दान..

Submitted by _आदित्य_ on 11 May, 2021 - 09:05

सख्या सावळ्या रे.. पुन्हा एकदा ये..
मन व्याकुळ तुजला बोलावते !

कानी पडावे तव वेणूचे सूर..
यावा भरुनी करुणेने उर !
करुणाकरा एवढे दान दे..
मन व्याकुळ तुजला बोलावते !

तुझे रूप पाहून होऊन दंग..
चित्ती भिनावा तुझा नीलरंग !
करुणाकरा एवढे दान दे..
मन व्याकुळ तुजला बोलावते !

गळूनी पडावे सारे हे मोहबंध..
असण्यास माझ्या यावा तव गंध !
करुणाकरा एवढे दान दे..
मन व्याकुळ तुजला बोलावते !

- आदित्य

Group content visibility: 
Use group defaults