आयुष्य - भाग २

Submitted by जेसिका on 30 April, 2021 - 03:24

राणीची १२ वी संपली. तिला बारावीला फक्त ५०.५० % च पडले. इतकी हुशार मुलगी आणि इतके कमी मार्क..?? पप्पांना समजले होते कि आपल्या लेकीला कॉमर्स खूपच अवघड जातंय. कदाचित त्या विषयात तिला आवड नसल्यामुळे... पण राणी परिस्थितीशी जुळवून घेवून शिकत होती.
मम्मीचा संधिवात दिवसेंदिवस खूपच वाढत चालला होता. मम्मीच्या सांध्यांवर सूज आल्यामुळे तिला काहीच करता येईना. राणीला आता सतत मम्मी जवळ राहून तिची काळजी घेणं गरजेचे वाटू लागल. तिच्या मामेभावाने तिला distance Education विषयी माहिती सांगितली आणि राणीने निर्णय घेतला कि पुढच शिक्षण म्हणजे b.com distance Education च्या माध्यमातून करायचं.
पण पप्पांना लेकीची होणारी फरफट बघवेना. त्यांचा आणि मम्मीचा विचार झाला आणि दादा च लग्न करायचं ठरलं.
आता दादाच लग्न करायचं तर दादाच्या दोन्हीही हात accident चे. हा प्रश्न पण होताच पप्पांच्या मनात.
स्थळे पाहता - पाहता नातेवाईकातलेच एक स्थळ आले, मम्मीच्या माहेरघराकडून. मम्मीला कदाचित मुलीचा स्वभाव माहित होते म्हणून तिने या लग्नाला विरोद केला. पण पप्पानी दादाचा व कुटुंबाचा विचार करत लग्नाला तयारी दाखवली. पप्पांच ठाम मात होतं कि नातेवैकातील मुलगीच व्यवस्थित नांदू शकते आणि जरी काही चुकीच वागली तरी आपल्याला मध्यसथीना बोलता येत... मध्यस्थी होते राणीचे सख्खे मामा..!
झाल्ल...!!!! काही महिन्यातच दादाच लग्न झाल. संपूर्ण लग्नात मम्मी खुर्चीवर बसून होती, पण थोडी दु:खी होती. कारण लग्नाच्या कामात तिचा काहीच हातभार लागला नव्हता.. पण राणीने ती कामगिरी उत्तम रीतीने पार पाडली होती.
आता सगळ व्यवस्थित चालाल होते. सगळेच खुश होते. वाहिनीने दिलेल्या गोड बातमीने तर सगळे घर आनंदाने फुलून आले.
राणी आता वाहिनीची काळजी घेऊ लागली... बहुतांश सगळेच काम राणी करायची. वाहिनीला डॉक्टरांनी बेड रेस्ट घ्यायला सांगितली होती, म्हणून मग वाहिनी ६ महिन्यांनी माहेरी गेली बाळंतपणासाठी.. दादा ला एक गोड बाहुली झाली... खूप गोड...
तिच्या येण्याने कुटुंब पूर्ण झाल्यासारखे वाटायला लागले. मम्मी पण उदास ना बसता त्या ३ महिन्यांच्या बाहुली सोबत गप्पा मारायची आणि विशेष म्हणजे ते बाळ पण मम्मी ला हुंकारे द्यायचं... पप्पा तर नातीसाठी ७.३० - ८.०० वाजताच कामावरून यायचे. सगळाच कस छान वाटत होत्त.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पप्पांच ठाम मात होतं>> मत होतं
आपल्याला मध्यसथीना बोलता येत...>> मध्यस्थांना
चालाल होते>> चालले होते.

वाहिनीने दिलेल्या गोड बातमीने तर सगळे घर आनंदाने फुलून आले.
राणी आता वाहिनीची काळजी घेऊ लागली... बहुतांश सगळेच काम राणी करायची. वाहिनीला डॉक्टरांनी बेड रेस्ट घ्यायला सांगितली होती, म्हणून मग वाहिनी ६ महिन्यांनी माहेरी गेली बाळंतपणासाठी.>> सर्वत्र वहिनी असे पाहिजे. वाहिनी नाही.

ही तुमचीच कथा आहे का? टाइम लीप अन इव्हन आहे. लगन झाले लगेच मूल मग ते तीन महिन्यांचे झाले. कथेत थोडे संवाद वगैरे असले तर छान वाटेल. मला तुमच्यावर गर्व वाट्तो इतके मनापासून लिहिले आहे. पुढील भागाच्या प्रतीक्षेत व मायबोलीवर स्वागत.