प्रेम

Submitted by Rudraa on 1 May, 2021 - 11:16

हृदया हृदयातील प्रवास,
विरह तुझा नी माझा......
मिलन क्षणाक्षणांचे ,
परी क्षणाक्षणांत अंतरे......

भेगाळलेल्या मातीला ,
विलंब पावसाचा.......
हुरहुरलेल्या मनास ,
भास तुझ्या प्रेमाचा .......

डोकावलेले शब्द,
तुझ्या नयनांचे इशारे.......
ओठांवर येऊन खिळतात ,
झुळकेतील अथांग शहारे ......

हृदयात काहूर उठले,
तुझ्या न् माझ्या प्रेमाचे .......
अलिप्त शरीर हे जगासाठी ,
मिलन परी अंतहीन आपुले.....

रुद्रा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान