काॅलेजातले "भाईलोक"

Submitted by हर्षद साबळे on 4 May, 2021 - 01:03

काॅलेजातले "भाईलोक

सध्या कॉलेजातल्या टाबरात "भाई" बनण्याची क्रेझ भारी
सदर्‍याच्या दोन गुंड्या काढल्या की वाढते ह्यांची दादागिरी

पान- माव्यानं थोबाड लाल करून करत्येत एकामेरीस हाय- बाय
आरं, शेंबड्यांनो तुमचं वय तरी काय?

म्हणे बुड टेकवायला लागते ह्यांना "फरारी"
"दादा" म्हणताच लगेचच घेई भरारी

तिकडं, बाप मेला दुसऱ्याच्या वावरात राब राब राबुन
अन् ह्यांच्या फरारीत मात्र इंधन दाबून

दप्तरात तर कधीच नसतं, वह्या-पुस्तकांना स्थान नटण्या-थाटण्याच्या वस्तूंनाच भारी मान

परत, तोंड वर करून म्हणतात, "आमचा पॅटर्नच लय येगळा"
आरं, ज्ञानाच्या लाभार्थ्यांनो, निदान विद्येकडं बघा तरी एक वेळा

वर्गातले बाकडे नाय, तर चौकच झालेत नावावं
परीक्षा जवळ आली की मग, "देवा आता तरी पाव!"

पण ध्यानात घ्या,
सिनेमातले "भाई" थेटरामध्येच फक्त शोभतात
चुकून जरी आले खाकी च्या समोर तर, कुत्र्यागत झोडतात

सुधरा पोट्याहो ,सुधरा
आता तरी स्वतःला आवरा
द्या सोडून हा भाईटमगिरी चा धंदा
आई बापाचं नाव मोठ्ठं करीन, अशी प्रतिज्ञाच करा यंदा.....

-हर्षद साबळे
(8237688413)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users