मरण सोपे झाले...

Submitted by सुर्या--- on 24 April, 2021 - 00:09

गर्दी मरणाऱ्यांची झाली, जाण्या सरणावरती...
पैसे मोजता नंबर मिळतो, हॉस्पिटल च्या दारावरती...

अश्रू ओशाळले, दाटले, विटले...
धीरगंभीर श्वास सुटले, उपचारांच्या अभावावरती...

प्राणवायुच घुसमटतोय, म्हणे कुठे पुरा पडू...
अंकुश उरला नाही कसलाच, चोरांच्या बाजारावरती...

जगणे कठीण, मरण सोपे झाले...
कठीण झाला मोकळा श्वास, माणसांच्या अवती भोंवती...

गर्दी मरणाऱ्यांची झाली, जाण्या सरणावरती...
पैसे मोजता नंबर मिळतो, हॉस्पिटल च्या दारावरती...
© SURYAKANT_R.J.

Group content visibility: 
Public - accessible to all site users