मोगरा (& failed attempts)

Submitted by अक्षता08 on 25 April, 2021 - 00:53

साधारण २ वर्षांपूर्वी मोगर्‍याच रोपट घरी आणलं होतं. त्यावेळी त्याला भरघोस कळ्या आल्या होत्या त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष झाल कींवा गृहित धरल की आपसूकच फूलं येतील. (विसरले होते की सदाफुली नसुन मोगरा आहे). जेवढ्या चूका करता येतील तेवढ्या मोगर्‍याच्या बाबतीत केल्या आहेत.२ वर्ष मोगर्‍याला एकही फूलं आलं नाही. ह्या वर्षी मात्र डोळ्यात तेल घालून काळजी घेतली आणि त्यामुळेच कदाचित ह्या वर्षी मोगर्‍याच दर्शन झालं. आणि खरच वाटलं की मोगर्‍याच्या सुगंधापुढे त्याची एवढी काळजी घेणं worth आहे.

मोगर्‍याला दुर्लक्ष केलेलं बिलकूल सहन होत नाही. वर्षभर मोगर्‍याची काळजी घ्यावी लागते. नियमितपणे मोगर्‍याची पान check करत रहावी. पानं दुमडलेली दिसली की किटकनाशकाचा spray करावा. मोगर्‍याच्या बहराच्या काळात दर ७ दिवसांनी खत द्यावे, व इतर वेळी १५-२० दिवसांनी द्यावे. उत्तम सुर्यप्रकाश आणि नियमितपणे पाणी द्यावे. माती कोरडी रहायला नको. मोगरा ज्या कुंडीत लावला आहे त्या कुंडीत आणखी एखाद रोपट लावल तर मोगरा अधिक बहरतो. वरील २-३ इंच माती दर २०-२५ दिवसांनी उकरत रहावी.

एवढी ‍सगळी काळजी घेऊन फुललेला मोगरा बघुन आनंद द्विगुणित होतो. आणि ‍मोगर्याच्या सुगंधाला तर तोडच नाही.
IMG_20210423_131028.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोगर्‍याची पाने डिसेम्बरच्या शेवटी वा जानेवारी महिन्यात पहिल्या आठवड्यात पूर्ण काढून टाकावीत. म्हणजे मार्च मधे नवीन पाने आणि खूप कळ्या येतात

मी पण लावला मोगरा.. खत दिल्यानंतर एकदम पंधरा वीस फुलं आली होती. आता आठवडा झालं ,फुलं नाही आली.

गेल्या वर्षी मोगरा कुंडीत लावला, पण बहर गेल्यावर कसा कुणास ठाऊक जुलै मधे पानं, फांदी काळसर पडली...
आणि गेलं ते झाड Sad
यावेळी नवं रोप लावलंय, खत देतेय, बघू या..

IMG-20210424-WA0006.jpg

कालचा बहर... मैत्रिणीने दिलेले रोप. तिला आवर्जून हा फोटो पाठवला आहे.
फुले येऊन गेल्यावर ती छोटी फांदी खुडली की नवीन फुट जास्त येते आणि त्याला कळ्या येतात हा अनुभव आहे.

आमच्या झाडाने एप्रिल पहिल्या , दुसऱ्या आठवड्यात 15 ते 20 फुलं दिली असतील. आता पुन्हा कळ्या आल्यात , पुढल्या रविवार पर्यंत परत येतील फुलं. हा असा एवढी फुलं देणारा पहिलाच असेल आमच्या कडचा मोगरा. हे रोप मागल्या वर्षी रावेत कॉर्नरच्या इथल्या नर्सरी मधून घेतलं. आत्ता पर्यंत मस्त फुलला आहे. मस्त नर्सरी आहे ती. सगळी रोपं छान मिळाली आहेत. ते लोक खत मिश्रित माती पण विकतात. मी रोप, कुंडी आणि माती असं त्यांच्या कडून आणतो.

धनवन्ती, रावेत नॅनो होम्सच्या गेटला लागूनच आहे. कुण्डी असेल तर घेऊनच जा आणि त्याला माती आणि रोप कुण्डीत लावून द्यायला सांगा.

खरय, लाडाकोडाच झाड आहे हे. माझ्याकडे 10 फूट वाढलंय , हिरवंगार आहे पण फुलं मात्र दिवसाला 3,4 च देतं. डबल मोगरा . यावेळी सिंगल मोगरा आणून कुंडीत लावलाय.

@मनिम्याऊ
(‍मोगर्याची पाने डिसेम्बरच्या शेवटी वा जानेवारी...")
ह्या वर्षी करून बघते. धन्यवाद Happy

@mrunali.samad
१५-२० म्हणजे बरीच फूलं आली. (२ वर्ष माझ्या झाडावर एक फूलं नव्हतं) फोटो मस्त आला आहे Happy

@किशोर मुंढे
धन्यवाद Happy

@सामो
सहमत !!
(हाय मेंटेनन्स प्लँट दिसतय. पण खरे आहे, सुगंध निव्वळ स्वर्गिय असतो.)

@गौरी
(फांदी काळसर पडली...)- कदाचित पाणी जास्त दिल गेलं असेल (root rot)
(यावेळी नवं रोप लावलंय, खत देतेय, बघू या)
All the best Happy

@धनवन्ती
फारच सुरेख बहरला आहे मोगरा !!

@लंपन
(आमच्या झाडाने एप्रिल पहिल्या , दुसऱ्या आठवड्यात 15 ते 20 फुलं दिली असतील....")
मस्तच Happy

@वर्णिता
खरच...(लाडाकोडाच झाड आहे हे. )
(माझ्याकडे 10 फूट वाढलंय , हिरवंगार आहे )
व्वा..मस्तच Happy