मोगरा

Submitted by _आदित्य_ on 13 June, 2021 - 07:17

रंगभरल्या पाकळ्यांना
रंग तू देऊ नको !
गंधणाऱ्या ह्या फुलाचा
गंध बळकावू नको !
चंद्र डोळे आणि चंदन
अंगभर धुंदावले..
त्यात आता मोगऱ्याचा
छंद तू लावू नको !

Group content visibility: 
Use group defaults