रोगासोबत त्याचा इतिहास वाचताना रंजक वाटतो.
वैद्यकीय शास्त्रात प्रत्येक
वैद्यकीय शास्त्रात प्रत्येक रोगासोबत त्याचा इतिहास वाचताना रंजक वाटतो.
>>>
अगदीच ! +१००
जगातील दोन रोगाचे निर्मूलन
जगातील दोन रोगाचे निर्मूलन (नष्ट नाही) झाले असे जाहीर केलेले आहे.
त्या मधील एक देवी आणि दुसरा प्लेग असावा.
पण नवीन किती तरी संसर्ग जन्य रोग आले.
मार्स.
Sars १
Sars २
बर्ड फ्ल्यू.
एड्स,
स्वाइन फ्ल्यू.
म्हणजे दोन गेले आणि सहा आले.
Pages