उर्मी.. ( feminine energy )

Submitted by _आदित्य_ on 7 May, 2021 - 01:20

तूला स्पर्शताना शहारून अवघे
क्षणार्धात अव्यक्तही व्यक्त होते..
तिथे वाजते बासरी श्रीहरीची
इथे राधिका मोकळा श्वास घेते !

स्तोत्रांत साऱ्या तुझी वर्णने अन
श्वासांवरीही तुझे नाम आहे..
सीता वनी एकली गीत गाते
गीतात त्याही प्रभू श्रीराम आहे !

उर्मी तुझी अस्मिता अमृताची
हे विश्व अस्तित्व हे तव आहे..
मी प्रार्थना अर्पितो पार्वतीला
शिव ही जिचियाविना शव आहे !

- आदित्य

Group content visibility: 
Use group defaults