ती पहाताच बाला...... कलिजा खलास झाला.........

Submitted by sanky on 20 May, 2009 - 12:54

4.jpg

माध्यम - पोस्टर कलर(ड्रायब्रश टेक्निक)

प्रतिसादासाठी धन्यवाद मित्रानो,
ड्रायब्रश टेक्निकमध्ये फिनीशीन्ग करत नाहित, फक्त रन्ग एकमेकावर लेपत जायचे असतात , तेही एखाद्या खराब झालेल्या (अर्धवट केस गेलेल्या किवा सुकुन राठ झालेल्या) ब्रश ने, ह्या मध्ये मी त्वचेचा रन्ग पिवळा व लाल रन्गान्च्या लेपनातुन केला आहे त्यामुळे तो त्वचेसारखा वाटत नाही आहे, आणी चित्रकला म्हणजे फक्त फोटोफिनीशीन्ग नव्हे, म्हणुन हा मी केलेला छोटासा प्रयत्न............

गुलमोहर: 

मस्त. जीन्स तर परफेक्ट व नॅचरल आलिये :-). स्कीनटोन तेवढा नॅचरल वाटत नाहिये.
************
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची | झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ||

सॉरी सँकी,

या वेळेस आवडले नाही मला. स्किन टोन आणि चेहरा..
(मला चित्रकलेतले काही कळत नाही पण तुमची आधीची सारी चित्रे
छायाचित्रा सारखी वाटली होती. यावेळीही तीच अपेक्षा केल्यामुळे की काय?)

(जीन्स मात्र छान आली आहे).

अंहं, चुकीचा फटका, आणि सँकी बाद.
यावेळी आमची एवढीच दाद.

सेमी न्यू... प्रकारची थीम. नो वे.
शक्य असेल तर या जागी नविन चित्र टाकावे.
प्रतिभा अशाच चित्रांनी उंचावता येते असा समज आहे का तुमचा.का सवंग लोकप्रियता खुणावतेय? आयुष्यात अनेक क्षणी या दोहोतून एकाला निवडावेच लागेल.

प्रतिक्रीयाच द्यायची इच्छा नव्हती. पण आजवरची छान चित्रे दाखवून कमावलेल्या पुण्याई मुळे माझी प्रतिक्रिया मिळाली असे समजावे.

काय करू? प्रसाद आणि शीरा यातून नेहमीच प्रसाद निवडतो मी.

धन्यवाद !

प्रसाद आणि शीरा यातून नेहमीच प्रसाद निवडतो मी. << मग इथे का शिरा ताणून बोलताय? Happy

सँकी, बॉय यू डीड इट अगेन !
मास अपिल नसेल आले.....पण मला माहितेय किती तपस्या करावी लागते ड्राय ब्रश टेक्निकमधे ते !

ब्रेव्हो!

तुझे ऑब्जेक्ट सिलेक्शन मात्र जरा खटकले!(मलातर!)

मास अपिल नसेल आले << कायतर्रीच्... ईतकं ठळक flesh दिसतय की. आणखी काय पाहिजे?

विनोद सोडून द्या, सँकी मला तुमचे हेही चित्र आवडले.

चित्र चांगलेच आहे, पण सँकीच्या इतर चित्रांच्या मानाने थोडे कमी पडते...

ह्म्म.. टॅनिंग करायला चुकून दुसराच भलता रंग वापरल्यासारखं वाटतंय.. Happy
ते एक सोडलं तर चित्र आवडलं.. पण यावेळी ते चित्र आहे हे जाणवतंय, अनलाईक युअर प्रिव्हिअस पेंटींग्स..

www.bhagyashree.co.cc

मस्त !! खास करून खांद्यावर आलेली ती झळाळी... खासच ! तिच्या त्वचेच्या पोताचा एका झटक्यात अंदाज येतोय.

    ***
    Finagle's Third Law : In any collection of data, the figure most obviously correct, beyond all need of checking, is the mistake.

    मलाही चित्र आवडलं. Happy
    आता, ड्रायब्रश आणि तत्सम तांत्रिक बाबी नाही कळत, पण प्रत्येक चित्र नॅचरल / फोटोसारखेच असले पाहिजे का?
    मला तरी हा "प्रयत्न" अगदी यशस्वी वाटला! Happy

    मलाही चित्र आवडले. हास्य तर खुपच लोभस आहे. पण ओठ जरा जास्त एका बाजुला उघडल्यासारखे वाटतात.

    मलाही आवडलं हे चित्र..
    =========================
    "हाती घ्याल ते घरीच न्याल"

    तकनिकी गोष्टी समजावल्याबद्दल धन्यवाद शँकी. पण ही चित्रं तू फोटोवरुन पाहून काढतोस का ?

    सही आलंय! तिचं हास्य तर एकदमच खट्याळ आणि 'खलास' करणारं.. अंगाला चिकटलेलं पाणी, थोडीशी वाळू.. वाह!
    चित्रकलेच्या टेक्निकबद्दल असं सांगत जा सँकी.
    ----------------------------------------------------
    No matter how you feel, get up, dress up and show up.

    सँकी, अफाट कला आहे रे तुझ्याकडे! मस्तच असतात तू काढलेली चित्रं!
    आणि हसू इतकं खट्याळ आलय ना! उच्च!

    हातावर व कमरेवर मारलेल्या पिवळ्याच्या स्ट्रोकमुळे त्वचेवर सूर्यप्रकाशाचा परिणाम व हाताचा व कमरेचा गोलवाही फार सुंदर साधला आहे. फारच छान !

    प्रयत्न खूपच चान्गला आहे पण शरीराचा डौल तितकासा जमलेला नाही. डावा डोळा आणि आजुबाजुच्या भागाचे shading पण जास्त छान व्हायला हवे होते. तुझी आधिची चित्रे पाहुन अपेक्षा वाढल्या आहेत.

    संकेत आवडलं हे पण चित्र/
    --------------
    नंदिनी
    --------------

    या छायाचित्राला कृपया कोणत्याही धर्माच्या देवतेचे नांव देऊ नये अशी विनंती!

    -------------------------------------------------------------------------------------

    अवांतर - चित्र जबरदस्त, चेहर्‍यावरील भाव अप्रतीम!

    -------------------------------------------------------------------------------------

    अधिक अवांतर - टॉपलेस नसती तर कलेज्याचे काय झाले असते यावर विचार व्हावा

    -------------------------------------------------------------------------------------

    त्याहून अवांतर - टॉपलेस नाहीच आहे व स्कीन कलर टी शर्ट घातलेला आहे हे वास्तव असल्यास माझ्या नजरेला व स्वभावाला जरूर दोष द्यावा.

    -------------------------------------------------------------------------------------

    प्रचंड अवांतर - हे असे चित्र पाहिल्यावर फक्त कलेजाच खलास झाला ही निंदनीय बाब आहे.

    -------------------------------------------------------------------------------------

    अल्ट्रा अवांतर - माझे म्हणणे गंभीरपणे घेऊ नयेत.

    -------------------------------------------------------------------------------------

    -'बेफिकीर'!