संध्याकाळ..

Submitted by _आदित्य_ on 8 May, 2021 - 01:17

सूर्याचे तेज गळाले, परी अजून विझला नाही !
हा पक्षी फांदीवरचा पण घरी परतला नाही..

पुरतासा दिवसही नाही, नाही पुरतीशी रात..
अस्थिर नी गोंधळलेली, ही वेळ उभी दारात !

झडती हिरव्या झाडांची, आताशा करडी पाने..
सौम्यपणे गुणगुणतो वारा, निश्चलतेचे गाणे !

सृष्टीतून रंग उडोनि, क्षितिजाशी गोळा झाले..
व्याकुळ सूरही सगळे, छेडीत मारवा आले !

- आदित्य

Group content visibility: 
Use group defaults