चांदणी..

Submitted by _आदित्य_ on 8 May, 2021 - 00:49

आमुचे अलगूज माझ्या लेखणीत कोठून येते?
ती अशी होऊन अश्रू पापणीत कोठून येते?

उमलल्या नाहीत अजुनी अंतरी कोठे कळ्या..
अमृताचे फुल माझ्या ओंजळीत कोठून येते?

उत्तरे अजून अवघी शोधतो माझ्या उरी...
ती प्रश्न सारे जीवनाचे सोडवीत कोठून येते?

मी भिकारी मागतानाही तिचे कण मागतो..
ती अशी शृंगारुनी मग झोपडीत कोठून येते?

सावळे घन दाटले पण देह अजुनी कोरडा..
चांदणी अश्रूंत मजला भिजवीत कोठून येते?

- आदित्य

Group content visibility: 
Use group defaults

अयो....
छान झालीय...
तुम्ही एकदम सपाटाच लावलाय कविता आणि गझलांचा Proud
सर्व काही एकदम देऊ नये कुणालाही!
Wink

धन्यवाद !
जुन्या होत्या लिहिलेल्या त्या
कविता upload केल्या.. म्हणून...