द डिसायपल : एका शिष्यत्वाची शोकांतिका

Submitted by अमा on 2 May, 2021 - 10:25

गुरु-शिष्य परंपरा हा उत्तर भारतीय, अर्थात हिंदुस्थानी, शास्त्रीय संगीत शिक्षणाचा आत्मा आहे. रागदारी संगीत - ख्याल गायकी - ही अनेक घराण्यांनी आपापल्या खास परंपरांनुसार , सादर केलेली आहे व करत आहेत. संगीता चे प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यावर जेव्हा पुढील अवघड वाट शोधायची वेळ येते तेव्हा गायक कलाकार आपला गुरू शोधतात व त्या गुरुंचे जे घराणे त्यामध्येच आपली पुढील विद्या प्राप्त करून पारंगत होतात. आपल्या गुरुंचा गंडा बांधला की शिष्याची अवघड वाटचाल सुरू होते त्यात त्याला जोड असते स्वतःच्या सृजन शीलतेची आणि अंगभूत गुणांची. बाकी हा प्रवास एकट्याने करण्याचा आणि खडतर असाच असतो. अनेक वर्षे मेहनत व रियाज करून घराण्याचे राग गळ्यात उतरवून छोटे मोठे कार्यक्रम करून मग कुठे कधी प्रसिद्धीची माळ गळ्यात पडते आणि आर्थिक स्थैर्य येते.

सध्याच्या प्रत्येक गो ष्ट लगेच मिळवण्याच्या इन्संट युगात अनेक तासांचा रियाज, कलेला जीवन वाहून घेणे , आपली निष्ठा अर्पण करणे हे हास्यास्पदच ठरेल. व तसा अट्टहास करणार्‍या कलाकारांची ओढाताण होते. त्यात निसर्गाने जर मधुर आवाजाची आणि उपजत क्रिएटिव्हिटी चे थोडेसेच माप पदरात घातले असेल तर त्या कलाकारा चे कला जीवन वैफल्याने व एका विचित्र दु:खाने भरून जाते. सांगितिक क्षेत्रात नाव
कमावणार्‍या एका विद्यार्थ्याची शोकांतिका द डिसायपल ह्या चित्रपटात संयत पणे दाखवली आहे.

शरद नेरुल कर चा जीवन प्रवास त्यांचे गुरू जींशी असलेले संबंध त्याची अनेक आघाड्यांवरची वैफल्ये व हार ही आपल्या ला चित्रप टात दिसते. दिग्दर्शकाची दृष्य व शाब्दिक भाषा अतिशय नेमकी व नैसर्गिक आहे. सि नेमा बघतो असे वाटत नाही. किंवा संत्रे सोलणे हा प्रकार फारसा नाही त्याच्या भावना घटनांमधून संवादातून दिसत राहतात. वडिलांचे अनुकरण म्हणून किंवा त्यांच्याशी असलेले कनेक्षन टिकून राहावे म्हणून तो शास्त्रीय संगीत शिकायला लागतो व अलवार घराण्याच्या गुरुंचे शिष्यत्व पत्करतो. हे वयस्कर व हळू हळू आपल्या गायकी आवाजाला हरवत चाललेले आहेत. पण अ‍ॅनालिसिस ची क्षमता उत्तम आहे व अजूनही टिकून आहे. उपेक्षित किंवा फारसे यशस्वी होउ न शकलेल्या गायकाचा जीवन प्रवास गुरुजींच्या मैफिलींतून ;तक्रारींतून दिसतो. आर्थिक दैन्य व म्हातारपणात सेवा करायला कोणी नसणे हे त्यांच्या जीवनाचे विदारक सत्य. शरद त्यांच्या कडे शिकतो, त्यांच्या तब्येतीक डे लक्ष देतो व जमेल तसे त्यांना साहाय्य करतो. त्यांच्यात एक बंध आहे. पण गुरुजी त्याला त्याच्या मर्यादा स्पष्टपणे सांगू शकत नाहीत . एक प्रकारे वडील व गुरू ह्यांच्या मधल्या जागेत शरद चाचप डत राहतो.

कलाकारांना व्यावसायिक यशासाठी तडजोडी कराव्या लागतातच. संगीत शो करणार्‍या मुलीच्या पात्राद्वारे ते अधोरेखित होते.
चित्रपटाच्या अखेरीस शरद देखील आपल्या मर्यादा समजून घेउन पुढे जातो. त्याच्या बरोबरच्या विद्या र्थ्यांना जास्त प्रतिष्ठा मिळते. शेवटीच्या शॉट मध्ये एक लोक गीत कलाकार ज्याला काहीच प्रशिक्षण नाही पण अंगभूत सृजनशीलता आहे. तो येतो त्यामुळे एक प्रकारची आशा जाग ते की संगीत- स्वर हे खरंतर घराण्यांच्या मर्यादांच्या फार पुढे आहे व ते युनिवर्स फार मोठे आहे.

चित्रपटात अधून मधून येणारी माईंची स्वग ते कलेच्या जगतातील प्रत्येकाने अगदी ऐ कावी व लिहून घ्यावीत अशीच अनमोल आहेत. तो आवाज बहुतेक कै. सुमित्रा भावे ह्यांचा आहे. पण आम्हाला तो आमच्या आजीचाच वाटला. कापरा थरथरता पण सच्चा. हे ऐकताना तो बाईक वरून भटकत राहतो. २४ वर्शांचा तरूण गायक ते चाळीशी पंचे चाळीशीचा प्रौढ जीवनाशी तडजोड करून स्थिर झालेला गृहस्थ हा त्या व्यक्तिरेखेचा प्रवास कला काराने नेमस्त पणे सादर केला आहे. असे लोक सहजी कोणत्याही गटात सामी ल होउ शकत नाहीत. आपले तारुण्य
गमवत असताना - काका लुक आल्या वर- तो एका पार्क मध्ये अचानक क्रिकेट खेळायला एक तरी बॉल मला टाक म्हणून परक्या मुलाला विनंती करतो ते केविल वाणे वाट्ते.

चित्रपटाची इतर अंगे जसे दिग्दर्शन, चित्रलेखन संगीत उत्तम आहेत. शास्त्रीय संगीत आहे पण ते कथा सोडून अंगावर येत नाही. एक ही
पर्फॉर्मन्स किंवा आयटेम नंबर नाही. महत्वाच्या व्यक्तिरेखांना गाण्याची क्राफ्ट येते पण कुठे तरी ते क्रिएटिव्हिटीत / आवाजाच्या क्वालिटीत कमी आहेत किंवा मिडिऑकर - सामान्य आहेत हे लगेच कळून येते.

दिग्दर्शक ताम्हाणे ह्यांना रोमा, ग्रॅविटी चित्रपटांचे दिग्दर्शक अल्फोन्सो कोरोन ह्यांनी मार्गदर्शन केले आहे. ( मेंटर शिप) संपूर्ण चित्रप टाची ट्रीटमेंट
अगदी अनाव्॑श्यक नाट्य वगळून केलेली आहे. हिरोचे वडिलांबरोबरचे फ्लॅश बॅक मधील रंग पीच पिं क गुलाबी व वर्तमानातले रंग निळे हिरवे आहे. सरोद वादनाच्या कार्यक्रमाचे लोकेशन लै भारी आहे. ती जागा कुठे आहे?

जरूर बघण्या सारखा चित्रपट . कोर्ट पेक्षा जास्त सफाईदार आहे .

===================================================================

मी ज्या घरात वाढले त्यात माझे दत्तक वडील संगीताचे रिटायर्ड प्रोफेसर व आमचे पूर्वी व रिटायर में ट नंतरही संगीत विद्यालय होते.
त्यामुळे गायन क्षेत्रातील कलाकारांचे संघर्ष घालमेल/ उलघाल परीक्षा, स्पर्धा मधील घडामोडी सर्व जवळून पाहिले आहे आई वडील वयस्कर झाल्यावर त्यांची सेवाही शरद करतो त्याच पद्धतीने केलेली आहे त्यामुळे मला एक वैयक्तिक कनेक्ट पण जाणवला पण तो वेगळा कालखंड होता ते लोक वेगळे होते.... ते सूर तेच होते. जा जारे अपने मंदिर वा व संगीत क्लासातली चीज ह्या दोन मैत्रिणी परत भेटल्या हा एक वैयक्तिक आनंद.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख.
वडिलांचे अनुकरण म्हणून किंवा त्यांच्याशी असलेले कनेक्षन टिकून राहावे म्हणून तो शास्त्रीय संगीत शिकायला लागतो >>हो. त्याला स्वत:ला ते किती आवडते ते दिसलेच नाही चित्रपटात. सक्तीचा रियाज करतो असे वाटते.

चित्रपटात अधून मधून येणारी माईंची स्वग ते कलेच्या जगतातील प्रत्येकाने अगदी ऐ कावी व लिहून घ्यावीत अशीच अनमोल आहेत.>>+१ पण त्यांनी एकदाही आपल्या गाण्याचे, शिकवणी रेकॅार्डींग करू दिले नाही ते खटकते. कलेत कितीही पारंगत व्हा पण जे आपल्याकडे आहे ते जतन केले नाही, वाटले नाही, इतरांपर्यंत पोचू दिले नाही तर ते तिथेच संपून जाणार. जे काही रेकॅार्डींग त्याच्याकडे असते तेही तो लपवतो पण नंतर ते दान करून टाकतो.

पूर्वी एक समांतर चित्रपटांची लाट होती. ते तसे का बनवायचे हे मला कधी समजलं नाही. सगळ्या चित्रपटभर अत्यंत भकास खिन्नता भरून ठेवायचे - अतिशय कंटाळवाणे रंग, तुटक तुटक संवाद ! त्या चित्रपटांपेक्षा खूप दु:खद विषय खूप चांगल्या पद्धतीने मांडता येऊ शकतात हे आनंद बघून समजले होते. पण तरीही ते चित्रपट बनायचे - पण तेंव्हा त्यात कसदार अभिनय, कधी अप्रतिम संगीत असं काही तरी असायचंच. मग ते थोडे सुसह्य व्हायचे.

हा चित्रपट तसाच काहीसा आहे. पण दिग्दर्शक आपल्याला नक्की काय सांगायचय हेच ठरवू शकला नाहीये. माईंच्या आदरर्शावर चालणारा शरद शेवटी गाणे सोडतो (मैफिल अर्धी सोडण्याचा अर्थ तसाच घेतला मी) सोडतो गाणं तर सोड, पण ते का सोडतो ते तरी येऊदे सिनेमात. ते तसं काहीच नाहीये. प्रत्येक वेळी भरभक्कम कारण असतंच असं नाही. पण मग ते अलवार कारण उमलवून प्रेक्षकांपर्यंत पोहचवणे यातच खरा दिग्दर्शक दिसतो. या सिनेमात तसं काहीच होत नाही.

प्रौढ शरद पैसाही मिळवू लागलाय. पण तरी गुरुंशी इतकी बांधीलकी का? ते कधीच समजलं नाही. गुरुंकडून त्याला काही शिकायला मिळालं असतं तर समजू शकलो असतो पण गुरू त्याला कधीच मार्गदर्शन करताना दाखवले नाहीत. त्याच्या आवाजाची लिमिटेशन्स ओळखून संगीत दिग्दर्शन, एखादे वाद्य असे काही त्याला सुचवता आले असते आणि ती माईशी प्रतारणा पण झाली नसती. बरं ते जाऊ दे, सिनेमात असा एकही प्रसंग नाही की त्याने शरद आणि गुरु यांच्यातले बंध का आहेत ते अधोरेखीत व्हावे. मग तो एवढा का बांधील आहे त्यांच्याशी?

विजू या पात्राला नक्की कसला त्रास आहे हे पण सांगायचे नसेल तर ते पात्र सिनेमात का घ्यावे?

दोन प्रसंग तर प्रचंड गोंधळात टाकणारे आहेत - बँड मध्ये जाणार्‍या विद्यार्थ्याला रोकणे! यात दुष्टपणा आहे का संगीताशी बांधीलकी? शरद जराही दुष्ट वाटत नाही, आणि संगीताशी बांधीलकी ठेऊन काही होत नसते हे त्याला कळले असते (म्हणूनच तो माईंच्या अदर्शांविरुद्ध जाऊन छोटे मोठे जॉब करतोय ना?)

दुसरा प्रसंग म्हणजे गच्चीवरचे पेयपान! नक्की काय सांगायचय त्यातून? खरं तर त्या प्रसंगाचा वापर करून शरदचं बदलणं समजावता आलं असतं पण तिथेच दिग्दर्शक खूप गोंधळलेला वाटतो. नक्की काय स्टँड घेऊ? संगीताशी निष्ठा दाखवू का अशी निष्ठा खोटी असते असं दाखवू?

संगीत, अभिनय यातही काही ठळकपणा जाणवला नाही. संगीत थोडे कमजोर असणे समजू शकते - गुरूंचे वय झालय आणि शरदच्या आवाजात ती बात नाहीये. पण म्हणून सर्व चित्रपटभर भरभरून असंच संगीत ऐकवत राहणे हे अत्याचार होतं.

अजिबात नाहि आवडला. एका सशक्त कथाबीजाची वाट लावली आहे. वर माधव यांनी लिहिल्या प्रमाणे तुकडे-तुकडे, कशाचा कशाशी संबंध नाहि, काहि सिन्स उगाच घुसडल्या सारखे. ठिगळं जोडल्या सारखी स्क्रीनप्लेची बांधणी...

डोंट वेस्ट योर टाइम...

माधव बँग ऑन!
राज सहमत
मलाही अजिबात आवडला नाही
उगाच कलात्मक वगैरे म्हणत रटाळपणाच वाटला
संगीत कुठलच भावलं नाही
त्या माईंचं सांगणं अन स्वर काही काळाने डोक्यात जाणारं आहे
सॉरी पण अजिबातच आवडला नाही हा चित्रपट

अमा, स्पॉयलर न देता मस्त विवेचन.
मी जरा गोंधळले आहे या चित्रपटाबाबत.
स्वतःची फेल्युअर्स, स्वतःचा स्वर गवसायला 25-40 इतकी वर्षे जात असतील तर कुठेतरी चुकते आहे.,(गुगल इंडिक मूर्खपणा करते आहे.टाईप करताना शब्द बरोबर येतात नंतर त्यांचे पाय फ्रॅक्चर होतात.)
मी परत एकदा नीट बघायचा प्रयत्न केला.मला मूळ आशय पटला.
शेवटही पटला.

छान परिचय अमा..
कोर्ट वाल्याचा चित्रपट म्हणून पास... कोर्ट भयानक बोर झालो होतो...

मी जरा गोंधळले आहे या चित्रपटाबाबत. >>>> +१. एकंदरीत चित्रपट मला आवडला आहे का नाही हे ठरवता येत नाहीये. काही गोष्टी आवडल्या आणि काही गोष्टी नाही आवडल्या.

सुमित्रा भाव्यांच्या आवाजतली "माईंची" भाषणं ऐकत बाईक वरून फिरणार्‍या नायकाचे सगळे प्रसंग फार सुंदर झालेत. त्या भाषणातले टोकदार शब्द आणि सुमित्रा भाव्यांची बोलायची शैली दोन्ही एकदम भारी आहेत ! एकदम अंगावर येतात ती.

चित्रपटात एकंदरीत काय म्हणायचं आहे ते पटलं / आवडलं पण ते सांगायचा हा सगळ्यात उत्तम मार्ग आहे असं वाटलं नाही.

वर माधव ह्यांच्या पोस्टमधले काही मुद्दे पटले.

वीकेण्डला पाहिला. मला आवडला. हा लेख व इतर अनेक परीक्षणे वाचल्यानंतर पाहिला, त्यामुळे संदर्भ माहीत होते. सर्वसामान्यांपेक्षा सरस असलेल्या पण शिखरावर जाण्याइतकी प्रतिभा नसलेल्या व्यक्तीची ही कहाणी आहे - वगैरे काहीच माहिती न काढता बघितला असता तर कदाचित समजला नसता.

मला काहीच माहिती नसताना बघितला. मला आवडला. तो शरद बाईकवर जातानाचं स्लो मोशन आणि बॅकग्राउंडला तानपुरा सुन्न करणारा आहे. एकीकडे माईंची आदर्शवादी शिकवण आणि दुसरीकडे जगात झपाट्याने पसरत जाणारा उपयुक्ततावाद (मी भोगवाद म्हणणार नाही, कारण तो निगेटिव्ह वाटेल) यातली शरदची द्विधा मनःस्थिती खूप चांगली दाखवली आहे. आदर्शवादी जगण्याचा प्रयत्न करूनही यश हातात न मिळाल्याने आदर्शांवरच प्रश्न उभे राहतात, किंवा माणूस स्वतःच्या क्षमतेला बोल लावत बसतो. परंतु उपयुक्ततावाद तर पूर्णपणे पटत नाही. अश्यावेळी तो नैराश्यातून स्वतःचं बरंवाईट करून घेईल की मध्यम मार्ग स्वीकारेल? - ते शेवटी कळेल.

शरदचं काम करणार्‍या नटाचा आणि आणखी काही जणांचाही अभिनय मला खूपच कमी दर्जाचा वाटला. परंतु दिग्दर्शकाने खुबीने त्यांचे वीक पॉइंट्स लपवले आहेत हे जाणवलं. शिवाय तांत्रिक अचूकता, कथानक आणि संगीत हे सुमार अभिनयावर मात करून चित्रपटाची उंची वाढवण्यात यशस्वी झाले आहेत.

विशेष आवडलेल्या गोष्टी
- शास्त्रीय संगीत म्हणून केवळ द्रुत गतीत ताना फेकणारे गायक/गायिका न दाखवता अगदी थोडा का होईना, राग विस्तार, विलंबित लय, मध्यम लय - ह्यांचा वापर केला आहे. पारंपरिक बंदिश, अपारंपरिक बंदिश वगैरे असतात, मोठे घराण्यातले लोक बंदिशी लग्नात जावयाला हुंडा म्हणून द्यायचे - असल्या बारकाव्यांची जाण दिग्दर्शकाला आहे आणि त्यांचा उल्लेख योग्य त्या ठिकाणी येतो.
- गायनाच्या क्लासमध्ये कोपर्‍यात सरस्वती, दुसर्‍या बाजूला रॅकमध्ये तीन पेट्या, दारापाशी चपलांचा ढीग पडलेला, सरांना फोन आल्यावर समोर शिष्यांनी आधी चालू असलेली बंदिश पूर्ण करणे वगैरे गोष्टी एकदम खास! जर आपल्यापैकी कुणी अश्या क्लासमध्ये शिकले असेल तर एकदम रिलेट होईल.
- शरदच्या गुरुजींनी वार्ध्यक्यात केलेल्या मैफिलीत लावलेला आवाज अभिनयाच्या दृष्टीने जबरदस्त आहे! त्या वयात आवाज असाच अस्थिर होतो, स्वरावर ठेहराव राहत नाही. त्या अभिनयाबद्दल नक्कीच दाद द्यायला हवी.
- १०-१५ वर्षांची गॅप दाखवून प्रौढत्व दाखवताना शरदला केवळ मेकप केला नसून शारिरिक बदलही केले आहेत. त्यामुळे नुसती मिशी, चष्मा, शहाण्यासारखे कपडे घातलेत म्हणून प्रौढ समजावा असं अ‍ॅझम्शन करायची वेळ प्रेक्षकांवर येत नाही. (इथे तर चष्माही नाही)

"शरदचं काम करणार्‍या नटाचा आणि आणखी काही जणांचाही अभिनय मला खूपच कमी दर्जाचा वाटला."--> हरचंद जी तो professionally नट नाहीये! तो आदित्य मोडक हा एक शास्त्रीय गायक आहे. आणि मला चैतन्य ताम्हाणेचं हेच आवडतं की तो real elements ना घेतो बरोबर!

जसे की,
कोर्ट मध्ये मुख्य नायक दाखविले गेलेले वीरा साथीदार, हे स्वत: आंबेडकरवादी chLAvaLitil कार्यकर्ता होते.
गावोगावी त्यांचे जलसे हे होतच होते!
दुर्दैवाने काही दिवसांपूर्वी अमरावती येथे त्यांचे निधन झाले....
पण हेच की Commercial किंवा Acting च्या field मध्ये profession नसलेल्या लोकांना घेऊन Professional काहीतरी करून Awards खेचून आणायचे!! हे नक्कीच अचंबित करणारे आहे.

त.टी. - मी डिसाइपल पाहिलाय पण वरचा लेख नाही वाचलाय अजून... आणि शरद(आदित्य) चे गुरु दाखवले गेलेले डॉक्टर द्रविड हे जयपुर घराण्याचे pro गायक आहेत.

शरद मध्ये प्रौढ दिसायचे बदल अगदी व्यवस्थित केले आहेत.तेही एका विशिष्ठ मानसिक अवस्थेतील, स्वतः मनातून हरत चाललेला माणूस कसा थोडा शरीराचे, चेहऱ्याचे नुकसान होत जाऊन प्रौढ होईल तेही.
सिनेमाची पार्श्वभूमी मुंबई आहे, पण मला मनात ही कथा अगदी पुण्यात कोणतातरी नवी पेठ, केसरी वाडा जवळचा बोळ अशी वाटली.(मुंबईलाही रिलेटेबल असेल म्हणा)

हरचंद पालव - धन्यवाद. ते बारकावे मला समजले नाहीत. शास्त्रीय संगीतातले तितकेही कळत नाही, त्यामुळे जेव्हा शरद गातो ते इतरांपेक्षा नक्की कसे कमी पडते हे स्वतःला समजले नाही तरी ते तसे असावे असे समजून ते पाहिले Happy बैठकीत प्रमुख गायक इतर गायकांकडे किंवा वादकांकडे बघून इशारे करतात - आता तुम्ही इथून गा टाइप - ते आवडले. एकूणच मैफिलींचे सादरीकरण अगदी अस्सल वाटले. अशा प्रकारच्या कार्यक्रमांना जमणारे प्रेक्षक, तेथील एकूण वातावरण, व्यवस्थापन वगैरे अनेकदा बघितलेले आहे.

तो आदित्य मोडक हा एक शास्त्रीय गायक आहे >> हो ते तर अगदीच जाणवतं. गच्चीवर तो इलेक्ट्रॉनिक तानपुरा घेऊन एकेका स्वरावर आवाज लावतो तिथे त्याचे आवाज योग्य श्रुतीला 'ट्यून' करायचे तंत्र पाहिले तर नक्कीच त्याच्या गाण्याची तयारी लक्षात येईल. कदाचित चैतन्यला तेवढी तयारी असलेला आणि शिवाय अभिनय येणारा माणूस मिळाला नसावा. गायन भारी असलं तरी चित्रपटासाठी अभिनय चांगला हवा हे मा वै म. चैतन्यचं कौतुक आहेच, पण अ‍ॅवॉर्ड्स देणार्‍यांनी खराब अभिनयाने फारसे विचलित न होता ओव्हरऑल इफेक्टला महत्त्व दिले हे त्यांचं मोठेपणही आपण मान्य करूया.

मोबाइल वर फक्त जुने पुराणे धागे वाचनासाठी म्हणून संयोजक हे account वापरत होतो पण भारावून जाऊन तिथुनच प्रतिक्रिया दिली गेली चहा पिता पिता.
मनापासून दिलगीर व्यक्त करतो! आणि माझा प्रतिसाद हा वैयक्तिक account वरून पुन्हा पाठवतो!

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

"चैतन्यचं कौतुक आहेच, पण अ‍ॅवॉर्ड्स देणार्‍यांनी खराब अभिनयाने फारसे विचलित न होता ओव्हरऑल इफेक्टला महत्त्व दिले हे त्यांचं मोठेपणही आपण मान्य करूया." --> बर करुया मान्य ☺️☺️.

तसही एक मनापासून सांगतो,
Award मिळायच्या आधी कुणाला माहिती तरी होतं का? की "देि डिसाईपल" नावाचा एक सिनेमा आहे म्हणून!
नाहीच... आपल्या इथे तर प्रदर्शित सुद्धा झालेला नाहीये.
कारण, editing!! त्याला जसे आहे तसे दाखवायचे होते!
२००५ ते २०१८-२०१९ पर्यंत चा काळ सुरेखपणे मांडलेला आहे!

चैतन्य चे विशेष कौतुक की त्यात दोन वेळा हस्तमैथुन करतानाचे scenes आहेत! पण कुठेही बीभत्स वाटत नाही!!

हरचंद जी तुम्हाला शास्त्रीय गायन आवडत असेल तर एक लिंक देतो as a gift ☺️.
https://www.youtube.com/watch?v=Gk85EZqN38I -> Aaditya Modak
ची मैफल. मी देखील आत्ताच पाहतोय.

पहिला ठीक ठाक वाटलं आणि मराठी चित्रपटाला इंग्रजी नाव का हा अनेकदा पडलेला प्रश्न पुन्हा पडला
दिसायपल हा काय अगदी रुळलेला शब्द नाही
जर साजेसे मराठी नाव घेऊन आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसाठी कंसात हे इंग्रजी नाव देऊन चालले नसते काय?
शिष्य किंवा शिष्यत्व म्हणलं तर अगदी डाऊनमार्केट आणि दिसायपल म्हणलं की प्रगल्भ उच्चभ्रू वर्ग असलं काही आहे काय

किमान इंग्लिश नाव बघून घाईत बघायला क्लिक केलेले आणि नंतर चित्रपट आवडलेले नॉन मराठी प्रेक्षक हा बोनस ठरेल म्हणून असावं.
सध्या इतक्या मराठी, साऊथ च्या पिक्चर्स ची नावं हिंदी आणि एंग्लिश वाटणारी आहेत की भाषा फिल्टर मारताना गोंधळ होतो. शिवाय प्राईम मध्ये मराठी चा फिल्टर मारल्यावर २-३ इंग्लिश पिक्चर पण येतात ते वेगळेच.

काल बघितला. काही गोष्टी आवडल्या काही खटकल्या, ओव्हरऑल ठीक वाटला.
१. संगीतक्षेत्रातील चित्रपट म्हणजे जे काही डोळ्यापुढे येतं तसं वास्तव फारच थोड्यांचं असतं, बाकी ९९ टक्के वास्तवावर चित्रपट काढावा वाटला आणि त्या विषयाशी शेवट पर्यंत प्रामाणिक रहावंसं वाटलं हे सगळ्यात जास्त आवडलं. सगळे प्रसंग, संवाद एकदम फोकस्ड आहेत. वर फा म्हणालाय तशी व्हिज्युअल्स का आहेत ते समजतं, आणि अंडरटोन सेट करत रहातं.
२. डिटेलिंग तर अफाट आवडलं.
जसं बंदिस्त सभागृहात गुरुपौर्णिमा टाईप कार्यक्रम चालू असताना रंगमंचावरचा पंखा बंद आणि बाकीचे उकाड्यामुळे चालू हे अगदी टिपिकल असतं. कारण वर पंखा चालू असला तर लावलेले तबले उतरतात.
किंवा 'एरि आली पिया बिन' शिकताना त्या तबले पेट्या रचलेले, मास्तर खुर्चीवर बाकी सगळे खाली, आणि कुणालाही गाण्यातल्या/ स्वरातल्या कुठल्याही भावाचा जराही स्पर्ष न होता पेटीच्या खटक्या बरहुकुम शवविच्छेदन केल्यासारखे सुरात सुर मिसळुन गायलेला यमन. त्यात आणखी आठ मात्रांचा अवरोही (ठोंब्या) आलाप आला असता तर स्वर्गच दिसला असता. मी मनातल्या मनात नि ध प S | सां नि ध S | येरी आली S म्हणून बघितलं.
एका कार्यक्रमात हा समेवर आल्यावर तबलजीने सोलो वाजवणे... ज्या सोलोचा ह्याच्या गाण्याशी जराही संबंध नाही की उत्स्फूर्ततेची पुसटशी किनारही नाही. फक्त तयारी केली आहे तसे वाजवणे आणि श्रोत्यांची अशा तबला सोलो नंतर येणारी हुकमी टाळ्यांची दाद. इतकं परफेक्ट आलंय ते. त्यात गायकाने तबलजीकडे बघुन हसणे... अशक्य टिपिकल आहे हे .. हेच सगळ्या कार्यक्रमांत होते.
शेवटी एका कार्यक्रमांतुन तो उठून जातो तेव्हाचं त्याचं गाणं ही फार सुंदर घेतलं आहे. त्याच्यात शिकल्याने येणारी हुकुमत, घोटलेला रियाझ, स्वरांवर असलेली पकड उत्तम आहे... तो हे सगळं तुटक तुटक मस्त गातो. पण माई / त्याचे गुरुजी जो खयाल... विचार सांगत आहेत तो अजिबात नाही आहे. मन भरकटलेलं आहे, काय नक्की सादर करायचं आहे हे जमत नाही आहे. हे दाखवणं फारच तरल आहे. सोपं नसावं ते.
त्याक्षणी तो माईंशी जोडला गेला का काय?
स्टेजवर टाळ्यांसाठी तेच तेच गाणं, त्यावर आपल्याला कळतं अविर्भावात अरे पूर्वी कसं गायचे आणि हल्ली कसं होतंय हे... टाईप होणार्‍या चर्चा.
गुरूकडे पर्फोर्मंस करू का म्हणून शिष्याने विचारत येणे, आणि गुरू ने कर ना हे पॅसिव्ह अग्रेसिव्हपणे सांगणे याला तर तोड नाही. हेच आणि हेच बघितलेलं / कर्णोपकर्णी ऐकलेलं आहे.
तेच पोटात रम गेली की बुवा काय गातात... टाईप गॉसिप्स.
कलेक्टर कडे असलेले रॉ किस्से, आणि डिसायपलची झापडबंद उत्सुक्ता आणि मग प्रतिक्रिया .. अगेन सो टिपिकल!
या अशाच वातावरणात लहानपण घालवलं असल्याने खूपच रिलेट झाला.
३. या वातावरणात निर्माण होणारे आकर्षण, केलेला निचरा.. हे ही अगदी सहज दाखवलं आहे.
४. त्याचे बाईक वरुन रात्रीच्या वेळी मुंबईत फिरणे. हा भाग तर अंगावर येतो. स्लो मोशन मधली बाईक, संथ सुस्पष्ट सुमित्रा भाव्यांचा आवाज आणि सांगितलेलं 'पुस्तकी' ज्ञान ... तो नक्की कुठे टेप बंद करतो आणि नंतर काय दाखवलं आहे हे आता नीट आठवत नाही. परत बघितला पाहिजे तो भाग. पण बहुतेक ती शिकवण आजच्या काळात तकलादू होऊ लागली आहे असं असावं. त्या टेप्स आर्काईव्हला देणे, ज्या आता धूळ खात पडतील. हे रुपकात्मक आहे का कोण जाणे.
५. दिग्गज लोकांची शिष्यांत पेरलेले सुरस किस्से ... जे तो कलेक्टर सांगतो.
६. त्याचं वय वाढलेलं दिसणं ही फारच मस्त दाखवलं आहे.
७. मेकप .. दिसणं ही आवडलं. मुंबई दिसली नसती तरी तो मुंबईत आहे हे सतत जाणवतं राहिलं मला. त्याला घाम आलेला नाही, पण तो दमट चिकट दिसत रहातो, किंवा गुरुजींच्या गाण्याच्या मैफीली ज्या ठिकाणी होतात ती घरं, तिथला उजेड... हाय सिलिंग घरं, उगा दिवे लावून झगमगाट नाही, पण श्रीमंती दिसते आहे.
८. आणि शेवटी त्याचं आपला परीघ ओळखून संगीतक्षेत्राशी प्रामाणिक राहून मूव्ह ऑन होणं.
९. वर हरचंद यांनी म्हटलंय तसं, चमकदार तानांना फाटा देऊन खयाल, राग विस्तार दाखवणे ही आवडले. चमकदार तानांना फाटा देऊन तबल्याचा कायदा ऐकवुन त्याला टाळ्या हा भाग मला वाटतं, एक टोन सेट करते.

एवढ्या सगळ्यात अभिनयाकडे मात्र साफ दुर्लक्ष का केलंय समजलं नाही. बर्‍यापैकी गायक अभिनेता मिळू नये? किंवा त्या गायकाला, त्याच्या आजुबाजुच्या लोकांना अभिनय शिकवता येऊ नये? त्याचं चाचपडणं संगीतक्षेत्रात आहे, अभिनयात नाही. चाचपडणरा अभिनय नको होता.

माधव,
तो गाणं का सोडतो ते आलंय मला वाटतं. तो गुरुजींना लॅपटॉपवरुन गाणं ऐकवतो त्याप्रसंगातील गुरुजींची प्रतिक्रिया आणि तो मैफिल सोडून जातो त्यावेळी त्याच्या गाण्याचा पोत, गोंधळलेपणा याची सांगड घातली तर लक्षात येतं.
गुरूंशी असलेले बंध सिंबायोटिक आहेत मला वाटतं. शरद सोडून गेला तर गुरूजींना जिणं शब्दश: मुश्किल आहे, म्हणून त्यांना शरद हवा आहे. त्यांचं शिष्यावर प्रेम आहे हे ही एका संवादात आलं आहे, कदाचित म्हणूनच ते त्याला दिशा दाखवत रहाताहेत. त्यांना ही शरदचं वर्तुळ माहित आहे, पण ते शब्दबद्ध करणे त्यांच्या मुळावर येईल. शरदच्या बाबतीत त्याला आपली झेप माहित आहे, आपणं ह्या गुरूंचे शिष्य आहोत, नाही 'डीसायपल' आहोत सांगत रहाणं, त्या पडद्याआडं रहाणं सुरक्षित आहे हे दिसतंय. अशी सेवा करणं हे ही अगेन २०-२५ वर्षांपूर्वी बघितलं आहे. आज गणित नाही मांडता येत... पण प्रेम, आदर, निष्ठा, लाचारी, लीस्ट रेझिस्टंस पाथ... याचं मिश्रण आहे ते.
बँड मध्ये जाण्याचा प्रसंग आणि पेयपानाच्या प्रसंगातील सुरस गोष्टी... हे ही असंच घडतं. अजुन पुरेशी तयारी नाही असं गुरूला वाटणे, आणि मैफिल करायला बंदी घालणे, केली तर तोंड बघणार नाही, शिकवणार नाही अशा घातलेल्या अटी.. आणि खरोखर आजन्म न शिकवणे हे अती महान दिग्गज गायकांनी केलंलं अर्थात सांगोवांगी ऐकलं आहे. नावं घेत नाही. पण अशा कथा आहेत. बँड तर फारच दूरची गोष्ट.
शरदला स्वतःची दृष्टी नाही, सो गुरूने दिला ज्ञानरुपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा... ! Happy
मामी, शोकांतिका नाही वाटली. गटणे स्टाईल बोळा निघाला, वाट सापडली, परीघ समजुन इप्सित स्थळी मार्गक्रमण सुरू झाले असंच वाटलं. ग्लोरीफाय न होता परिस्थितीला भिडून त्यातल्या त्यात उत्तम मार्ग सापडला असा शेवट वाटला मला.

>>बंदिश बॅडेट्स जास्त आवडला<< +१
बंदिश बँडिट्सला +१ द्यावा लागेल असं कधी वाटलं न्हवतं, पण या सिनेमाच्या तुलनेत ती सिरिज उजवी ठरतेय. अ‍ॅट्लिस्ट संगिताच्या ट्रीटमेंट बाबत बोलायचं झालं तर. बाकि सगळा आनंदि आनंद... Wink

संगीत- स्वर हे खरंतर घराण्यांच्या मर्यादांच्या फार पुढे आहे व ते युनिवर्स फार मोठे आहे.>>+१. दुसरं असं, जे मला वाटले, आपल्याकडे सगळ्याच गोष्टी अध्यात्मामाशी जोडून, त्याग करणे, कफल्लक राहणे, केवळ कर्म किंवा साधना करीत राहून फळाची अपेक्षा न धरणे यावर कोरड ओढले आहेत.

अमित - परफेक्ट! त्यातील रागदारी संगीतासंबंधी बारकावे सोडले तर मला इतर गोष्टी तशाच जाणवल्या. तो तबल्याचा टाळ्याखाऊ सीन इव्हन मलाही टोटली उपरा वाटला होता Happy पण हे सर्रास होते. त्यामुळे चपखल दाखवले आहे.

मलाही शोकांतिका नाही वाटली. बोळा निघाला, असेच वाटले. त्याला तोपर्यंत असलेले ज्ञान व कौशल्य विकायचे असते तर ( "मिड-मार्केट" Happy ) क्लासेस वगैरेचा पर्याय भरपूर उपलब्ध असावा, कारण त्याच्याकडे विद्यार्थी बरेच दाखवले आहेत. एका अर्थाने तो त्या कल्ट मधून बाहेर पडल्यासारखे वाटले.

आणि संगीतक्षेत्राकरताही शोकांतिका नाही. कल और आयेंगे नगमोंकी खिलती कलियाँ चुननेवाले. याच्याबरोबरीचेही पुढे जातात. फक्त याच्याकडे आणखी पुढे जाण्याइतकी प्रतिभा नाही.

मला खटकलेला भाग म्हणजे ते गुरू याला जे सल्ले देतात ते अगदीच सरधोपट आहेत. किमान काही वर्षे त्यांच्याकडे तो असावा. जेव्हा मनासारखा सूर लागत नाही, तेव्हा त्यांचे संभाषण याहून न्युआन्स्ड असायला हवे. तयारी केली नाहीस का? मग का जमत नाही? छाप प्रश्न अगदीच वरवरचे आहेत.

आणखी एक डिसायपल येउ शकतो - प्रतिभा असलेले पण संधी न मिळणे, राजकारण, सॉफ्ट स्किल्स नसलेले किंवा ते किती महत्त्वाचे आहेत याची कल्पना नसलेले - अशांची कहाणी.

रटाळ सिनेमा. कलात्मक म्हणून पाहिला तरी कंटाळवाणा च. मोठा शरद आणि त्याची आजी पण नैसर्गिक म्हातारी झाल्यासारखी दिसते.
मी लोकांसाठी गात नाही हे मान्य. पण लोकांसमोर गायला काय हरकत आहे. स्वतः साठी च गा पण लोकांना पण आनंद घेऊद्या. किती सोपं आहे. असली कसली तत्वं.. आणि त्यानी काय असं विशेष मिळालं माईंना किंवा प्रधान गुरुजींना....

तो गुजराती विद्यार्थ्याचा प्रसंगही भारी आहे.
मराठी मुलं हसरे चेहरे, मनात एक ठेवून शुगर कोटेड बोलणं आणि स्वतःचा फायदा करून घेणं, त्याच बरोबर हितसंबंध अजिबात न दुखावणे यात किती कमी पडतात हे नव्याने समोर आलं
(तुम्ही एखाद्या बहुराजयीय विद्यार्थी असलेल्या इंजिनियरिंग किंवा तत्सम कॉलेजात शिकणारा साधा जास्त श्रीमंत नसलेला मुलगा असाल तर हे अगदी प्रकर्षाने जाणवतं.नॉर्थ, राजस्थान, पंजाब मधल्या विद्यार्थ्यांच्या मानाने पॉलिश आणि सॉफ्ट स्किल कमी पडतात.अर्थात मुली हुशार असतात.त्या पॉलिश आणि सॉफ्ट स्किल वाल्याना कॉलेज संपल्यावर लगेच गाठोड्यात बांधून ठेवून मूव्ह ऑन होतात.)

अवांतरः
मुख्य भूमिका वाला मुलगा/माणूस छान आहे. उगीच कोणी ६ पॅक वरुण धवन हृतिक सुबोध भावे न घेता खरा गायक घेतला आहे हे जास्तच चांगलं.
तरतरीत नीटस आहे. आमच्याकडे बघणारे लहान मेंबर त्याला 'सिरियस अ‍ॅसिड' म्हणत होती. तो छिछोरे मधला नवीन पोलीशेट्टी.पण मग पिक्चर अर्ध्यात बंद करावा लागला कारण सगळे 'हा काय पिक्चर आहे, तो नुसताच रिकाम्या रस्त्यावर ५ च्या स्पीड ने गाडी चालवतोय' म्हणून भूणभूण करत होते. मी एकटीने रविवारी सकाळी लवकर उठून पाहिला.
ते दोन रिलीज चे सीन असणं कथेची गरज वगैरे असेल, पण मला अनावश्यक वाटले.

माताजी अन्नपूर्णा देवींना प्रत्यक्ष भेटण्याचे नशीब मला ह्या जन्मी प्राप्त झाले होते 1992 साली. माईंचे विचार त्यांचेच विचार वाटले. संगीत ही 'फकीरी विद्या' आहे असं म्हणत त्या.

माताजी अन्नपूर्णा देवींना प्रत्यक्ष भेटण्याचे नशीब मला ह्या जन्मी प्राप्त झाले होते 1992 साली. माईंचे विचार त्यांचेच विचार वाटले.>> अहो किती छान त्या कोणाला भेटत नसत. वेगळा धागा काढोन लेख लिहा. अन्नपूर्णा देवींकडे एक डॅशुंड कुत्रे होते व त्या रविशंकर पेक्षा सुद्धा उत्तम सतार वाजवत एकूण त्यांच्या बद्दल मी खूप वाचले आहे. शुभोची आत्महत्या, कॉन्स र्ट न करण्याचा निर्नय इत्यादि. मला पण माईंचे व्यक्तिमत्व बघता मला पण त्यांचीच आ ठवण झाली होती. त्यांचे ज्ञान वेगळ्या लेव्हलचे होते.

मला तर ते बाईक वरून तो अंधा र्‍या रस्त्या वरून फिरतो तेव्हा फक्त तंबोर्‍याचे सूरच ऐकावे असे वाट्त होते. त्या संवादांनी पन त्या क्षणांची शांतता जाते.

म्हातार्‍या गायन सरांचे घर पण नेपथ्य अगदी करेक्ट घेतले आहे. वन रूम टेन मेंट . एक किचन कट्टा. ओटा पुसून धुतलेले फडके ग्यास
सिलिंडर वर टाकलेले हा तर विनिन्ग टच. आरश्याचे लोखं डी कपाट. तसे सेम आहे माझ्याकडे.

द डिसायपल नाव कदाचित फेस्टिव ल सर्किट साठी दिले असावे. दर वेळी समजवायला नको शिष्य द डिसायपल असे लिहून.

दारू पिण्याच्या सीन मधला माणूस पण बरोबर घेतला आहे. अमेरिकेत मोठे कलेक्षन. मुंबईच्या फ्लॅट मधील कलेक्षन बिलिओनेअर लोक्स कसे पैसे होर्ड करतात तसे हे लोक सांस्कृतिक ठेवा होर्ड करून ठेवतात. पैसे हाताशी भरपूर त्यामुळे अनघड रेकॉर्डी विकत घेता येतात व ते आपल्याकडे आहे ह्याचा दंभ. ऐकतात किती व समजते किती कोण जाणे. वरत सर्व व्यक्तींची उपेक्षाच मनात. त्यांच्या स्ट्रगल किंवा मानसिकते बद्दल जाणून घ्यायची काहीच इच्छा नाही. ही असली कलेक्षन मुक्त करून डिजिटाइज करून सर्वांना उपलब्ध केली पाहिजेत खरेतर.
बायकांबद्दल विचित्र अ‍ॅटिट्युड. माई इलीट फ्रॉड. ती शांती देवी ही आधीची वेश्या का तर तिचे बिकिनी फोटो उपलब्ध होते. अरे तिची कला बघाना.

आई वडील वारल्यावर मी पण त्यांचे घर मालकांना परत करायला गेले तेव्हा असंख्य चिजांची पुस्तके गांधरव महा विद्यालयाच्या मासिकआंचे गठ्ठे व्यवस्थित बाइंड केलेले. रेकॉर्डी जुन्या बाजारात देउन टाकलेल्या. ते प्रिझर्व करायची शक्तीच नव्हती तेव्हा. फार वाइट वाटले होते. शेजारी राहणा र्या माझ्या सासुबाईंनी पण रिटायर मेंत नंतर अभिज्ञान मंडळ चालवले होते व अनेक कार्यक्रमांचे ऑडिओ व्हिडीओ रेकॉ र्डिंग घरात जमवलेले होते. ते संपर्कातले कोनीतरी घेउन गेले असेल व नीट ठेवले असेल.

चित्रपटात एक डिटेल म्हणजे रसिकांची संख्या कमी होत जाते हळू हळू व ते जास्त जास्त म्हातारे होत जातात. आमच्या बाबांचे गुरुपोर्णिमा सोहळे तर घरातच होत आमच्या क्लास च्या खोलीत. ते झाले असे मला हैद्राबादला कळे. एखादा फोटो जपला आहे मी.

Pages