घाम..

Submitted by _आदित्य_ on 7 May, 2021 - 01:32

हे विसावलेले डोळे,
अतृप्त सुखांच्या गावा..
या स्तब्ध घनांच्या मागे,
बहुदा वैकुंठ असावा !

शब्दांनी विझले अश्रू
सुखदुःखांच्या समईचे..
वातीला आता स्मरते,
ते गीत तुझ्या सनईचे !

ही अनाथ इथली झाडे,
निर्मनुष्य आहे वस्ती..
मी समाधीन होताही,
प्राणांना येते सुस्ती !

तो शब्द तुझा रे आता,
ह्या घामातच विरघळला..
हनुमंतही नसेल इतका
रामासाठी तळमळला !

- आदित्य

Group content visibility: 
Use group defaults

छान....!