प्रतिकार

Submitted by मिरिंडा on 23 May, 2021 - 03:14

शेंगाही न खालल्या मी
टरफले ही न टाकली मी
उचलू कशास त्यांना
शिक्षा कशास मजला

जे पाप कधी न केले
अंतरी कसे भिडावे
टोचणी नसे मला ती
मी बंधमुक्त आहे

ज्यांचा न वाली कोणी
अंतरी वसे मी त्यांच्या
शस्त्र उगारले जरी
छातीस ढाल आहे

सत्यात हिंमत आहे
डोक्यात धाडस आहे
झटकून भीती टाका
असत्य तेथ आहे

अरुण कोर्डे
९००३८०८४८६

Group content visibility: 
Public - accessible to all site users