प्रतीक्षा !

Submitted by _आदित्य_ on 18 May, 2021 - 13:23

अभ्यास काही न केला जिचा मी,
आयुष्य हे ती परीक्षा असावी !
मी जे गुन्हे पूर्वजन्मात केले,
बहुदा तयांचीच शिक्षा असावी !

केव्हातरी दान पदरात पडते,
मला जी मिळाली ती भिक्षा असावी !
तो देव जो येत नाही समोरी,
तयानेच केली उपेक्षा असावी !

का कोण जाणे परी वाटताहे,
कुणाचीतरी ही अपेक्षा असावी..
हे अडथळे पार केल्यावरी मी,
मिळणार मजलाच दिक्षा असावी !

अंधार असता मला जन्म देऊन,
कोणीतरी केली रक्षा असावी !
माझ्याप्रमाणेच त्यालाही माझी
आतुरतेने प्रतीक्षा असावी !

-आदित्य

Group content visibility: 
Use group defaults

Thanks..