वेबसीरीज २

Submitted by sonalisl on 2 June, 2021 - 19:58

तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा वेबसीरीज. ( https://www.maayboli.com/node/65774 ) या धाग्यावर सुरू झाली. आता तिथली प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

असं क्वचित होतं, पण होतं. मन है की जल्दी मानता नही.

विचार करता मला आठवले की सँड्रा बलॉक पण आवडत नव्हती. मग खूप काळानंतर तिचा एक सिनेमा पाहिला ज्यात ती आवडली व आता खूप आवडते. तिचे सिनेमे कमी येतात. आल्या आल्या मी जाते पहायला. मस्त काम करते.

पात्राचे सौंदर्य, हुषारी, आत्मविश्वास अभिनयात सहज पेलवता यायला हवे >>> श्रि.पि.ने हे सहज पेललं आहे.

सुनिधी, श्रि. पी. ला माफ करून पुन्हा चान्स दे..महाग्रू साठी Wink

जोक्स अपार्ट, तिचा परफोरमन्स खरंच सुधारलाय. तो अली जफर खोलीत एकटा कोंडून घेतो स्वतःला त्या छोट्याश्या मुव्हीत पहिल्यांदा आवडली ती. आव न आणता काम करते!

"man vs Bee" पाहतय का कोणी (नेटफ्लिक्स) ?>>>>>>>>>>> काल बघितली.
मस्त आहे टाईमपास. १० -१२ मिनिटाचे छोटे एपिसोडस आहेत. लगेच बघून होतात. एक सलग मुव्हीच केला असता ९० मिनिटाचा.
टीपिकल मि. बीन्स नेहेमीप्रमाणे. एका माशीला घरातून हाकलवायला पछाडलेला. मजा आली बघायला.

श्रि. पी. ने झी ५ वर च्या broken news मधे ही चांगले काम केले आहे. मला सोनाली बेन्द्रे पण आवडली त्यात..

कोणी कोरीयन मनी हाईस्ट बघतय का? मुळची स्पॅनीश खुपच आवडली होती. पण ह्यात अजुन तरी मजा येत नाहीये. पहीला एपीसोड जेमतेम बघितला, कंपॅरीझन ने तर अज्जिबात आवडली नाही.प्रोफेसर, टोकीओ, रिओ, डेनव्हर कोणीच आवडला नाही.

Voot select वर "बंदो मै था दम" नीरज पांडे ने(स्पेशल ऑप्स वाला)डिरेक्ट केलेली डॉक्युमेंटरी ड्रामा वेबसेरीज रिलीज झालीय.इंडिया ऑस्ट्रेलिया टेस्ट मॅच चा परत एकदा थरार पाहायचा असेल तर नक्की बघा behind scene footage, पत्रकार ,क्रिकेट खेळाडू आणि कोच यांच्या मुलाखती असलेली ही वेबसेरीज क्रिकेट फॅन्स नि चुकवू नये.4 एपिसोड आहेत.

https://youtu.be/92FWIaJ0hGY

काही एक स्पॉयलर अलर्ट.

स्ट्रेंजर थिंग्ज सीजन ४ वोल्युम २ नक्की नक्की बघा. भाग सात आठ नौ. एकदम एपिक लै भारी आहेत. काल बघितले व झोप आली नाही. एक एक डिटेल आठवत बसले होते.( गेम इवेंट खेळून पूर्ण केला त्यात) संगीत पण सुपर. भाग नौ जवळ जवळ तीन तासांचा आहे. जास्त च वा टतो.
किचन चा लाइट ऑन ठेवुन झोपले.

त्यात बसच्या टपावर गिटार वाजवून एक जन गिधा डांना बोलवुन आणतो ते गिटार पीस फार टॉप क्लास मेटल आहे. स्पॉटिफाय वर पूर्ण प्ले लिस्ट उपलब्ध आहे. ऑसम ऑसम

ह्याच्या सब रेडिट वर उत्तम माहिती एकाने दिली आहे. तो डी अँड डी गेम मध्ये वेकना च्या एका भागाचा कॅरेक्टर व एरिआ डेव्हलपर होता.
वेकना च्या विरुद्ध एक लिडिआ म्हणून देवी असते. संगीत लाइट व प्रवास ह्यांची. तिचे संदर्भ सर्वत्र आहेत.

हो मला आवडला सीझन ४. मस्त होती फिनाले!
बसच्या टपावर गिटार वाजवून एक जन गिधा डांना बोलवुन आणतो ते गिटार पीस >>> येस्स , तो आणि इतर पण ८०ज गाण्यांचे पीसेस आहेत जे आता नव्याने पॉप्युलर झालेत टीन्स मधे! मजा येते त्या गाण्यांनी.

सुडल पाहिली प्राईमवर.
सस्पेन्स, थ्रीलर, शेवटचा भाग प्रेडिक्टेबल वाटला तरी सादरीकरण चांगले वाटलं.

रिकॅप दिलाय
Submitted by अंजली_१२ on 24 June, 2022 - 20:49

>> मला कुठेच रीकॅप सापडला नाही. त्यामुळे काहीही टोटल लागत नव्हती. कोणी SHE पार्ट २ बघणार असाल आणि SHE पार्ट १ मधले काहीही आठवत नसेल तर फास्ट फॉरवर्ड करत थोडा अंदाज घ्या लोकहो.

पार्ट २ एकदा बघायला ओके वाटला. पण काही गोष्टी अ आणि अ वाटल्या. त्यामूळे पुन्हा बघणार नाही.

मी पण बघितले दोन्ही सीजन she चे. अजिबात आवडली नाही. पूर्ण दोन्ही सीजन एक निराशा भरून राहिली आहे. अदिती पोहनकर तर फारच उदास आधीही आणि नंतरही. ती बदललेली मला कळलीच नाही. आधी हळू आवाजात बोलायची नंतर चढया सुरात. असं कोणाला पाठवतात मोठया डॉनकडे. तिला किती दिवस सांगतच नाहीत ती नोकरीवर आहे की नाही. मग ती अचानक फेर्नांडिसबरोबर जायला तयार होते, काय तर म्हणे मी काहीही करायला तयार आहे. ह्याने नक्की काय सिद्ध झाले. गरीब लोकांचा अंत बघायचा ही घाणेरडी वृत्ती दिसली फक्त. सास्याला बघून भीती वाटली. त्याची भाषा छान वाटत होती ऐकायला. नायक मूर्ख वाटला. तो व्हिडीओ गेम खेळतोय असे वाटत होते. ती फर्नांडिसच्या टीम मधलीबाई सामील असते असे प्रसंग दाखवले पण पुढे काही शेवट नाही केला त्याचा. तो छक्का कसा बदला घेणार असतो. त्या अमेयचे चोरून शूटिंग करतात त्याचे पुढे काय झाले काहीच दाखवले नाही. भूमी नक्की कुठली हिंदी बोलत असते, ऐकून कसेतरी होत होते. नंतर ती खरंच पुरुषी वाटायला लागली.

मराठी लोक असे हिंदी बोलतात, असेल. मै करुंगी म्हणतात की मै करेगी. तिच्या बॅकग्राऊंडचे लोक बोलत असतील असे हिंदी.

अत्यंत बकवास she.. सॉफ्ट पॉर्न वाटतं.. अल्ट बालाजी वर नाहीये ना चुकून असं वाटलं मध्येच.. पण अभिनय बरा आहे तिथल्यापेक्षा... उगाच unnecessary डिटेल आहेत.. भूमीच्या sexual exploration चे..

Stranger things अत्यंत कमाल.. मी सगळे सीझन एकदम च पाहिले.. जबरदस्त acting.. story, twists.. सगळंच.. waiting for next season now Happy

पूर्ण दोन्ही सीजन एक निराशा भरून राहिली आहे. अदिती पोहनकर तर फारच उदास आधीही आणि नंतरही.

>> याला एकदम १००% अनुमोदन. ती कधीच उत्साही, आनंदी, आशावादी काहीही वाटली नाही. आधी नाही, नंतर नाही, मध्ये नाही.

रानबाजार पाहिली.

महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांच्या वर बेतलेली पात्रे घेतली आहेत.
दिग्द्शकाने च मुख्य भूमिका साकारली आहे पण त्याची एवढी छाप काही पडतं नाही.
प्राजक्ता माळीने पात्राला न्याय द्यायचा पुरेपूर प्रयत्न केला आहे पण मला का कुणास ठाऊक कमी जाणवली.

सचिन खेडेकर, उर्मिला कानेटकर, वैभव मांगले यांनी अश्या फुटकळ भूमिका का स्वीकारल्या असतील काय माहीत.

मांगले, अनासपुरे यांच्या तोंडी घाणेरड्या शिव्या आहेत. कससच वाटल

ताईसाहेब चा रोल करणारी अभिनेत्री हिरव कुंकू टाईप सिनेमात रोल करणारी अभिनेत्री आहे. उगीच शिव्या देत आक्रस्ताळेपणा करणार पात्र आहे ते.

सस्पेंस पण फुसका आहे.
उगीच वेळ वाया गेला, नाही पाहिली तरी चालेल

मला त्या प्राजक्ता माळीला फक्त तू जरा गप्प बस गं असेच सांगावे वाट्ते. दिसते सुरेख पण किती ओरडा आरडा. हास्य जत्रेतील तिचे कपडे पण अगदी विचित्र डिझाइन्ड असतात. अप साइड डाउन मधल्यासारखे. केवळ तिच्यासाठी मी ते हास्यजत्रा बघणे बंद केले. नाही तर स्किट्स छान असतात ती. साध्या कपड्यात सुरेख दिसते ही.

रान बाजार मध्ये बोल्ड रोल केला आहे म्हणे. पण त्या साठी नवे अ‍ॅप डालो करायचा वैताग आला.

Pages