आठवण..

Submitted by _आदित्य_ on 7 May, 2021 - 01:07

हाती क्षणांची पडली फुले..
तु येताच सारी दडली फुले !

फुलासारखे रूप दिसता तुझे..
मग मोहून तुजला जडली फुले!

वेलापरी तु बहरलीस जेव्हा..
तेव्हा नव्याने घडली फुले !

तुजला वसंत सोडून गेला..
आणि बिचारी झडली फुले !

विसरलीस तु फुलांना आताशा..
तुझ्या आठवणीत रडली फुले !

- आदित्य

Group content visibility: 
Use group defaults