वार होतो

Submitted by मनोजकुमार देशमुख on 30 April, 2021 - 15:45

पुन्हा हृदयावर अचानक वार होतो
जसा तीक्ष्ण बाण तो आरपार होतो

ज्याच्या भरवशावर रुग्ण आत आहे
औषधामध्ये तिथेच अपहार होतो

खरे कुणाला जणू उमजलेच नाही
कशाने नेमका मग उपचार होतो

क्षणातच कुणी इथे जिवानिशी जाते
कुणासाठी हा एक व्यवहार होतो

आणले प्रेत थेट सरणावर रचले
कुठे स्मशानी आता संस्कार होतो

वाटते आता ते उजाडले आहे
अन पहाटे नव्याने अंधार होतो

Group content visibility: 
Use group defaults