जीवनाचा सोहळा

Submitted by omkar_keskar on 5 May, 2021 - 01:01

कुठूनतरी अलगद असा येतो एक क्षण
जुन्या आठवांनी एकदम भरून येतं मन
कधी फुलते हास्य, कधी ओली डोळ्याची कड
मनच म्हणतं अश्रूला मग ‘तुही आता बाहेर पड!’

ऐहिकाच्या पसाऱ्यात मन बाकी छान रमतं,
मनाला बहुतेक हातोटीने हेच सारं जमतं.
बाहेरून पाहिले तर आरसाही शांत आहे,
शेवटी कुठेतरी चेंगराचेंगरी त्याच्याही आत आहे.

सुखदु:खाचे आता दोलायमान झाले,
हास्य- अश्रू आपापल्या जागी समान झाले.
गुंतूनही एकमेकांत प्रत्येकाचा मार्ग मोकळा,
असाच शेवटी फुलत जातो जीवनाचा सोहळा

Group content visibility: 
Use group defaults