हरि

Submitted by _आदित्य_ on 22 May, 2021 - 19:28

डोळे उघडता तुझे,
आधी हरि आठवावा..
चित्ती हरिचं असावा,
झोपी जाता !

मगं पुढे दिनं सारा,
कर्मयोगे ढकलावा..
आतं हरि असू द्यावा,
निरंतरं !

सदा जेवताना तोंडी,
घासं हरिनामे घ्यावा..
वेळी मोकळ्या जपावा,
सुखे हरि !

काही वाचावे वाटले,
तरं हरिचं वाचावा..
अनं हरिचं लिहावा,
भक्तिभावे !

भेटशीलं ज्या कुणाला,
त्यात हरिचं पहावा..
नित्य हरि वसवावा,
अंतरातं !

अनं तुझ्यातूनं सदा,
हरिगंध दरवळावा..
एकं हरि ओळखावा,
परम सत्य !

भारं जीवनाचा सारा,
हरिवरं सोपवावा..
खरा आंनद जाणावा,
हरि ठायी !

द्वैत संपूनं उरावा,
अद्वैत हरिरावा..
हातं तयाचा धरावा,
श्रद्धाभावे !

मगं तुझ्यातला हरि,
तुझा तुलाचं कळावा..
एका क्षणातं ढळावा,
मायापाशं !

जन्म सारा ज्ञानयोगे,
हरिभक्तीत सरावा..
आणि पुढे मुक्त व्हावा,
आत्मा तुझा !

-आदित्य

Group content visibility: 
Use group defaults