विधीलिखीत

Submitted by प्रकाश काळेल on 19 May, 2009 - 10:15

आठवते ती पहिली प्रत्यक्ष भेट?
अबोली नि:शब्द,मुक चाफा होता
काय तो पण प्रसंग बाका होता!

डाव्या पायाच्या तर्जनीवर स्थिर
नजरेचा, तो अनाहूत हल्ला होता
काय तो पण घायाळ क्षण होता!

डोळ्यांवाटे तू आंत प्रवेश केलास
थेट अंतःकरणास हात घातलास
काय तो पण मनोहर स्पर्श होता!

झाली नसांची पृच्छा, कणांची साक्ष
तरी प्रत्येक कोपरा तू निरखलांस
काय तो पण गोड तपास होता !

मनांना पटली सर्व खुणांची खात्री
ओळख जुनी,गतजन्मीची,युगांची..!
काय तो पण उरलेला संभ्रम होता!

विधीलिखीताचा हा जर मेळ होता
भेटाया झाला का उशीर होता?
काय तो पण करूण प्रश्न होता !

------------------------------
प्रकाश

गुलमोहर: 

अप्रतिम, मस्तच !!
Happy

---------
रुसुन रुसुन रहायच नसतं, हसुन हसुन हसायच असतं !

हल्ला, स्पर्श आणि तपास सर्व मस्तच. सुंदर शब्दरचना.
..सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो..

भलेबहाद्दुर... हा प्रश्न वहिनींना विचारायचा रे राजा ! Wink
प्रकाश, खुप सुंदर, जियो दोस्त !!

मस्त प्रकाश Happy

वार्‍याची बात !
वार्‍यावरची नाही !! ---
" सुंदर! "

क्या बात है!!!! मजा आली... Happy

*******************
सुमेधा पुनकर Happy
*******************

पक्या, तुला पण विशालसारखी जुनी वही सापडली का?
.............................................................................
येता कणकण कवितेची
करा तपासणी डोक्याची!

सुंदर शब्दांचा मेळा Happy
************
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची | झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ||

नाही रे उमेश, कवितेला अजुन वही घातलेली नाहीये ! कवितेची ही नवी आवड ,मायबोली आणि तुझ्यासारख्या प्रेरणादायी कविंमुळे जडली. धन्यवाद!

पक्या, लय भारी रे, अफलातून Happy

खुप सुरेख...वर्णन करायला शब्दच नाहित.....
"करूण प्रश्न"..फर फर आवडला.

*********************************
आज चुकुन बंदीस्त आठवणींच द्वार उघडल,
उध्वस्त क्षणांन मधे माझ प्रेत आढळल!!!

प्रकाश,
अतिशय सुंदर, सुरेख. पायाच्या अंगठ्याने जमीन खोदायचा प्रयत्न करणारे आणि त्याच्याकडे बघताबघता हळुच तुमच्याकडे चोरटा कटाक्ष टाकणारे सुंदर चित्रकाव्य डोळ्यापुढे उभे केले तुमच्या या कवितेने.

- मुकुंद कर्णिक
मुकुंदगान:- http://mukundgaan.blogspot.com
भगवद्गीता:- http://marathi-bhagavadgita.blogspot.com

मस्त..
=========================
"हाती घ्याल ते घरीच न्याल"

आवडली रे..
- अनिलभाई
It's always fun when you connect.

विधीलिखीताचा हा जर मेळ होता
भेटाया झाला का उशीर होता?
काय तो पण करूण प्रश्न होता !
>>> बढिया...keep it up!..:)

खल्लास !! फारच आवडली! अजुन काय बोलु?

----------------------------------------------------
If you follow all the rules, you miss all the fun!
http://www.mokaat.blogspot.com/

पुन्हा एकदा सर्वांचे आभार !

अनिलभाई,मुकुंददा तुमचे खास आभार Happy

सुंदर.

ओवराथ, मानवलं गड्या तुला.
.........................................................................................................................

http://kautukaachebol.blogspot.com/

Pages