उध्वस्त घरटं

Submitted by मिरिंडा on 23 May, 2021 - 03:11

-
तोडलेल्या झाडावरचं
उध्वस्त घरटं
पिलांचा चिवचिवाट
चिमणीचं हिरमुसलेपण

कसंनुसं तोंड करीत
चिमणा म्हणाला
"पावसाळा आहे
असं समजून,
परत लागेल बांधावं
पिल्लांची गर्दी तीच ठेवीत
कारण कालच येऊन गेलेत
कुटुंब नियोजनवाले
दंडाची धमकी देत "

चिमणी उगी राहून
म्हणाली, " घरटं उजाडलंय
परत आले तर बोलवा मला
घेतेच खबर एकेकाची
सरकारच कोसळेल मेल्यांच "

अरुण कोर्डे
९००४८०८४८६

Group content visibility: 
Public - accessible to all site users