पुरूष

Submitted by Rudraa on 2 May, 2021 - 23:59

निश्चल असा उभा तो ,
घेऊन ओझे कर्तव्याचे.....
कडाक्याच्या उन्हात ,
सुर्य जसा तटस्थ उभा असे.....

नाजूक कोवळ्या पानास ,
संरक्षण बाभूळ काट्याचे ......
आईबापाची होऊन काठी,
लेकराच्या पाठी उभे पौरुष्य त्याचे.....

तापलेल्या मातीवर,
टपोरा थेंब बरसे......
मायेच्या उबेतुन ,
सुगंध होऊन बाप दिसे .....

आकाशाच्या निळाईपरी,
अथांग मैत्री त्याची......
कधी तो गारठी प्रेमाची कूस,
तर कधी लखलखणारा विजेचा प्रकाश.....

बऱ्याचदा अस्पष्ट तो,
पण आशयघन वागणे त्याचे.....
टपोऱ्या पाऊस थेंबात,
घरटाहीन कावळा फडफडे.....

रुद्रा....

Group content visibility: 
Public - accessible to all site users