ओळख अंतरीची

Submitted by रानभुली on 23 April, 2021 - 15:54

माझ्या जखमांवर
तू फुंकर मारताना
जाणला मी श्वास हा
तुझा घाव घालताना

ना हे घर माझे
ना ते घर तुझे
करार पाळला जुल्मी
मी सोबत संभाळताना

बत्ती मी पाघळणारी
अस्तित्त्व शोधू कोठे
भाव विहीन ही नाती
मेणात वितळतांना

ज्या समयी दिवा बीजाला
लावून आक्रंदत होते
छाया झाल्या गं वैरी
माझे चित्त जाळतांना

खोल अंतरीची ही
ओळख पटे गगनाला
हुंकार घुमे गाभ्याशी
निघे ज्योत पैलतीराला

- रानभुली
२४/४/२०२१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खोल अंतरीची ही
ओळख पटे गगनाला
हुंकार घुमे गाभ्याशी
निघे ज्योत पैलतीराला>> हे फारच सुरेख आहे . अजून लिहीत चला कविता. कधी कधी आपली मनःस्थिती काय आहे नक्की ते एखादी कविता वाचून समजते तसे झाले.

छान काव्यमय ओळख. संभाळताना - सांभाळताना तसेच तांना ऐवजी ताना असावे असे वाटते. शेवटच्या कडव्यातील शेवटच्या शब्दातही योग्य बदल केल्यास आणखी छान.

किशोर मुंढेजी,
सूचनांबद्दल आभार. अवश्य विचार करीन.