Submitted by सान्वी on 7 June, 2021 - 06:07
सध्या वेबसिरीज च्या धाग्यावर या सिरीजची सुरू असलेली चर्चा लक्षात घेता यावर नवीन धागा काढते आहे. येथे स्पॉईलर सकट चर्चा करू शकता. ज्या मंडळींची अजून बघून व्हायची आहे त्यांनी पूर्ण झाल्यावरच या धाग्यावर या.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
(No subject)
सामन्था
ज्या लोकाना ती माहिती नाही ,
ज्या लोकाना ती माहिती नाही , ती मक्खी चित्रपटाची नायिका आहे.
आता "मख्खी" बघितला नसेल तर मग जाउच द्या
बापरे, प्राजक्तानी टाकलेल्या
बापरे, प्राजक्तानी टाकलेल्या फोटोतली व्यक्ती दुसरीच वाटतेय एकदम, इतकी लाइट स्किन आणि फिचर्सही वेगळे दिसतस्येत इथे, अनुष्का शर्मा सारखी दिसतेय !
मस्तं जमलाय मग फॅमिली मॅन मधला गेटप, खरीखुरी तशीच वाटते एकदम !
नेहमी प्रमाणे एका उजळवर्णीय
नेहमी प्रमाणे एका उजळवर्णीय व्यक्तीला रंग लावून ब्राऊन व्यक्तीची भूमिका दिली आहे.
मूळ उजळ व्यक्तीला रंग लावून ब्राऊनफेस करणे हा रेसिझम चा एक प्रकार मानला जातो.फ्रान्स चे मॅक्रोन यांच्यावर (की जस्टीन ट्रूडो वर) तरुणपणी ब्राऊनफेस गेटअप केल्याबद्दल आता खूप टीका सहन करायला लागली होती.
https://www.google.com/amp/s/time.com/5680759/justin-trudeau-brownface-p...
https://m.economictimes.com/news/international/world-news/why-brownface-...
आपल्या इथे बहुतेक अमुक तमुक कलाकार घ्यायचाच आहे,तोच चांगलं करेल,दुसरा नको आहे, त्यामुळे फासा कॉपर रंग आणि करा ब्राऊनफेस असं असतं(सुपर 30 मधला ह्रितिक).
खरं तर रोल साठी वजन कमी जास्त करतात तसं रोल साठी या लोकांना जरा सन बाथ घेऊन खरोखर टॅन व्हायला हरकत नाही रोल मोठा असेल तर.
बरोबर अनु, कार्डॅशिअन्सना पण
बरोबर अनु, कार्डॅशिअन्सना पण बरेचदा याबद्दल टिका मिळाली आहे .
ती रिअल लाइफ मधे कशी दिसते माहित नसल्यामुळे कॅरॅक्टर म्हणून खरी वाटली!
मला राजी मठ्ठ नाही वाटली.
मला राजी मठ्ठ नाही वाटली. थिजून गेल्यासारखी आणि फक्त त्या मिशन साठी जिवंत आहे अशी दाखवलीय . तिने ते बेरिंग उत्तम पकडलंय. बाकी डोळे आणि देहबोलीतून भरपूर व्यक्त होते ती. खूप काही सोसलेली आणि सुडाने पेटून उठलेली रिबेल तिने चॅन वठवलीये.
बाकी मला एक कळलं नाही की रूपतुंगा ला भारतातल्या श्रीलंकन टॅमिलिअन्स। ना का संपवायचं असतं?
मला राजी मठ्ठ नाही वाटली.
मला राजी मठ्ठ नाही वाटली. थिजून गेल्यासारखी आणि फक्त त्या मिशन साठी जिवंत आहे अशी दाखवलीय . तिने ते बेरिंग उत्तम पकडलंय. बाकी डोळे आणि देहबोलीतून भरपूर व्यक्त होते ती. खूप काही सोसलेली आणि सुडाने पेटून उठलेली रिबेल तिने चॅन वठवलीये.
<<
+१
ती त्या बस मधल्या मॉलेस्ट करणार्याला आधी थंड चेहर्याने बघून मग धोपटते त्या सीनला शिट्टी मारली मी !
आपल्या इथे बहुतेक अमुक तमुक
आपल्या इथे बहुतेक अमुक तमुक कलाकार घ्यायचाच आहे,तोच चांगलं करेल,दुसरा नको आहे, त्यामुळे फासा कॉपर रंग आणि करा ब्राऊनफेस असं असतं(सुपर 30 मधला ह्रितिक). -> Exactly!! मलाही असेच वाटले.. सामन्थाच्या फाउन्डेशनच्या शेड्स ईतक्या चेन्ज झाल्यात सिरिझभर! तिने अॅक्टिन्ग चान्गली केली आहे पण ते डोळ्यात खुपलेच..
मला मि. चेल्लम्मचे पात्र आवडले.. एकदम साधे आणि तेवढेच तमिळ वॉरचे ईन अॅन्ड आउट्स माहित असणारे.. मुथ्थू पण छान.. मनोज वाजपेयी आणि जे के भारीच..पुढच्या सीझन मधे जेके लाच नाही उडवले म्हणजे मिळवले.. शरद केळकरला वाया घालवले आहे असे वाटतेय.. त्याच्या अभिनयाच्या रेन्ज ला फार वाव नाही दिलाय..
तिसर्या सीझनची नान्दी पण दिलिये.. वेटिन्ग फॉर इट!
बाकी मला एक कळलं नाही की
बाकी मला एक कळलं नाही की रूपतुंगा ला भारतातल्या श्रीलंकन टॅमिलिअन्स। ना का संपवायचं असतं? -> ते श्रीलंकन रेबेल्स असतात आणि तिथे सरकार बनवायच्या प्रयत्नात असतात..तिघेही फाउन्डर मेम्बर्स दाखवलेत.. एक जण भारतात येतो मदत मिळवण्यासाठी, त्याला पकडून हवाली करायचे असते पण साजिद त्याला मारतो बॉम्बस्फोटात..
खलनायक जितका ताकदीचा तितकंच
खलनायक जितका ताकदीचा तितकंच साहस अफाट वाटतं हा थंब रूल आहे. पण तमिळ अतिरेक्यांबाबत पाकिस्तान इतका राग नसतो भारतात कुणाला. त्यामुळे खलनायिका अतिशय ताकदीने उभी करूनही खल व्यक्तींबाबत सहानुभूती राहते. पाक मधे जाऊन अड्डे उडवताना जे सुख मिळतं ते इथे नाही मिळत.
मलाही दाट शंका आहे की पुढच्या
मलाही दाट शंका आहे की पुढच्या सिझन मध्ये जे के ला निपटणार.तसं नाही झालं तर उत्तमच.
राजी मध्ये मध्ये हाऊस एमडी मध्ये ए व्हिटामिन ओव्हर डोस झालेला एक गाजराच्या रंगाचा पेशंट असतो तशी दिसते. मला ती गेल्याचं बरंच वाटलं.तिच्या मुळे(तिला न्यायला जो हल्ला झाला त्यात) मिलिंद मेला.त्याला अजून थोडा ठेवायला हरकत नव्हती.त्याच्याकडे ओरायन, पाशा वर हल्ला, हा चेन्नई तला हल्ला यातून शिकलेला शहाणपणा आहे.उपयोग झाला असता.
एकता कपूर असती तर जिवंत
एकता कपूर असती तर जिवंत झालाही असता हळूच.
खरं सांगायचं तर मला कंटाळवाणा
खरं सांगायचं तर मला कंटाळवाणा वाटला हा सीजन. सुचिचे वागणे एकाच वेळेस पटत (म्हणजे ती अशी का वागतेय ते कळत होते) होते आणि उगाच वैतागवाणेपण वाटले. मवाच्या मुलीचे अपहरण वगैरे ट्रॅक उगाच घेतला आहे. त्याची गरज नव्हती. विशेषतः चेन्नई ट्रॅक एकदम पीक पॉइंटवर असताना काहीच गरज नव्हती.
TASC सोडणे, परत जॉइन करणे इतके सोपे दाखवले आहे की हास्यास्पद वाटते. काहीही सिक्युरिटी चेक वगैरे नाही. पर्सनली विश्वास असणं गोष्ट वेगळी पण प्रोफेशनली? त्यातून एवढ्या हाय सिक्युरिटीची माहिती जेके अगदी येताजाता श्रीला देत असतो.. तेपण श्री आता मोहिमेचा हिस्सा नसताना...हे जरा विचित्र वाटले. असं नसतं खरं तर. इथे आर्मीत स्टेशन/युनिट सोडून दुसरीकडे गेलेल्या ऑफिसरलापण काही माहिती दिली जात नाही अगदी सर्विंग ऑफिसरला पण. आणि जेके बिनधास्त फोनवर श्री ला सांगत असतो. सिक्युरिटी प्रोटोकॉल नावाचा काही प्रकार नाही. फारच हास्यास्पद प्रकार दाखवला आहे
मला एकच कळत नाही, इतके हल्ले
मला एकच कळत नाही, इतके हल्ले होतात, इतकी माणसं मरतात तरी यांना एक बुलेटप्रूफ वेस्ट का दिले जात नाही? की ते कधी वापरायचे आहे यावर काही नियम असतील? >>
अगदी. तेपण हाय रिस्क ऑप असताना.
हाय रिस्क एरियात पण ऑफिसर्स निवांत चौकशी करत फिरत असतात.
आर्मीसाठी बुलेटप्रूफ
आर्मीसाठी बुलेटप्रूफ जॅकेट्सचा रस्ता २०१८ मधे मोकळा झाला आहे. आता ते उपलब्ध होत आहेत. त्या आधी तुटवडा होता.
दुसरे वेगवान ऑपरेशन्स मधे इंटेलिजन्स व तत्सम लोक बीपीजे टाळतात. कारण त्याचे जे फॅब्रिक आहे त्याचा दर्जा सुमार असल्याने वजन आणि हालचालींवर येणारी मर्यादा यामुळे त्याचा वापर समोरासमोरच्या गोळीबाराची निश्चिती असते तिथेच होतो.
https://www.quora.com/Do-soldiers-of-the-Indian-army-wear-bullet-proof-j...
आणि आहे त्यात लोक हेल्मेट
आणि आहे त्यात लोक हेल्मेट घालताना दिसत नाहीत.म्हणजे डोक्यात गोळी लागली तर सर्व फ्लॉप आहेच.
काहीही सिक्युरिटी चेक वगैरे
काहीही सिक्युरिटी चेक वगैरे नाही. पर्सनली विश्वास असणं गोष्ट वेगळी पण प्रोफेशनली? त्यातून एवढ्या हाय सिक्युरिटीची माहिती जेके अगदी येताजाता श्रीला देत असतो.. तेपण श्री आता मोहिमेचा हिस्सा नसताना...हे जरा विचित्र वाटले. असं नसतं खरं तर. >>>>> हो बरोबर हे खटकते. कारण पहिल्या सिझन मध्ये हे जास्त प्रोफेशनल वाटत होते तसे आता वाटले नाही. आणि उगाच येताजाता मुथुला पण शिव्या देणे हेही नाही पटले .
हाय सिक्युरिटीची माहिती जेके
हाय सिक्युरिटीची माहिती जेके अगदी येताजाता श्रीला देत असतो.. तेपण श्री आता मोहिमेचा हिस्सा नसताना...हे जरा विचित्र वाटले. असं नसतं खरं तर. >>>>> श्री आयटीत रमणार नाही हे जेकेला माहिती आहे व तो परत यावा ही जेकेची इच्छा आहेच ....
पाहिली. खूप आवडली. काही
पाहिली. खूप आवडली. काही ठिकाणी ..काहीही हं.. असं वाटतं ..पण चालतयं..
बाकी एकदम मस्त..! सग्ळ्यांचं काम मस्त!
मिलिंद जातो, जेके आणि श्रीकांत ची हॉस्पिटल मधली भेट, श्रीकांत आणि सुची ची भेट .. जेव्हा त्यंची मुलगी किड्नॉप होते... अगदी ट्ची आहेत हे सीन्स..!
हाय सिक्युरिटीची माहिती जेके अगदी येताजाता श्रीला देत असतो.. तेपण श्री आता मोहिमेचा हिस्सा नसताना...हे जरा विचित्र वाटले. असं नसतं खरं तर.>>> ते दोघे खूप चांगले मित्र अस्तात.. दोघांना एक मेकांच्या पर्स्नल लाइफ बद्दल सग्ळं माहित असतं..
श्रीकांत चा ऑफिस मधला बॉस
श्रीकांत चा ऑफिस मधला बॉस सोबतच सीन. त्या किमीड्याला दोन फटकवतो तेव्हा सर्वांच्यावतीने
"सबका बदला लेगा तेरा श्रीकांत" असाच वाटलं (वसेपुर fame)
श्रीकांत चा ऑफिस मधला बॉस
श्रीकांत चा ऑफिस मधला बॉस सोबतच सीन. त्या किमीड्याला दोन फटकवतो .. हाहा.. भारीच् होता तो सीन..
आणि श्रीकांत सूची सोबत काऊन्सिलर कडे जातो .. तो सीन पण मस्त..
अहो, मित्र असला म्हणून, परत
अहो, मित्र असला म्हणून, परत यावा म्हणून चालू असलेल्या ऑपरेशन ची माहिती देतात? तेपण ऑर्गनायझेशन मधून बाहेर पडलेल्या माणसाला.इथे बायकोला सांगत नाहीत डिटेल्स. काहीही.
तोच फरक असावा मित्र आणि बायको
तोच फरक असावा मित्र आणि बायको मधला
जरा अ आणि अ वाटलं हा सिझन.
जरा अ आणि अ वाटला हा सिझन. शेवटच्या सीनला रागी ते विमान जीप वर धडकवेल कि काय असं वाटलं. त्यात RDX असताना कोणी अशी रिस्क घेईल का? रागीला पकडतानापण जर ती इतकी ताकदवान आहे तर तिच्या पायात किंवा हाताला एक गोळी मारायची आणि जायबंदी करायचं. नुसतं बंदुक घेऊन पाठलाग काय पॉईंट आहे ? ते आणि तिला पकडलं कि गपगुमान कल्टी मारायची तर ते एक नाही. 1/2 जाऊन चौकशी करत आहेत. शिवाय त्या दोघांना काही झाल नाही आणि उलट स्टेशन वरचे लोक मेले ह्याला काय अर्थ आहे?
अहो, मित्र असला म्हणून, परत
अहो, मित्र असला म्हणून, परत यावा म्हणून चालू असलेल्या ऑपरेशन ची माहिती देतात? तेपण ऑर्गनायझेशन मधून बाहेर पडलेल्या माणसाला.इथे बायकोला सांगत नाहीत >> हे मलाही खटकल होत पण सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून चालवुन घ्यायच.
ते आणि तिला पकडलं कि गपगुमान कल्टी मारायची तर ते एक नाही. 1/2 जाऊन चौकशी करत आहेत.>> ते लोकल टिमचा वेट करत होते.
मित्र असला म्हणून, परत यावा
मित्र असला म्हणून, परत यावा म्हणून चालू असलेल्या ऑपरेशन ची माहिती देतात? >>>> हो ना. ती सिरीजमधली सर्वात खटकलेली गोष्ट होती. इंटेलिजन्स सर्व्हिसेससारख्या प्रोफेशनमध्ये सिक्रसी केवढी महत्वाची असते, ते लोक मित्रासाठी असं पॉलिसी व्हायोलेशन करणं अशक्य.
सिझन 1 जेवढा आवडला तेवढा सिझन 2 प्रभावी वाटला नाही. राजी, मुथु, चेलम, ही कॅरेक्टर्स आणि ऍक्टर्स आवडले.
कल्याण कोणाला थोडासा ईशान खट्टर सारखा वाटला का? कदाचित केसांमुळे असेल, पण मला वाटला.
सतत नेटफ्लिक्स पाहिल्यामुळे किसिंग, न्यूडीटी आणि बेड सीन्स पाहुन काही ओकवर्ड वगैरे वाटत नाही, पण तरीही Dhritee (मराठीत टाईप करता येत नाहीए) आणि कल्याण/सलमानचे किसिंग सीन्स मला अतिशय objectionable वाटले. दोघेही ऍक्टर्स किती लहान आहेत. मुद्दाम चेक केलं तर Dhritee तर मायनर आहे. बालकलाकारानी असे शॉट्स शुट करण्याबाबत काही लॉज नसतात का? यांचे आईवडील पैसे कमावताना एवढे वाहवत जातात का?
आईबापांच्या कंसेंट असेल तर लॉ
आईबापांच्या कंसेंट असेल तर लॉ नसेल.
तशी तर आपली आर्ची पण मायनरच होती.
तिचाही किस सीन आहेच.
चाणक्य मूव्हीच्या वेळेस
चाणक्य मूव्हीच्या वेळेस उर्मिला मातोंडकर १५ वर्षांची असताना तिचा आणि कमल हसनचा किसिंग सीन होता.
हुश्श ! झाली पाहून एकदाची.
हुश्श ! झाली पाहून एकदाची. काही गोष्टी खूप च खटकतात. एवढ्या मोठ्या मिशन चा, PM ला मारण्याच्या मिशन चा बिमोड करायला फक्त इतकेच लोक?
आणि बासू ला ते फक्त venue अटलिस्ट चेंज करायला सांगतात कारण हल्ल्याची कन्फर्म इंटेल असते( हा शब्द सवयीचा झाला) तरी पण काहीही इमोशनल कारणं देऊन ती ते नाकारते. गनिमी कावा करायचा ना...
शेवटी क्लायमॅक्स च्या सीन ला एवढ्या मोठ्या विमानामागे हे दोघे पळतायेत ते पण त्यात explosives असल्याचे माहिती असूनही.
Chellam च पात्र खूप आवडलं. मनोज वाजपेयी बद्दल काय बोलावं?acting इन्स्टिट्युशन आहे तो...
गावी / नात्यात आर्मीत बरेच
गावी / नात्यात आर्मीत बरेच जण आहेत. अगदी जवानापसून ते अधिकारी आहेत. इंटेलिजन्स मधे काम करणा-यांचे खरे किस्से वाचनात आले आहेत. त्यावरून थोडंसं.
(वेबसिरीज निर्मात्यांचं काय म्हणणं आहे ते मला ठाऊक नाही. त्यांची बाजू मी घेणं मलाही चमत्कारीक वाटतंय. पण इथल्या ज्या प्रश्नांची उत्तरं सापडली आहेत असे वाटतेय तेव्हढंच लिहीतेय. वेबसिरीजवाल्यांनी असाच विचार केला असेल का हे ठाऊक नाही. त्यामुळे लोकांना पडणारे प्रश्न जेन्युईन आहेत यात शंका नाही).
आर्मी किंवा संरक्षण खात्यात सेन्सिटिव्ह जागेवर काम करणा-यांना घरच्यांना काय सांगावे काय सांगू नये याच्या कल्पना दिलेल्या असतात. संरक्षण खात्यात सिव्हिलियन्स सुद्धा असतात. सरकारी कामासाठी कुठे जात असेल तर घरी आलेल्या फोनवर चौकशी झाली तर कुठल्या गावाला गेले हे सांगायचे नसते. अनेकदा विमा एजंट, बँक वाले अशी बतावणी करून अर्जंट काम आहे असे सांगितले जाते. घरी नाहीत म्हटले की कुठे गेले, कधी येणार असे प्रश्न विचारले जातात. घरच्यांकडून माहिती लीक होण्याचा धोका नसेल तर नाही सांगितले तरी चालते.
लडाख भागात पोस्टींग असलेल्या जवानांना फोन करण्याची परवानगी पूर्वी नव्हती. पण कारगिल युद्धाच्या आधीपासूनच फोन सुरू झाला. या फोनवरून घरी आपल्ञासोबत किती जण आहेत हे सांगू नये ही अपेक्षा असते. हवापाण्याच्या गप्पांना परवानगी आहे. जवान वगैरेंकडे सेन्सिटिव्ह इन्फर्मेशन असतेच असे नाही. पण मूव्हमेंट्सच्या बातम्यांवरूनही निष्णात हेर महत्वाच्या बातम्या काढू शकतात. त्यामुळे काय बोलायचे , कुठे बोलायचे याचे कोड ठरलेले असतात.
इंटेलिजन्सच्या लोकांना पूर्ण मोकळीक असते. ते जबाबदार असतात. अनेक ऑपरेशन्स मधे स्थानिकांची मदत घेणे किंवा एखाद्या गुन्हेगारी टोळीला हाताशी धरणे असे त्यांना करावे लागते. काही बाबतीत विश्वास टाकावा लागतो. हे सर्व त्यांच्या अक्कलहुषारीवर अवलंबून असते. काही लोकांची मदत घेण्यासाठी त्यांना स्वातंत्र्य आहे. अशी व्यक्ती जर निवृत्त इंटेलिजन्सची असेल आणि दोघात विश्वासाचं बॉण्डिंग असेल, त्याच्यामुळे मदतच मिळत असेल तर आक्षेपार्ह वाटत नाही काही.
इंटर्नल इंटेलिजन्सचा रोल हा एखाद्या ऑपरेशनची बातमी काढणे हा असतो. उधळून लावण्याचे काम करण्यासाठी या बातम्यांचा उपयोग पुढच्या जबाबदार एजन्सीज करतात. एक्स्टर्नल एजन्सीजना मात्र स्वतःच सगळी कामे पार पाडावी लागतात. चुभूदेघे.
Pages