एक कहाणी उरली आहे

Submitted by _आदित्य_ on 13 June, 2021 - 07:20

आता आता स्फुरली आहे..
एक कहाणी उरली आहे !
तुझ्या आठवणी विरल्या तरीही..
एक निशाणी उरली आहे !

दिवस लोटला संध्या सरली..
रात परी गुदमरते अजुनी !
पाऊस गेला ऊनही गेले..
शून्य विराणी उरली आहे !

कविता गेल्या गाणी गेली..
पळवूनी नेली कुणीतरी !
मुखात माझ्या तुझी तेवढी..
श्यामलवाणी उरली आहे !

एक कहाणी उरली आहे !

Group content visibility: 
Use group defaults