कुशी

Submitted by _आदित्य_ on 11 May, 2021 - 14:48

ये झणी तू साजणी ही पापणी मिटते सये..
राखणीला नागिणीच्या चांदणी नसते बये !

अंगणी बघ रागिणी ही का कुणी गे छेडिली?
पैंजणी तव बांधणी का लावणीची चालली?

ओढणीला मागणी हा श्रावणी घन घालतो !
ही शिराणी मोरणीची तो मणी तिज माळतो!

देखणी तू हर क्षणी का दरपणी रेंगाळीशी?
ये झणी गे साजणी मज आठवणीची दे कुशी !

- आदित्य

Group content visibility: 
Use group defaults