आई

Submitted by मिरिंडा on 23 May, 2021 - 01:41

आई तुझे कर्ज
उतरो न कधी
माथ्यावरचे
हीच प्रार्थना देवा

आई तुझा विसर
कसा पडावा मजला
पदोपदीचे कष्ट तुझे
आठवती पुन्हा पुन्हा

तुझा स्पर्श
तुझे गीत
तुझे संरक्षण
तूझे कवच
घेउनी मोठा झालो

विश्वव्यापक व्यवहार सारे
साध्य तुझ्या आशिर्वचने
निराशेतही मार्ग दाखवी
तव प्रतिमा मज संगे

आता राहिला
आठव निव्वळ
पुन्हा कधी
येशिल जवळ

अरुण कोर्डे ९००४८०८४८६

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users