अर्थ लागलेला

Submitted by मिरिंडा on 23 May, 2021 - 03:19

संगीत आजचे हे
का क्षुब्ध होत आहे
वाद्ये अनेक असती
तरी काव्य उजाड आहे

प्रेमळ भावनांचा in
बाजार बंद आहे
पोट सानुल्याचे
रितेच राहातं आहे

चोरी बोकाळली ही
द्वाही फिरतची आहे
नि:शब्द मौन आता
व्यक्त होत आहे

कुणी कुणास द्यावा
ठाव या अंतरात
बळकावणे घराला
नित्याचेच होत आहे

आता एकच आशा
वास्तवास धरुन राहणे
भावनांना मुरड घालुनी
सत्यास ओळखावे

अरुण कोर्डे

Group content visibility: 
Public - accessible to all site users