बाजार

Submitted by मिरिंडा on 23 May, 2021 - 03:27

बाजार मांडिला मी
संतप्त भावनांचा
सूड भावनेची परि
विक्री अफाट झाली

घेण्या न कोणी आले
प्रेमभावना ओली
रुसूनी कोपऱ्यात बसली
घालोनी मान खाली

मत्सरात रमले सगळे
भोगात सुख मिळाले
सात्विक भावनेचा
गळा घोटुनी पळाले

अनर्थ षड् रिपूंचा
हवाहवासा वाटे
भोग जन्मोजन्मीचे
कवटाळणे सोपे झाले

सारथी अर्जुनाचा
दुर्योधनास रक्षी
चार युक्तीच्या गोष्टी
सांगणारा थिजोनी जाई

मोक्ष अनाथ झाला
भीक ना घाली कोणी
अध्यात्म जाळण्या सारे
चूड घेवोनी धावले

आधार तिमिराचा वाटे
प्रकाश लाजून लपला
तत्वास मुरड घालणे
नारा नवीन आहे

अरुण कोर्डे ९००४८०८४८६

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान