Calendar spread कॅलेंडर स्प्रेड आणि इतर ऑप्शन स्ट्रॅटेजीज

Submitted by BLACKCAT on 15 May, 2021 - 10:54

अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा

ह्या मे पहिल्या आठवड्यात निफ्टी 14500 असताना डबल कॅलेंडर स्प्रेड केले.
14500 मे कॉल व पुट सेल केले
14500 जून कॉल व पुट बाय केले.

नुसतेच कॉल किंवा नुसतेच पुट जोडी केली की त्याला सिंगल स्प्रेड म्हणतात , दोन्हीपण एकदम केले की त्याला डबल स्प्रेड म्हणतात.

चौघेही एकमेकांना हेज करतात, सुरुवातीला कधी 200 मायनस , कधी 800 प्लस असे होत रहाते , 2100 मायनसपण झाले होते , पण हट्टाने सुरूच ठेवले , कारण ऑप्शन झिजायला म्हणजे क्षय व्हायला वेळ लागतो .

15 दिवस गेले की करंट मंथचे ऑप्शन्स झिजू लागतात व हळूहळू प्रॉफिट दिसू लागते .

अंत उन्नतीचा पतनी होई या जगात
दिसे भासते ते ते सारे विश्व नाशवंत
वर्धमान ते ते चाले मार्ग रे क्षयाचा

आता अजून 4,6 दिवसात प्रॉफिट 8 ते 10 हजार जाईल , ह्या सगळ्या झिजाझीजित निफ्टी 100 ते 120 पॉईंट आरामात मिळून जातात.

ऑप्शन ट्रेडिंगमध्ये सामान्य माणसाला 2 राक्षस छळत असतात

ऑप्शन बाय केले की तो कमी कमी होतो व झिजतो , ह्याला भस्मासुर राक्षस म्हणतात.

ऑप्शन शॉर्ट सेल केले की तो कमी न होता वाढत जातो व आपल्या अंगावर पडतो , ह्याला घटोत्कच राक्षस म्हणतात.

हेज केले की दोघे एकमेकांत भांडत बसतात. Proud आपण 15 दिवस गप्प बसून रहाणे.

1. पोझिशन महिन्याच्या सुरुवातीला घ्यावी, निफ्टी स्पॉटच्या जवळचे ऑप्शन निवडावेत.
2. करंट मंथ कॉल पुट सेल करणे
3. नेक्स्ट मंथ कॉल पुट बाय करणे
4. पोझिशन घेताना आधी बाय करणे , मग सेलच्या पोझिशन घेणे , चारही पोझिशन घेताना सुमारे एक लाख मार्जिन लागते.
5. पण नंतर पोझिशन हेज झाल्याने साधारण 60,000 इतकेच मार्जिन लागते व उर्वरित मार्जिन दुसऱ्या दिवशी मोकळे होते.
6. हळूहळू जवळचे ऑप्शन झिजतात व लांबचे जास्त झिजत नाहीत, पण ही झीज सुमारे 15 दिवसानंतर दिसू लागते. तोवर रोजचे प्रॉफिट लॉस बघत बसणे. ते फारसे नसते , +2500 ते -2500 वगैरे होत रहाते.
7. वीस ते पंचवीस तारखेत शक्यतो प्रॉफिट बुक करावे, निफ्टीचे 100 ते 150 पॉईंट आरामात मिळतात.
8. सगळ्या पोझिशन एकदम स्क्वेअर ऑफ कराव्यात. आधी सेल पोझिशन क्लिअर कराव्यात , मग बाय केलेल्या पोझिशन काढाव्यात. म्हणजे दंड लागत नाही. तसेही सगळे एकदम काढणारच असल्याने दंड बसणारच नाही.
9. असे स्टोकमध्येही करता येईल , मला sbi बरे वाटले , पण कधी केले नाही,
10. बँक निफ्टीतही करता येईल, पण मला अभ्यास नाही.
11. लोक असेच दोन विकली , दोन 15 दिवसवाले , अशाही जोड्या करून स्प्रेड करतात, पण ते फारच धावपळीचे होते.
12. थोडे प्रॉफिट मिळाले 2,4 हजार की पोझिशन मोडून नवीन निफ्टी लेव्हलची पोझिशन घेणे , असेही ट्रेडिंग 2,4 दा करता येईल. पण मी कधी केले नाही.
13. ह्यात फंडामेंटल , टेक्निकल काहीही ज्ञान लागत नाही.
14. यु ट्यूबवर ह्यावर भरपूर व्हिडीओ आहेत.
Screenshot_2021-05-14-20-14-11-444_com.android.chrome.png

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी निफ्टी १८५०० PE 25 Nov घेतला आहे, स्विंग. 3500 प्रॉफिट जाऊन परत 1500 वर आला आज. १० हजार अपेक्षित आहेत. शुक्रवार पर्यन्त वाट बघेन.

टाटा स्टील कॉल 1 रु प्रॉफिट

Screenshot_2021-11-10-13-43-02-325_com.axis_.login_.png

ब्रेक आउट साठी हंकेनाशी वापरले

नंतर अजून वाढला होता , 60

इन्ट्राडे मध्ये रोजचे ब्रेक आउट कसे बघायचे

टाटा मोटर्स
हंकेनाशी आणि साधे कँडल आज 30 आणि 10 MA तोडून खाली आले

म्हणून 510 चा पुट घेतला , 30 पैसे प्रॉफिट ऑर्डर टाकली
5 मिनिटात उडाला , 800 रु

Screenshot_2021-11-11-10-21-49-987_com.android.chrome.pngScreenshot_2021-11-11-10-19-20-777_com.axis_.login_.png

मी निफ्टी १८५०० PE 25 Nov घेतला आहे, स्विंग. 3500 प्रॉफिट जाऊन परत 1500 वर आला आज. १० हजार अपेक्षित आहेत. शुक्रवार पर्यन्त वाट बघेन. >> टार्गेट पूर्ण झाले. 10800 प्रॉफिट बुक्ड.

छान

निफ्टी बेरिष एनग्लफीनग पेटर्न

पुट 80 ला बाय करून 90 ला काढला

IMG_20211111_134811.jpg

तो कसलातरी हॅमर पॅटर्न दिसला

शेपूट लांबडे असते तर त्याखाली भरपूर स्ट्रॉंग सपोर्ट असतो.

म्हणून कॉल बाय केला
ब्या नि गडगडला , पण hdfc bank खाली आला नाही , थोडा वर गेला, दीड रु प्रॉफिट बुक, 900 रु

IMG_20211116_120814.jpgScreenshot_2021-11-16-12-07-03-126_com.axis_.login_.png

मी चार्ट एन एस इ cash चा लावतो

आणि कँडलनुसार कॉल किंवा पुट बाय करतो, अगदी कमी प्रीमियम/ मार्जिन मध्ये ट्रेड होतो.

15 मिनिटं कँडल लावणे . ब्या नि , टाटा स्टील , टा मो, एसबीआय , एचडीएफसी , एचडीएफसी ब्यांक असे लावून ठेवायचे.

पहिली कँडल सोडून द्यायची , पुढच्या 2,3 कँडल मध्ये काहीतरी पॅटर्न कुठेतरी दिसतो.

एकदा तो पेटर्न येऊन गेला की मग नंतर 2,3 तास काही घडत नाही.

ब्यांक निफ्टी खालून वर आला

Hdfc bankने 15 मिनिट कॅण्डल ब्रेक आउट दिला

कॉल घेऊन विकला , पण शेवटचा आठवडा असल्याने आता ऑप्शन जास्त वाढत नाहीत , म्हणून लगेच काढला. फक्त 50 पैसे नफा

IMG_20211117_102730.jpg
>Screenshot_2021-11-17-10-24-25-681_com.axis_.login_.png

Tata steel

1. काळा बाण :

एकदा हाय गाठून मग रेड कँडल होऊ लागली , म्हणून पुट बाय केला. 70 पैसे मध्ये काढला.

पण पुढे परत वाढला , पण तोवर आपले प्रॉफिट आले होते

2.लाल बाण :

दोन्ही मुविंग एव्हरेज तोडून मोठी रेड कँडल आली, परत पुट बाय केला, 1 रु प्रॉफिट घेतले , नंतर अजून 3 रु वाढला होता. ह्यात लोअर टॉप लोअर बॉटमही दिसत आहे.

IMG_20211117_145646.jpg

आज tata steel , 15 मिनिट कॅण्डल ब्रेक आउट झाला, लोअर साईडला.
पण ब्रेक आउट 5 मिनिटातच इतका फास्ट झाला की ट्रेड घेणे जमले नाही. नंतर पण खूप खाली गेला.

IMG_20211118_105253.jpg

मग एचडीएफसीब्यांक पाहिला. ब्या नि वीक होता आणि हाही प्रत्येक कॅण्डलला हाय खाली खाली येत होता. मुविंग एव्हरेजजवळच लडबडत होता, म्हणून पुट बाय केला. लगेच खाली गेला. 2 रु मिळाले.

IMG_20211118_102054.jpg

F&O rollover -- a weak November -- ET.
===>
December तर अधिक week !!
16600 च्या वर closing may give hope, else...

मार्केट १० ते २०% ड्रॉडाऊन देईल किंवा consolidate होईल. आता या किंवा पुढिल महिन्यात नविन हाय करायची शक्यता कमी आहे.

Mean reversion, low beta, low volatility strategies मधे पैसे टाकायची/ वाढवायची, debt allocation वाढवायची वेळ आली.

जे SIP करतात त्यांच्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. आज मार्केटचे नॉर्मल करेक्शन (१०% from ATH) आलेले आहे.

मी सकाळीच थोड्या निफ्टीबीज खरेदी केल्या.

Screenshot_20211230-181744~2.png

आजच्या ओपनिंगला अशी कँडल , लांबलचक खाली शेपूट , शेपूट 34800 पर्यंत खाली लोम्बत होते

तिथे मोठा सपोर्ट असतो , म्हणून आजच्या एकसपायरीचे 34800 पुट शॉर्ट केले
1100 प्रॉफिट

मागच्या महिन्यात सध्या ट्रेडर्स मधे प्रसिद्ध असलेली Intraday Banknifty Straddle बॅकटेस्ट केली. रिझल्ट चांगले मिळाल्याने ती या महिन्यात ट्रेड करायला सुरुवात केली.

Entrytime:- 9.30 am

method:- short Banknifty ATM PE & CE

SL:- 25% for each position ( जर एन्ट्री १०० ला केली असेल तर स्टॉप लॉस १२५)

Trailing SL:-
1. If SL of one position is hit, move SL of other position to cost. ( so if mkt reverses, our loss is restricted to SL of only one position)
2. If profit in the running leg doubles than the loss in SL, move SL of position in profit equal to loss in SL. (so if mkt reverses we exit in no profit no loss)

Exit (if SL not hit):- Close price at 3.20pm

झेरोधा वर १,६०,०००/- चे मर्जिन लागते असे दाखवत आहे. मी कधी अ‍ॅक्च्युअल मधे किती लागते ते पाहिले नाही.

या महिन्यात १५७८६/- नफा झाला. या मधून ब्रोकरेज वजा केलेले नाही.

यात येत असलेली समस्या म्हणजे रोज वेगवेगळा स्टॉपलॉस येतो. जर आपली एन्ट्री ३०० ल असेल तर ३७५ स्टॉप लॉस आणि जर १०० ला झाली तर १२५. म्हणजे कधी जास्त लॉस होतो आणि कधी एक छोटी मुव्ह आली तरी स्टॉप लॉस हिट होतो, म्हणून मग आज ७५ रुपये स्टॉप लॉस ठेऊन बॅकटेस्ट केली. आपली एन्ट्री १०० ला असो की ३०० ला सरळ ७५ रुपये अ‍ॅड करुन स्टॉप लॉस लावायचा. त्यात पण नफा येत आहे. पुढील महिन्यात आता या पद्धतीने ट्रेड करुन त्यातून नविन काही निरिक्षणे मिळत आहेत का पाहणार आहे.

छान

माझ्या मते हे दहा वाजता केले तर जास्त नफा देईल

मी असे फक्त शुक्रवारी करतो

F&O ट्रेडींग ,

IT return File करताना Business Income दाखवायची ना ?
turnover वर presumptive ६% अशी Taxable income मध्ये जमा होते , " yearly loss" असेल तरी Sad
नाहीतर audit करावे हा पर्याय ,
तुमचे सर्वांचे अनुभव उपयोगी ठरतील....

मला FY21 चा return जमा करयाचा आहे...ह्म्म Sad

<<<turnover वर presumptive ६% अशी Taxable income मध्ये जमा होते , " yearly loss" असेल तरी Sad
नाहीतर audit करावे हा पर्याय .
>>>

हे डोक्यातून काढून टाका.
F&O trades बरेच असतील तर ITR3 फाईल करायचा. त्यात सॅलरी, बिझिनेस दोन्ही फाईल करता येतात. पण किचकट आहे. CA.कडुन करून घ्या. माझा CA १५००₹ घेतो त्यासाठी.

Turnover च्या ६% प्रॉफिट दाखवणे (कॅश वाला बिझिनेस असेल जसे किराणा दुकान किंवा कुठलाही ज्यात प्रत्यक्ष कॅशची देवाण घेवाण होते त्यात ८%) हा फक्त एक पर्याय आहे. अकौंटींग टाळण्यास. जर लॉस असेल किंवा ६% पेक्षा कमी प्रॉफिट असेल तर कोण कशाला उगाच ६% प्रॉफिट दाखवेल आणि फुकटचा टॅक्स भरेल?

जर आपण तो पर्याय निवडला नाही, आणि जर आपला टर्न ओव्हर एक करोडच्या वर (आकडा नक्की चेक करा एक करोड आहे की अधिक) असेल तर आपण ऑडिटसाठी पात्र आहोत. पण ऑडिट होईलच असे नाही. फार कमी लोकांचे ऑडिट होते. आणि ऑडिट झाले तरी त्यात घाबरण्याचे काय कारण? ट्रेडिंग मध्ये सगळे काही ऑनलाइन आहे, सगळे रेकॉर्ड असतात. जर तुम्ही expenditure दाखवले तर दहा हजारच्या वरील expenditure कॅश मध्ये नसावे, ऑनलाईन किंवा चेक द्वारे. बस.
उलट तुम्हाला लॉस असेल तर तो ITR3 मध्ये कॅरी फॉरवर्ड करता येतो, आठ वर्षांपर्यंत.

समजा तुमचा ऑफिस लॅपटॉप वेगळा आणि स्वतःचा वेगळा त्यावर तुम्ही ट्रेडिंग करता तर तो लॅपटॉप विकत घेतला त्यावर्षी expenditure म्हणुन दाखवू शकता, त्याचे बिल सांभाळायचे (स्कॅन करून ठेवले तरी पुरे). किंवा सेल फोन वापरत असाल ट्रेडिंगला तर तो expenditure म्हणुन दाखवू शकता. त्याचे महिन्याचे रीचार्ज, घरचे वायफाय कनेक्शनचे महिन्याचे चार्जेस expenditure म्हणुन दाखवू शकता.

मानवदा धन्यवाद , सविस्तर प्रतिसादाकरिता !!!!

CA.कडुन करून घ्या. >>> गेली ३ र्वर्षे CA, ITR3 भरतात presumptive ६% (?)..... मी लक्ष नाही घातले, पण ह्या वर्षी त्यांनी तर ३० डिसेंबरला सांगितले की ६२००० Tax भरावा लागेल तेही माझा yearly loss असताना, तेव्हा मी शोध व माहीती घेण्यास सुरवात केली....

<<ट्रेडिंगला तर तो expenditure म्हणुन दाखवू शकता >> ह्याकरिता ऑडिट आवश्यक आहे का.?

आता ३१ डिसेंबर निघून गेल्यामुळे ऑडिट करावे लागेल असे दिसते .
https://quicko.com/ हे बहुतेक F&O करिता IT return File करिता सेवा देतात....

तुमचा टर्न ओव्हर १ करोडच्यावर आहे का? किंवा कुठला 44AE, 44BB, 44BB या सेक्शनखाली येणारा बिझिनेस आहे का? (ट्रेडिंग यात येत नाही).
दोन्हीची उत्तरे नाही असतील तर तुम्हाला स्वतः ऑडीट करुन घेण्याची गरज नसावी.
३१ डिसेंबर पार झालाय तर लेट फी वगैरे लागेल.

बिझीनेस मध्ये वरिल प्रमाणे स्वतः ऑडिट करुन घेण्याची गरज नसतानाही, IT डिपार्टमेंट कडुन ऑडीट (scrutiny) होउ शकते. त्याचे ते काय निकष ठेवतात माहीत नाही. आधीच्या पोस्ट मध्ये कशाला घाबरायचे ते मी या ऑडीट (scrutiny) बद्दल म्हणालो. माझी नाही झाली अशी scrutiny गेल्या ३ वर्षात. झालीच तर सगळे रेकॉर्ड्स आहेतच.

इथे "Who is mandatorily subject to tax audit मधील टेबल बघा.

आणि ऑडिट साठी मर्यादा ५ करोड पर्यन्त यंदा वाढवणार अशी बातमी होती मध्ये. ते झाले की नाही, केव्हा होईल माहीत नाही.

अजून एक क्रायटेरिया आहे. Individual entity चे बिझिनेस इनकम >= २,५०,०० असेल तर ऑडीट लागेल बहुतेक.
तुमचा तर लॉस आहे ना?
माझे F&O income १ लाख पर्यंत गेले नाही कधी.

मानवदा धन्यवाद पुन्हा ,
कुठला 44AE, 44BB, 44BB या सेक्शनखाली येणारा बिझिनेस आहे का? == > नोकरी + ट्रेडींग ( गुंतवणोक) फक्त .

टर्न ओव्हर ०दा भेटला सहज, Icicidirect , Upstox ( closed now) शोधत आहे.

https://www.taxwink.com/blog/taxation-of-future-options
==> F&O income shall be taxed at the applicable income-tax slab rates.
===>
breakeven करिता - १०% ते २०% हे Tax चे पकडले पाहिजे...

माफ करा, वरील मी दिलेली माहिती चूकीची/जुनी आहे.
तुमचा CA म्हणतो ते बरोबर आहे.
मी आताच माझ्या CA शी बोललो. २०२०-२१ मध्ये माझे F&O ट्रेड्स नव्हते.
२०१९-२० मध्ये जॉब सोडुन नविन सुरु केलेल्या बिझिनेसचे इनकम + ट्रेडीन्ग इनकम म्हणजे माझे एकुण २.५ लाख पेक्षा कमी होते.
आणि त्या आधी F&O ट्रेड्स खुपच कमी होते.
त्यामुळे माझे टॅक्स ऑडीट कधी केले नाही.
वरच्या पोस्ट मध्ये जे २.५ लाख म्हटले आहे ते आपले सर्व इनकम धरुन (इतर बिझिनेस, पगार, वगैरे) आहे.
म्हणजे २०२१-२२ ला मलाही टॅक्स ऑडीट करावेच लागेल.
थोडक्यात तुम्हालाही ऑडीट करावे लागेल.

मी खरं तर वर्षभरा पूर्वी दुसर्‍या CA शी बोललो होतो याबाबत (इथे दुसृया धाग्यावर चर्चा सुरु होती या बाबत तेव्हा), तेव्हा त्याने १ करोडच्या वर टर्न ओव्हर नसेल तर गरज नाही सांगितले होते.
पण आता मी खोदुन खोदुन सगळे विचारले CA ला.
त्याने सांगितले त्याचे सार:
६% प्रॉफिट दाखवले नाही आणि आपले एकुण सगळे इनकम २.५ लाखच्या वर असेल टॅक्स ऑडिट करावे लागेल. जे तुमचा CA सांगतोय तेच.
आणि दोन वर्षांपुर्वी सरकारने हे एक नोटीस काढुन स्पष्ट केलेय असेही त्याने सांगीतले.

परत एकदा माफी मागतो.

मानवदा ,

माहिती च्या युगात अनेकदा असे होतेच . अन तुम्ही माहिती उपयोगी दिली..

अजुन एक अनुभवले की CA/ consultant महीती देताना - कमी देतात.

म्हणजे २०२१-२२ ला मलाही टॅक्स ऑडीट करावेच लागेल. ==>
माझ्या CA नुसार FnO पेक्षा equity short/long term trading करावी - For easy tax calculation.
मी मात्र करतच आहे.

Pages