नाते..

Submitted by _आदित्य_ on 8 May, 2021 - 01:00

नाते म्हणजे दोन मनांची
गाठ पडून जाणे..
नाते म्हणजे पाय मोकळा
तरीही अडकून जाणे..

नाते म्हणजे एकत्र उरात
आठवणी सजवणे..
नाते म्हणजे एकमेकांना
एकमेकांत रुजवणे..

नाते म्हणजे कधी हसू
कधी डोळा पाणी..
नाते म्हणजे कधी कविता
कधी गळा गाणी..

नाते म्हणजे जगताना
दोघांना जगणे कळणे..
नाते म्हणजे एकत्र सुखाने
शेवटचा श्वास घेणे..

- आदित्य

Group content visibility: 
Use group defaults