आणि काय हवे?

Submitted by _आदित्य_ on 8 May, 2021 - 00:56

चार माणसे, चार भिंती..
सुख, समाधान, शांती!
आणि काय हवे?

अंगात सदरा, ताटात पोळी..
सारे अगदी वेळच्या वेळी!
आणि काय हवे?

कारुण्याची शीतल छाया..
प्रेम, जिव्हाळा, माया!
आणि काय हवे?

दुःख नाही, चिंता नाही..
भावनांचा गुंता नाही!
आणि काय हवे?

Group content visibility: 
Use group defaults