घायाळ !

Submitted by _आदित्य_ on 8 May, 2021 - 02:22

घायाळ जाहल्या ग्रंथी
हे कैसे वादळ आले..
पेशींना कोरड पडता
देहांतच देह बुडाले !

हा साजणवेडा वारा
बघ येतो जातो आहे..
तो गवाक्षातूनी त्याला
निरखून पाहतो आहे !

अज्ञात तुझी स्मितहास्ये
रेंगाळत अवती भवती..
गात्रांत पसरता धुंदी
चैतन्य हिरावून घेती !

हे आधीच विझले प्राण
ओसाड जाहले डोळे..
तू आणू नको रे माझ्या
पोटातून असले गोळे !

- आदित्य

Group content visibility: 
Use group defaults

ड्यूड सध्या काय वाचताय??
हे असलं सुचायला!!?
या charoLyaa नाहीत!
रुबाया आल्या आहेत!
म्हणून विचारले काय वाचताय? ग्रेस की रॉय किणीकर??
की अजून काही??

"पेशींना कोरड पडता
देहांतच देह बुडाले !" --> "चंद्रातून चंद्र बुडाले" (ग्रेस ची concept)

पहिले दोन stanzas खूप आवडले!
पुलेशु

(फक्त एक की सम्पूर्ण Thought हा स्वत:चा येऊ देत! आपण कुणाच्या तरी वाचनाने प्रभावित होतो आणि त्याप्रमाणे आपल्याच nakaLat त्याच्या सारखे लिहित जातो_ अवांतर असेल तर क्षमस्व Happy )

नाही ओ सर.. असं particular काही
वाचत नाहीये.. कोरोना बद्दल लिहिलं
आहे मी हे..
पण तरी..
प्रयत्न करेन यापुढे लेखनात
आणखी 'माझेपण ' आणण्याचा..
धन्यवाद !