डोह

Submitted by नतद्रष्ट on 20 May, 2009 - 03:23

तुझ मोहक रुप आता दिसणार नाही,
माझ मनातुन वाहणं तुला कळणार नाही,
दाटुन आलेल्या धुक्या आड, खोल डोह,
निशब्द, अथांग तुझा वियोग, मोहवणार नाही.

खोल जखम ठसठसत राहील,
हळुवार फ़ुंकर थरथरणार नाही.

जखम हळवी झाल्ये, जखम पोरकी झाल्ये,
अनादी शांततेच्या शोधात वणवणतोय जीव तहानलेला.
आता सौख्य नको, आनंद नको, शांतता नको,
फ़क्त हवी आहे वेदना..
अनंत ठसठसणारी..
हळवी होऊन भळभळणारी.

हो हो खर आहे, गिधाडांनो,
मी दु:खं कुरवाळतो आहे,
मूक रुदन अनुभवतो आहे,
पण दृष्टिस पडणार नाही तुमच्या, एकही अश्रु...

हे सुख लोलुप जळवांनो,
कितीहि डसलात माझ्या अंगांगी,
सांडू देणार नाही रक्त, तुमच्या वांझोट्या दंशाने...
पिऊन घ्या, पिऊन तृप्त व्हा,
थेंबा थेंबात मिळेल तुम्हाला आनंद..
मीच उधळलेला.. माझ्याच अश्रुंनी ओथंबलेला.

गुलमोहर: 

पर्‍या, छान........ फ्रस्ट्रेशन दाखवण्यासाठी अचूक शब्द वापरले आहेस....... Happy

अप्रतिम !

***********************************
मनामधली कविता घेऊन, कागद माझा उडतो आहे,
उतरेल त्याच प्रदेशात, चंद्र जेथे बुडतो आहे !!

मंजे आत्ये तुला मोदकांच अख्ख ताट ग दिवेआगरच्या केळकरांकडच Happy

परेश ही देखील सुंदर आहे. फक्त दुसर्‍या ओळीत "वहाण" मधे "ण्"च्या वर अनुस्वार दे, नाहीतर अनर्थ होतोय Happy
************
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची | झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ||

आन धनवड्यांकडचे मासे पण !! Happy

***********************************
मनामधली कविता घेऊन, कागद माझा उडतो आहे,
उतरेल त्याच प्रदेशात, चंद्र जेथे बुडतो आहे !!

केवळ अप्रतिम परेश ! शिर्षक ही अप्रतिम

परेश तुला एडीटेड फाईल पाठवु का? तू वाहणं/ वहाणं लिहायच्या जागी मी केलेलीच चुक केल्येस Proud

विशल्या मासे नकोत, कवे मोदक चालतील Proud

सोमणांच्या नावाला कलंक आहेस आत्ये Wink

***********************************
मनामधली कविता घेऊन, कागद माझा उडतो आहे,
उतरेल त्याच प्रदेशात, चंद्र जेथे बुडतो आहे !!

परेश, खुप छान. अजूनही एकाच हाताने कविता करतोस का?( फोटोत नेहमीच तुझा हात प्लास्टरमधे असतो म्हणून म्हटले!)
.............................................................................
येता कणकण कवितेची
करा तपासणी डोक्याची!

वार्‍याची बात !
वार्‍यावरची नाही !! ---
"सुंदर! "

धन्स सगळ्याना. जे काही खरडलय ते वाचावस वाटल तुम्हा सगळ्याना, हेच खुप आहे. Happy

सु रे ख..

*******************
सुमेधा पुनकर Happy
*******************

आयला पर्‍या इतक्या सभ्य भाषेत आभार मानु शकतो, क्या बात है पर्‍या ! बिघडलास तु पण Happy

***********************************
मनामधली कविता घेऊन, कागद माझा उडतो आहे,
उतरेल त्याच प्रदेशात, चंद्र जेथे बुडतो आहे !!

उम्या, लेका किति खेचावी एखाद्याची.. Wink

परेश छान रे !
वेदना,वेदना फक्त वेदना प्रत्येक शब्दात डोकावणारि!

************************

नको ओढ लावुन घेउ उन्हाची ,जसे पारधि हे तसे तीर टोची
पिसामागुनि ग पिसे दग्ध होति, भररि परि मृत्तिकेशीच अंती

अथांग डोह!
मस्त.
..सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो..

पर्‍या ची सभ्य भाषा....... मायबोली वर काय पहायला मिळेल सांगता येत नाही....... विशाल, सोमणांच्या नावाला कलंक??? राहायचय ना पृथ्वीतलावर?? आत्याशी गाठ आहे..........:डोमा:

छान कविता!!
ह्या कवितेतून कविचा सोशिकपणा दिसून येतो!!:)

**********************************
लोग कहते थे की ओ मेरे जनाजे पे रोये नही !
मुझे तो खुशी इस बात की,की हमने उन्हे आख्रीर तक रुलाया नही|
गणेश कुलकर्णी (समीप) ९७६४७७३२५७, पुणे-२७
**********************************

गण्या, तुलाच रे, फक्त तुलाच कळल , मी किति सोसलय ते..

पहिल्या कडव्याचा आणि बाकीच्या कडव्यांचा संबंध काही समजला नाही !!
....थोडक्यात कविता डोक्यावरून गेली..

----------------------------------------------------
If you follow all the rules, you miss all the fun!
http://www.mokaat.blogspot.com/

एक्झॅक्टली मोकाटराव. मला तरी कुठे कळल्ये अजुन. Wink

ओहोहो!!....आयला..असे आहे होय्!....मग ठिक आहे..:-)
मला वाटले की मीच एकटा बुध्दु आहे की काय कविता न समजलेला Wink

----------------------------------------------------
If you follow all the rules, you miss all the fun!
http://www.mokaat.blogspot.com/

सुरेख!
फ़क्त हवी आहे वेदना..
अनंत ठसठसणारी..
हळवी होऊन भळभळणारी.

आवडेश!

मित्रा, माझा वैचारिक गोंधळ उडाला आहे. मला खरेच कडव्यातला परस्परसंबंध नीट लक्षात येत नाहीये. हा माझ्या अकलेचा दोष असेल.
.........................................................................................................................

http://kautukaachebol.blogspot.com/

मित्रा तुझ्या नव्हे. हा माझ्या अकलेचा दोष आहे. हे मी लिहिलेल नाही. हे लिहिल गेलं . जे माझ्या हातात नव्हतं. असो. या उत्तराने तुला गोंधळ संपणार नाही , पण आहे हे अस आहे. Happy

पर्‍या असल्या कसल्या रे ह्या जखमा.. धड दाखवता सुद्धा येत नाही अन शिवता सुद्धा येत नाही. , जखमांच वर्तूळ स्वतःभोवती आखून परीघरेषेवर बरोबर वणवा पेटता ठेवल्यासारखं वाटलं. मस्त आहे कविता.

Pages