दृष्टी

Submitted by मिरिंडा on 31 May, 2021 - 12:07

कुणी करावे सहन सारखे
कुणी गाळावे अश्रू सारखे

कुणी लोकांना त्रासच द्यावा
कुणी सारखे गोंजारावे

कुणी जगणे सुलभ करावे
कुणी पायदळी तुडवून घ्यावे

कुणी संतांची कास धरावी
कुणी लक्ष्मीला लेऊन घ्यावे

कुणी अंतीचे विधी करावे
कुणी यज्ञाचे मंत्र म्हणावे

कुणी नासाग्री ध्यान करावे
परमेश्वराला आळवित राहावे

सुख पाहातच जगत राहावे
दु:ख झांकुनी ठेवत राहावे

जगणे रोजचे सुसह्य व्हावे
देव नको दानव नको

मात्र माणूस म्हणून टिकावे
चैतन्याला धरुन राहावे

न दिसणाऱ्या देवाकरिता
वाद,युद्ध रक्तपात नसावे

हीच प्रार्थना विश्वापुढती
या जन्माचे सार्थक व्हावे

अरुण कोर्डे ९००४८०८४८६

Group content visibility: 
Public - accessible to all site users