उषःकाळ

Submitted by नितिन वैद्य on 22 May, 2021 - 19:09

उभ्या दुपारी, विना विचारी
परतूनि आले वादळ
लावूनि गेले सर्वदुरी
जणू काही काजळ

काही दिसेना, काही कळेना
असून उघडे डोळे
मनास काही विचार सुचेना
पुसले गेले सगळे

म्हणे कधीच थांबत नाही
वेळ आणि हा काळ
रात संपता संपेना ही
कधी होईल उषःकाळ?

कमलात गुंतला हा भ्रमर
नको आता तो परिमळ
कधी होतील आठ प्रहर
उजेडाशी अंतरीचा मेळ

अंधारातही सारी दुनिया
कसे मांडतेय खेळ
अरुणोदय असेल बघुया
झाली कदापी वेळ

कधी उजाडले? काढु आता
अंधाराचे जाळे
देव देव करता करता
बंद केलेले डोळे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults